वासना
वासना
*नवरात्रीचे दिवस सुरू होते......
भक्तीमय वातावरण होते....
देवीचा जागर सुरू होता
*तु गं दुर्गां तू भवानी
*संसाराची तू गं जननी
*सारी माया तूझी
*अंबे कृपा करी
*अशी गाणी लावून देवीचाउत्सव साजरा केला जात होता. देवीच्या पुढे नारळ, साड्या, हिरवा चुड्याचा,कापूर, फुलांच्या वेणींचा, हारांचा, फळांचा, नैवेद्याचा सडा पडला होता.... लोक देवीची भक्ती करत होते... नवस करत होते... सतत कृपादृष्टी ठेव असे सांगत होते एकीकडे देवीचा जागर होत होता तर दुसरीकडे त्याच वस्तीच्या शेवटच्या टोकावर जिथे माणसांची रेलचेल नसते अश्या ठिकाणी एका घरात एका मुलीचा विव्हवळण्याचा आवाज येत होता. तिचे हातपाय बांधले होते, अंगावर फक्त एक चादर होती पण ती त्या चादरीत पूर्ण विवस्त्र होती... ती झोपून होती आणि तिच्या डोळ्यासमोर तिचा भूतकाळ पत्त्यांचा महल कोसळावा तसे तिचे आयुष्य झरझर कोसळत होते.
तिचे मनीषा..... दिसायला सुंदर, अतिशय देखणी कोणाच्या ही हृदयात आणि मनात बसेल असे तिचे रूप होते. आईवडिलांची एकुलती एक मुलगी. शिक्षण पूर्ण झाले होते त्यामुळे चांगल्या ठिकाणी जॉबला होती सर्व काही आलबेल होते.गावात ही कित्येक तरुण तिच्या मागावर होते पण तिने कधीच कोणाला भीक नाही घातली.ती आपल्या आईवडिलांची लाडकी व त्यांचा आदेशानुसार राहणारी एक गुणवान, रूपवान मुलगी होती..... हसत खेळत कुटुंब होते... जास्त श्रीमंत नाही पण जास्त गरीब ही नव्हते.... पण कोणाची नजर लागली काय माहीत.... तिच्या ऑफिस मधल्या बॉसच्या मुलांनी आणि त्याच्या मित्रांनी ऑफीसची पार्टी असताना तिच्यावर सामूहिक बलात्कार केला... ही गोष्ट तिने बॉसला ही सांगितली पण वडील असल्यामुळे त्यांनी तिलाच जॉबवरून काढले तसेच तिचे चारित्र्य वाईट आहे असे ऑफिस मधल्या सर्वांना सांगितले.... तिने आपल्या घरात ही गोष्ट आईवडिलांना सांगितली व आपण पोलिस कंप्लेंट करू असे सांगितले पण बदनामीच्या भीतीने आणि तिच्या भावी आयुष्यासाठी त्यांनी तिला कंप्लेंट करू नाही दिली.... कारण ते मोठे लोक होते ते सुटतील पण आपली खूप बदनामी होईल असे आईवडिलांनी तिला समजावले. बिचारीने झालेला सर्व अन्याय मुकाट सहन केला होता... एकटी एकटी रहात होती ना कोणात मिक्स होत होती.. ना कोणाशी जास्त बोलत होती... जसे तिचे या जगाशी नातेच तुटून गेले आहे... सर्व गोष्टीला दोन महिने होऊन गेले अश्यातच एक दिवस तिची
तब्येत खूप बिघडल्याने तिच्या आईवडिलांनी तिला डॉक्टरकडे नेले तिची तपासणी केल्यावर तिला दिवस गेले आहेत हे कळले बदनामी होऊ नये म्हणून आईवडील दोघांनी डॉक्टरांना ते मूल पाडण्यास सांगितले त्यामुळे खूप सारे ब्लड टेस्ट कराव्या लागल्या आणि त्यात निदान झाले की ती एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे.... आईवडिलांसमोर तर आभाळच कोसळले.... त्या चिंतेत आईवडिलांनी फाशी लावून आत्महत्या केली. आता ती पूर्ण एकटी झाली होती... येता जाता लोक तिला टोमणा देत होत... कुठे तरी तोंड काळे केले असेल म्हणुन आईवडिलांनी आत्महत्या केली.... करंट्या नशिबाची, आईवडिलांना खाऊन बसली..असे कित्येक आरोप तिच्यावर लागत होते. सर्वथा एकटी पडली होती.... अश्यातच दोन दिवसा अगोदर पाटलांच्या मुलाने व त्याच्या मित्रांनी तिला जबरदस्तीने उचलून आणले होते ती खूप सांगण्याचा प्रयत्न करत होती..... पण ती ओरडू नये म्हणून तोंड बांधल्यामुळे ती काही बोलू शकत नव्हती आणि ते नराधम मात्र तिच्या शरीराचा लचका तोडत होते आपली वासना भागवत होते... तिच्यातील माणुसकी जागी होती म्हणून ती सांगण्याचा प्रयत्न करत होती.... पण त्यांच्या वासनेच्यापुढे त्यांना तिची माणुसकी दिसत नव्हती एक एक करून सर्व आलटूनपालटून तिच्यावर बलात्कार करत होते....राक्षसासारखे तिच्या शरीराचा प्रत्येक अवयव चुरगाळून टाकत होते इतकेच काय तर एका क्रूरकर्म्याला ही लाजवेल असे तिच्या प्रत्येक नाजूक अवयवाला सिगारेटचे चटके लावत होते..... आणि आज ही तिच्यावर त्यांनी पुन्हा आपला अत्याचार केला होता आपली हवस भागवली होती. आता तिचा शेवटचा क्षण होता....
नराधम परत आले त्यांनी तिच्यावर पुन्हा अत्याचार करण्यास सुरवात केली सर्व झाल्यावर तिचे तोंड उघडले कारण त्यांना माहीत होते ही आता जास्त ओरडू शकणार नाही तेव्हा तिने त्यांना सांगितले.... मी तर आता मरून जाईन आणि अशी काही दिवसानंतर मेलीच असते पण तुम्ही सर्वांनी मला इथे आणून जे केले त्याने तुम्ही ही नाही जगणार हे ऐकताच पाटलांच्या पोरांन तिच्या मुस्काटात हाणली पण ती हसली व तिने त्यांना सांगितले मी एचआयव्हीबाधित आहे..... हेच मी सांगण्याचा प्रयत्न करत होते पण तुम्ही लोकांनी माझे तोंड बांधुन माझ्यावर अत्याचार केला आता तूम्ही ही नाही वाचणार.... सतत तीन दिवसाच्या केलेल्या बलात्कारमुळे आणि अत्याचारामुळे तिने काही क्षणातच जीव सोडला पण पाटलाचा मुलगा आणि त्याच्या मित्रांना जन्मभराची शिक्षा देऊन गेली.