Shraddha Kalyankar

Inspirational

4.0  

Shraddha Kalyankar

Inspirational

या जन्मावर शतदा प्रेम करावे..!

या जन्मावर शतदा प्रेम करावे..!

4 mins
500


     “हसते गाते जहां से गुजर,दुनिया की तू परवाह न कर ,मुस्कुराते हुए दिन बिताना , यहां कल क्या हो किसने जाना " का कोणास ठाऊक पण आज अचानक हे गाणं जोशी सरांना आठवलं,आणि ते गुणगुणत रोजच्या प्रमाणे शतपावली करण्यासाठी ते घराच्या बाहेर पडले.खरंतर त्यांच मन आज खूप आनंदी होतं . रोजचाच रस्ता ,रोजचीच घरे ,रोजचीच झाडे आज आपल्यासारखीच आनंदी आहेत की काय असं उगाच त्यांना वाटू लागलं. इतकंच नाही तर अंधारात वाट हरवलेल्या वाटसरूंना मी ही प्रकाश देऊ शकतो हे सिद्ध करण्यासाठी आलेला पौर्णिमेचा चंद्र सुद्धा आज त्यांना आनंदीच भासत होता.आपल्या या आनंदात कायमच रमून जावं आणि आयुष्याला कडकडून मिठी मारावी असं त्यांना मनोमन वाटत होतं.त्यांच्या या आनंदमागच कारण ही तसंच होतं,आयुष्यात घडलेले वाईट प्रसंग,आलेल्या सगळ्या अडचणी आणि त्यातून मिळालेले कित्येक चांगले-वाईट अनुभव सोबत घेऊन आज त्यांनी ७६ व्या वर्षात पदार्पण केलं होतं. मागच्या ७५ वर्षातल्या कितीतरी गोष्टी त्यांना आज आठवत होत्या.शून्यातून निर्माण केलेल हे साम्राज्य,ते निर्माण करताना आलेले अडथळे ,त्यासाठी घेतलेले कष्ट सगळ काही त्यांच्या डोळ्याखालून जात होतं.

आयुष्याच्या येणाऱ्या प्रत्येक सोप्या-अवघड वळणावर योग्य निर्णय आणि आत्मविश्वास यांची सांगड घालत त्यांनी यशस्वी रित्या पार पाडलेला हा जीवनप्रवास आठवण्यात ते इतके मग्न होऊन गेले होते की आपण घरापासून खूप खूप दूर आलेलो आहोत हे सुद्धा त्यांच्या लक्षात आलं नाही.. ते त्यांच्या आठवणींत अजून रमणार होतेच की तेवढ्यात बाजूने जाणाऱ्या मोटर सायकलीच्या वेगाने त्यांना भानावर आणलं... आपण आपल्या घरापासून खूप दूर आलेलो आहोत आणि बराच उशीर झाला आहे याची जाणीव होताच त्यांनी परत घरी जाण्यासाठी पाठ फिरवली, तितक्यात त्यांची नजर रस्त्याच्या कडेला बसलेल्या साधारणत: २६-२७ वर्षाच्या तरूणावर पडली....अशा या ऐनवेळी इतक्या उदास अवस्थेत हा तरुण इथे का बरं बसला असेल असा प्रश्न त्यांना पडला. तितक्यात तो मुलगा उठला आणि चालू लागला. अजूनही तो त्याच अवस्थेत होता.आपल्या मागून एक मोठी ट्रक मोठ्या वेगाने येत आहे आणि आपण अगदी रस्त्याच्या मधून चालत आहोत याचही त्याला भान नव्हत. ट्रक त्याच्या जवळ येणार आणि तिथे मोठा अपघात होणार याआधीच सरांनी त्याचा हात पकडला आणि त्याला बाजूला सारल . त्यांना बघून तो मुलगा मात्र आश्चर्य चकित झाला.तो त्यांना काही बोलणार तितक्यात सर त्याला म्हणाले "काय झालं बाळा? काही प्रॉब्लेम आहे का ?.. ये ना बस बोलूया..” 

       "खरंतर जोशी सर म्हणजे एक शिक्षक होते ,त्यांच्या पाच भावंडांमधले सगळ्यात धाकटे पण खूप हुशार ,कष्ट करण्याची तयारी असलेले.. त्यांच्या लहानपणी त्यांच्या घरची परिस्थिति खूप हलाखीची होती. आमचा रघुवेंद्र खूप हुशार आहे म्हणत त्यांच्या वडिलांनी त्यांना शिकवल होतं. साहित्यांमध्ये रमलेले आणि ज्ञानाच भांडार असलेले जोशी सर हे त्यांच्याच शाळेतल्या कितीतरी मुलांचे आदर्श होते आणि त्यातलाच एक म्हणजे आज त्यांना भेटलेला तो मुलगा म्हणजेच मानस कुलकर्णी....                              

