काव्य रजनी

Others

2  

काव्य रजनी

Others

ग्रामीण स्त्री काल आणि आज

ग्रामीण स्त्री काल आणि आज

5 mins
4.5K


       🙏 स्त्री हा विषय अन आशय अत्यंत महत्त्वाचा! जन्मदात्रीपासून जीवनसंगिनी वेगवेगळ्या रूपात आपली भूमिका बजावत असते.


        मला वाटतं २१ व्या शतकातील आपण सुज्ञ, शिकले सवरलेले लोक असा विषय विचारात घेतोय म्हणजे कुठेतरी या दोन गोष्टींचा जवळचा संबंध आहे.


    "आजची स्त्री, यंत्रमानवापरी

अष्टभुजा धारी आधुनिक नारी

गृहकृत्यदक्ष अन्‌ नोकरीवाली

करी तारेवरची कसरत सारी"


     आजची स्त्री याबद्दल काही लिहायचे म्हंटले तर कालची स्त्री कशी होती‌ याबद्दल लिहीणं ओघानेच आले..कालची स्त्री ही देखील कर्तृत्ववान, धैर्य, हिंमत,चिकाटी असणारी होती. त्या काळच्या व्यवस्थेच्या शृंखलेत अडकलेली होती. जाचक रूढीपरंपरेच्या विळख्यात सापडली होती." चुल नी मुलं" हेच तीच विश्र्व होत.. त्यातुनही राणी लक्ष्मीबाई, जीजाबाई, सावित्रीबाई फुले या बाहेर पडून चमकल्या होत्या. त्या काळच्या स्त्रियांना स्वत:चे अस्तित्व निर्माण करावे लागले होते. व्यवस्थेशी झगडावे लागले होते.आणि त्यासाठी कष्ट,अपमान यातना सहन कराव्या लागल्या होत्या. सावित्रीबाईनी मुलींसाठी शाळा काढल्या म्हणून आजची स्त्री सुशिक्षित होऊ शकली. आज ज्या कर्तृत्ववान सुशिक्षित स्त्री चे आपण आधुनिक रूप बघतो..त्याचे सर्व श्रेय सावित्रीबाई फुले यांना जाते..आणखी अशाच काही कालच्या स्त्रीयां कडे हे श्रेय जाते.


     आजची स्त्री आता "चुल नी मुलं" या चौकटीत न राहता ती घराबाहेरील समाजातील विविध क्षेत्रात काम करून नावारूपाला येत आहे.सर्वच क्षेत्रात आजची स्त्री नावलौकिक मिळवित आहे. चांगल्या मोठ-मोठ्या हुद्द्यावर कर्तबगारी करून पुढे जात आहेत.. सर्वच क्षेत्रात पुरूषांच्या बरोबरीने काम करत आहे. ती एवढी कर्तबगार असुन तारेवरची कसरत अगदी सफाईदार पणे करत आहे.


     आजची स्त्री सुशिक्षित, स्वतंत्र विचारांची आहे शिक्षणामुळे तीला स्वत:चे बरे- वाईट कळु लागले आहे. त्यामुळे ती स्वत:चे निर्णय स्वत: घेत आहे आणि ते पुर्णत्वास नेत आहे. ती आता पहील्या सारखी परावलंबी राहीली नाही..स्वभिमानी आहे पण गर्विष्ट,अहंकारी नाही..तसे पाहिले सर्वच स्त्री पुरूष या दोघांत साम्य आहेच.


         आजची स्त्री,जरी सुपरवुमन असली तरी ती कर्तृत्वात, कर्तबगारीमध्ये सुपर वूमन असते. एक स्त्री' या दृष्टीने विचार केल्यास ती शारीरीक दृष्टीने खुप नाजूक असते. एखाद्या नाजुक परी प्रमाणे असते.." स्त्रीवर होणारा अत्याचार," या दृष्टीने विचार केल्यास , चार माणसांपुढे ती" अबलाच" ठरते.. तीची शारीरिक ठेवणच तशी असते. चार पुरूषांना प्रतिकार करायला ती असमर्थ ठरते.


            स्त्री वर होणारा "अत्याचार" .ह्या दृष्टीने विचार केल्यास, कालची स्त्री काय आणि आजची स्त्री काय यात काही एक फरक करता येणार नाही. तशी ती अबलाच होती..आज आहे.. कदाचित उद्या ही तशीच राहील. पण जर लहानपणापासून सर्वच मुलींना कंपल्सरी कराटे च्या क्लासमध्ये टाकले तर पुढच्या पिढीतली स्त्री तरी ' सबला' होऊ शकते


