STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Tragedy

4  

Abasaheb Mhaske

Tragedy

वाटतं सालं जगायचंच राहून गेलं ...

वाटतं सालं जगायचंच राहून गेलं ...

1 min
222

वाटतं सालं जगायचंच राहून गेलं ...

कितीही जगलं ,कितीही जगलं तरी 

जगावंसं वाटतं स्वछंदी निरंकुश ... 

भर भरून ,अगदी मनासारखं 


आशा , आकांक्षा , वाढतच जातात 

सुंदर, मनमोहक स्वप्नही हवी हवीशी 

राग , लोभ,मोह , माया , मत्सर सोबत

तरीही वाटतं खूप करायचं राहून गेलं 


सुरेख बंधनातील नंदनवन अन आठवणी

 त्या बेसुमार घेऊन सोबतीला 

गोकुळातील कन्हैया राधा , गोपीकास भुलून 

अचानक मथुरा नरेश बनून पार्थसारथी होतो 


सगळं काही विधिलिखित ठरल्याप्रमाणे 

 नसत पण अटळ , निर्विवाद सत्य 

महाभारत तो नर संहार, तो विजयी उन्माद 

रक्त मांसाचा खच , त्या जीवघेण्या वेदना 


माणूस भविष्याचा वेध घेताना ,वर्तमानात 

जगताना भूतकाळ कडून काहीच कसा धडा

 घेत नसेल ? हाच यक्ष प्रश्न न उलगडणारा 

नव निर्मिती , नवोन्मेष शालिनी प्रज्ञा निरर्थकच 


मनासारखे जगून झाले , पृथ्वीलाही भेदून झाले 

चंद्रावरही घर बांधले पण तुटली मात्र मानवी मने 

काय कमवल , काय गमावलं , काय सोबत नेणार 

धृतराष्ट्राचे स्वप्न भंगले अन गांधारीची ओटी रीती 


भीष्म पितामह , द्रोणाचार्य , कृपाचार्य ,दानशूर कर्ण 

दुर्योधन अन कौरव सारे घमंड , अनीतीने नाहक मेले 

रथी महारथी वीरगतीला ,अर्धन्गिनी विधवा झाल्या 

महाभारत घडले तेंव्हाही अन आताही घडतेच आहे .... 


वाटतं सालं जगायचंच राहून गेलं ..सरते शेवटी 

जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही 

आयुष्यच साधं गणित मानवाला कसं कळतं नाही 

जगा आणि जगू द्या रे आनंदाने, पुन्हा जन्म नाहीच नंतर 



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy