Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

मराठी साहित्य मंच

Tragedy

3  

मराठी साहित्य मंच

Tragedy

भाकरी

भाकरी

1 min
253


झटतो दिनरात कष्टानी मी

मिळावी म्हणून पोटास भाकरी

असंख्य वेदना सहन करून

भाकरीसाठी करतो इतरांची चाकरी


टीचभर पोट माझे मात्र

भूक ही न संपणारी

आयुष्यात या भुकेहून झाली 

भाकरीसाठी चाकरी गिळणारी


नशीब कसं हे रेखाटले

मी माझ्याच हातांनी

दोष का देऊ देवाशी मी

भाळी दुःख दारिद्र्य लिहिलं विधात्यानी


न भुके राहो पोट कुणाचे

देवा तुजपाशी एवढीच मागणी

दे सकळासी पोटास पोटभर तू

मागतो तुज मी हे हात जोडुनी


Rate this content
Log in