Abasaheb Mhaske

Tragedy

3  

Abasaheb Mhaske

Tragedy

आम्ही नेहमीच नडतो

आम्ही नेहमीच नडतो

1 min
183


माझ्या भक्ताना जाऊन सांगा

पाहिजे ते निःसंकोच मागा

मी म्हटलं तसंच तुम्ही वागा

मला दिलेला शब्द तुम्ही पाळा


माझ्या भक्ताना जाऊन सांगा

सांगितलं तेवढंच डोळे झाकुन करा

आपली अक्कल नका पाजळु

खऱ्या खोट्याच्या फंद्यात नका पडू


माझ्या भक्ताना जाऊन सांगा

गांधींचे ते तीन माकडे काय करणार ?

निषेध , मोर्चे नाही तर कँडल मार्च

त्याने काय होणार रे कप्पाळ


माझ्या भक्ताना जाऊन सांगा

हवं ते करा पण इरादा पक्का ठेवा

आम्ही जे ठरवतो तेच करतो

आता तुम्ही फक्त बघाच


माझ्या भक्ताना जाऊन सांगा

आपण कोण , कोण अडवू शकतो

आम्ही असू केवळ खुर्चीचे पाईक

ती मग भलेही कुणाचाही असो


माझ्या भक्ताना जाऊन सांगा

नवरत्न आम्ही , ब्यरोकेट्स आम्ही

इंग्रज , फ्रेंच डच असो कि मोगल

काय फरक पडतो , आम्ही नेहमीच नडतो


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy