ती आणि मी
ती आणि मी
आज पुन्हा चाललो तिला भेटायला...
पुन्हा नव्याने भेटीचे क्षण अनुभवायला....
किती भांडतो तुझ्याशी....
किती रुसते तुझ्यावर....
इतका सगळं असूनही....
तुझ्याशिवाय राहू शकत नाही हे सांगायला...
आज पुन्हा चाललो तिला भेटायला. ..
पुन्हा नव्याने भेटीचे क्षण अनुभवायला..
आपलं नाजूक नातं हळुवारपणे सावरायला...
कितीही दुरावा आला तरी...
प्रेमाने जवळीक साधायला....
आज पुन्हा चाललो तिला भेटायला...
पुन्हा नव्याने भेटीचे क्षण अनुभवायला....
एक एक क्षण कसा तडफडत जातो हे सांगायला...
पण समोर आल्यावर काही न बोलता....
फक्त डोळ्यांतून प्रेम उधळायला...
आज पुन्हा चाललो तिला भेटायला...
पुन्हा नव्याने भेटीचे क्षण अनुभवायला...
त्याच्या छोट्या छोट्या हरकती डोळ्यात साठवायला...
त्याने काढलेल्या प्रेमळ खोड्या...
आठवणीत भरून ठेवायला...
ती काही बोलली नाही तर ....
कसा चेहरा होतो हे दाखवायला...
आज पुन्हा चाललो तिला भेटायला....
पुन्हा नव्याने भेटीचे क्षण अनुभवायला....
तिला आपलंसं करायला...
तिच्यावर मनापासून प्रेम करायला. ..
तिच्या त्या स्पर्शात हरवून जायला...
फक्त तिच्यासाठीच माझी होऊन जायला...
तिच्या मनात छोटीशी जागा करायला....
आज पुन्हा चाललो तिला भेटायला....
पुन्हा नव्याने भेटीचे क्षण अनुभवायला...