मानस खूप दिवसांपासून नौकारीच्या शोधात होता पण त्याला काही केल्या कुठेच नौकारी मिळत नव्हती ,तो घरातला सगळ्यात मोठा मुलगा होता घरच्यांची सगळी जबाबदारी त्याच्यावर होती. त्यात हल्लीच त्याला त्याच्या एका जीवाभावाच्या मित्राने फसवल होतं. त्यामुळे जगातल्या माणुसकीवरचा त्याचा विश्वास च उतरला होता. रिकामा खिसा,झालेली फसवणूक हेच मानसिक ताणावाच मुख्य कारण असतं असं म्हणतात ना तसंच सगळं मानस सोबत ही झालं होतं.आज मात्र खूप दिवसानंतर तो त्याचा आदर्श असलेल्या जोशी सरांना भेटला होता. पण आज तो त्यांना त्याची ओळख सांगणार नव्हता.सरांनी खूप विचारल्यानंतर त्याने त्याच्या सोबत घडलेलं सगळं सरांना सांगितलं.आणि म्हणाला "मीच काय हे सगळं जग आज मला उदास भासत आहे...हा माझा रोजचा रस्ता सुद्धा माझ्यावरती चिडला आहे...ही रस्त्यावरती पडलेली झाडाची पाने झाडांनी साथ सोडली म्हणून जमिनीवर कोसळून रडत आहेत...आणि अमावास्येला आपण पूर्णपणे नाहीसे होणार आहोत याच दु:ख व्यक्त करत असलेला चंद्र सुद्धा त्याचे अश्रु प्रकाशाच्या रूपाने जमिनीवर सांडत आहे.खरंच माझ्यासारखच हे पूर्ण जग आज उदास आहे. त्याच हे सगळं बोलणं ऐकून स्मित हास्य करत सर त्याला म्हणाले "बघ ना किती विरोधाभास आहे हा नाही...आज मला हे आयुष्य,हे जग हवहवस वाटत आहे.. .रोजच्यापेक्षा आज मी खूप जास्त आनंदी आहे.. तुला वाटत असणारा हा चंद्र,ही झाडे ,हा रस्ता मला मात्र आज माझ्या आनंदात रमून गेल्यासारख वाटत आहेत...जितका आज मी खुश आहे तितकाच तू आज दु:खी आहेस...." सारख्याच गोष्टींमध्ये जाणवलेला हा विरोधाभास ऐकून दोघेही एकमेकांकडे बघून उगाच हसू लागले...

      काही क्षणांच्या शांततेनंतर सर त्याला म्हणाले "तुला माहिती का ?आज तू जिथे आहेस ना तुझ्याच वयात असताना मी ही तिथेच होतो..अगदी सारखीच परिस्थिति होती...पण आज मी खूप खुश आहे...माझा अनुभव तर मला हेच सांगतो की आयुष्यात आलेल्या अडचणीला जर आपण हसून सामोरे गेलो न तर आलेली अडचण सुटायला तिथेच खरी सुरुवात होते.आणि हो आपल्या आनंदासाठी आपण ना दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा स्वतःवर जास्त अवलंबून राहायला हवं..कारण what you see around you in the world is the reflection of who you are ...... असं म्हणत सरांनी त्याचा निरोप घेतला . पण सरांच्या बोलण्यातून मानस ला काहीतरी नवीन उमगल होतं...ते म्हणतात ना आपण उदास असताना कोणाचे तरी चार प्रेरणादायी शब्द सुद्धा आपल्याला पुढे चालायला प्रवृत्त करतात.१५-२० मि च्या अंतरानंतर मानस तिथून उठला आणि घराकडे जाण्यासाठी निघाला. घरी आल्यानंतर मस्त पोटभर जेवण करून तो झोपी गेला. खूप दिवसानंतर आज त्याला शांत झोप लागणार होती...कुठेतरी आयुष्य नकोसा झालेला मानस आज सकाळी उठून मात्र परत नव्याने घराच्या बाहेर पडला.आता त्याने हसतच सगळ्या परिस्थितीला तोंड देण्याच ठरवल होतं..खूप प्रयत्नानंतर सुद्धा नोकरी नाही मिळाल्यावर खचून न जाता त्याने स्वतःहून क्लाससेस घेण्याची सुरुवात केली...आणि त्यात त्याने भरघोस यश प्राप्त केलं. सरांच्या ७६ व्या वाढदिवसाला तो सरांच्या घरी गेला आणि त्याने वर्षापूर्वी घडलेलं सगळं सरांना सांगितलं...त्या वेळी आयुष्यावर आणि स्वतःवर प्रेम करायला सरांनी त्याला शिकवलं होतं...सरांनी सुद्धा त्याला प्रेमाने मिठी मारली...तितक्यात रेडियो वर मंगेश पांडगावकरांच सुंदर गाणं लागलं .."या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे...शतदा प्रेम करावे .."

       


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational