STORYMIRROR

Rishi Ingle

Romance

3  

Rishi Ingle

Romance

आणून दे...

आणून दे...

1 min
208

काळजात तुझा चेहरा तू राणी पाहून घे 

जे घेऊन गेलीस ते माझं काळीज आणून दे...


केली माझ्यावर तुझ्या प्रेमानं अशी कृपा 

जीवाहून प्यारी आहेस तू गं मला रूपा

राणी जरा गालातल्या गालात तू हसून घे...


तुझ्या मागे फिरून मला एक वर्ष झालं 

होकारही मिळेना माझं मन बेहाल झालं 

माझ्या प्रेमाचा तू एकदा विचार करून घे...


कधी फिरशील माझ्या हातात हात घालून 

बघ माझं गाव राणी खांद्याला खांदा लावून 

मला पाहताच नजर खाली करून लाजून घे...


संगम तुझाच आहे तू जाऊ नको रागावून 

आईला आलो आहे तुझाच फोटो दाखवून

सात जन्मासाठी मला देवाकडे तू मागून घे...


Rate this content
Log in

More marathi poem from Rishi Ingle

Similar marathi poem from Romance