वेळ आली होती पण...
वेळ आली होती पण...


आकाश पूर्णपणे निरभ्र... सकाळी साडे आकाराची वेळ... वाहनांची वेळ व वर्दळ चालूच होती.अक्षय तृतीयेचा तो दिवस.काही तरी खरेदी करावी म्हणून माहीम वरून सांताक्रूझ पूर्वेला असणाऱ्या नावाजलेल्या मोबाईल दुकानाकडे मोबाईल खरेदी करण्यासाठी निघालो होतो, मन अगदी आनंदानी बहरून गेलं होतं.या दिवशी खरेदी केली तर खरेदी अक्षय राहते, अशी फार पूर्वीपासून परंपरा आहे,असा मनात पक्का विचार घर करून बसला होता.माझ्या शेजारीच राहणाऱ्या विठ्ठल नानाच्या अंकू भाऊला बरोबर घेऊन जायचं असं मनात पक्कं केलं होतं.
माझ्याजवळ असलेली मोटारसायकल ही नवीनच होती,व एक हातीअसल्याने त्या गाडीची हाताळणी व तिचं चालणं फक्त मलाच माहीत होतं. गेल्या तीन वर्षात कधी अडचण भासू दिली नाही.स्वताच्या आईसारखं प्रेम दिल ,दिला आपुलकीचा जिव्हाळा अगदी मन भरून...गाडीला कधी धक्का ही लागला नव्हता,दर तीन महिन्याला सर्विशिंग ठरलेली .विठ्ठल नानाच्या अंकूला कसं बस तयार केलं."अंकू भाऊ,चला आपण सांताक्रूझला जाऊन येऊया?"असे मी विचारले .तेव्हा अंकू भाऊन उत्तर दिलं,'चला जाऊ',पण काय काम आहे ते तरी सांग?असंच बोलतोय.अंकुभाऊन मिशीवर हात फिरवीत सुनावलं. अंकुभाऊ आज अक्षय तृतीया आहे,आज एखादा मोबाईल तरी खरेदी करूया म्हणतोय.चल की मग भावा ,म्हणून अंकुभाऊ व मी मनात पक्का निश्चय करून आम्ही दोघेजण माझ्या गाडीवर जायला तयार झालो.
आजपर्यंत अनेक घटना व प्रसंग ऐकले व पाहिले होते की,अशाच मुहूर्तावर काहीतरी विपरीत घटना घडतात.अस वाक्य गाडीवर बसल्यावरच सुचायला सुरू झालं.जसं माहीम कोजवे सोडून पुढे उजवे वळण घेऊन कलनागर ब्रीज चढलो,तशी मनात शंकेची पाल कुचकूचायला लागली.कोणी तरी धक्का देऊ नये व आपण घसरून पडू नये,असं मनात विचारांचं काहूर माजू लागलं.तशी एक चार चाकी गाडी भुर्रकन... वावटळ यावं अशी निघून गेलीआणि मन अगदी सुन्न झालं... हायवे वरून जातानाही डाव्या बाजूनं प्रवास सुरूच ठेवला.
पावणे बाराच्या सुमारास मी आणि अंकुभाऊ वाकोला जंक्शन वरून डावीकडे वळण घेऊन जात असताना रस्त्याच्या उजव्या बाजूला जाण्याएण्याची एक मोकळी जागा होती. अचानक एक रिक्षा जोरात आली आणि आम्ही रस्त्यातून सरळ रेल्वेस्टेशन कडे जात असताना रिक्षाला धडक बसली.डोक्यात हेल्मेट होतं, पण पाठीमागील अंकुभाऊकड नव्हतं.आम्ही दोघं ही गाडीवरून खाली पडलो,गाडी चालूच होती,आम्ही एकीकडे व गाडी एकीकडे!काही माणसं पट्कन मदतीसाठी धावून आली.आम्हाला उठवलं,आम्ही रिक्षावाला न पाहता पाहिलं आम्हाला सावरलं.कुठं दुखापत तर नाही ना झाली?याची आम्ही खातरजमा करू लागलो.माझ्या गाडीचा हँडल पूर्णपणे वाकडा झाला होता.त्यातच कसाबसा हँडल पकडून काही अंतरावरच शिवा गँरेजवाला एक विश्वासू व्यक्तीकडे गेलो,पट्कन देवदूतासारखा धावून आला,माझ्या गाडीचा हँडल सरळ करून मला धीर दिला.पण तरी ही माझी धडधड काही कमी झाली नव्हती.माझ्या जिवाभावाचा मित्र अंकुभाऊ ह्याला बरोबर घेऊन गेलो होतो.
माझ्या शरीरावर कोणतीही जखमेची खूण नव्हती.वरखडलेलं ही दिसत नव्हतं.माझ्या बाबतीत असा प्रसंग कधी ही आला नव्हता अशी का वेळ आली.गाडी न ही काही दुःख दिल नव्हतं,आईच्या मायेसारखं मला जपलं.येता जाता कधी रुसवा बहाणा ही केला नव्हता,त्या माझ्या गाडीला देवदूत म्हणून पहातो.वेळ कधी ही सांगून येत नाही अमावस्या,पौर्णिमा व एखादा मुहूर्त असो,प्रारब्धात जे लिहिलं ते मात्र नक्की होत ,हे मला तेव्हाच उमगलं... शेवटी मनातच पुटपुटलो...
वेळ आली होती...पण...