       स्त्रीनेही तिच्या मर्यादा राखावया हव्या...काहीही झाले तरी पुरूषी सत्तेवर हुकूमत गाजवता कामा नये. त्याच प्रमाणे स्त्री म्हणजे उपभोगी वस्तू नाही...हे मूळात लक्षात घ्यायला हवे...तरूण मुलांच्या बाबतीत गुन्हेगारीचे प्रमाण या बाबींचा अभ्यास नसल्याने वाढल्याचे दिसते...छत्रपतींच्या भूमीतील आपण, परस्त्री मातेसमान ही संस्कृती आहे...मात्र काळानुरूप बदल होत गेले...मातेऐवजी इतर नाते निर्माण झाले...आजची स्त्री पण स्वावलंबी बनली...पण याचा अर्थ असा अजिबात होत नाही तिने तिच्या मर्जीने इतरांचा विचार न करता वाटेल तसे करावे..विचार बदलणारे आपणच आहोत. ग्रामीण भागात अजूनही, तरूण मुले स्त्रियांना दुय्यम मानतात...सर्वांना दोष देणे अयोग्य ठरेल...


 "आजच्या स्त्रीची 

काय सांगू महती

जिथे सागरा मिळते धरती 

आताही ही ती आईच असते

पुरुष प्रधान संस्कृती 

सम भासते."


       स्त्री स्त्री स्त्री काय असते हो स्त्री चे अस्तित्व आजची असो व पूर्वीची स्त्री रुढी परंपरा सगळया जरी एकच असल्या तरी नारीशक्ती अताची वेगळी आहे.तेव्हाही खूप काही कष्ट करून स्त्री स्वतःच घर सांभाळायची फक्त फरक एवढाच की तेव्हा घरात राहून गृहिणी कामे करायच्या त्यांना बंधने लादून देलेली असे अताच्या स्त्रीला घराबाहेर पडल्याशिवाय स्वतःच उदार निर्वाह करणे अवघड जाते त्यालाही कारण आहे आपली आर्थिक व्यवस्था .... जर स्त्री ची दुसरी बाजू अशी ही असते आईनेच घरात आपल्या मुलासमोर शॉर्ट्स घातले तर त्याची ती आई अशी व्याख्या पूर्णपणे निखळून जाते.फक्त आजच्या मुलांना नवे ठेवून आणि चुकीचे म्हणून चालणार नाही आपल्याला सर्वांना माहिती आहे पार्वतीने जसे आपल्या शरीरावर असलेल्या मळाचा जसा गणपती बनवला तसे तर आता आपल्याला शक्यच नाही पण मुलांवर पार्वती मातेने जसे संस्कार दिले गणपती आणि कार्तिकेय हे अनमोल रत्न चमकावल तसेच आपणही आताच्या काळात का नाही करू शकत .आजची स्त्री घर सांभाळते सगळे करते तिची जबाबदारी पार पाडते पण त्याहूनही श्रेष्ठ स्वतःच्या मुलांना घडावणे हे मला तरी वाटत आणि सगळ्या स्त्री शक्तीला मान सन्मान देणारी पुढची पिढी निर्माण करणे.पण काही अशीही आहेत ज्यांना फक्त स्त्री म्हणजे वासना याच अर्थाने तिचा संबंध येतो काहीजण तरुण मुलींवर असिड फेकून त्यांचं पुरुषत्व दखुन देतात तर काही जण दहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून निर्भया प्रकरण तर फार पूर्वीचे तिला आत्ता न्याय मिळाला का बरे इतका उशीर लागला काही उमजते का.


अताचे ताजे उदाहरण घ्याना लोकांचे जीव वाचवण्यासाठी रात्रदिवस धडपडणारी तरुण मुलगी स्कुटिवरून जाताना अश्याच तरुण मुलांनी तिला अडवले होते ना तिच्या पेक्षाही लहान होते ते अवघ्या चौदा पंधरा वर्षातले बलात्कार केला पण तिला पेट्रोल टाकून जाळून टाकली किती ती निर्गुण हत्त्या काय झाले त्या नराधम लोकांचं का नाही त्यांना लगेच गोळ्या झाडल्या हे असे आपले सरकार प्रत्येक गोष्टीला साथ का देत्तात.आजची तरुण पिढी जितकी बेजबाबदार तितकीच काही प्रमाणात स्त्री संस्कृती आहे कारण चारित्र्य जपून जी स्त्री स्वतःच्या घरासाठी झटते ती खरी स्त्री, सौ.सावित्री बाई फुले यांनी नव्वारी साडी नेसून खूप मोठी शिक्षण व्यवस्था स्थापन केली लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलेच ना .मग आता शॉर्ट्स आणि जीन्स घालूनच कामे होतात असे शास्त्रीय दष्टिकोनातून तरी बरे नव्हे हाच विचार पुढे तरुण पिढी मध्ये उतरतो.गल्लोगल्ली मध्ये बसणारे तरुण मुले स्त्री कितीही वयाची असली तरी तिच्याकडे ती लांब जाई पर्यंत निहाळत राहतात काय मिळते त्या मुलांना हेच कधी समजले नाही फक्त बघून अश्लील विनोद करून काय मिळते अनिं त्याच जागी आपली बहीण आपली आई असली तर कसे होईल.


   'आई असावी जिजाऊ सारखी

   नको नुसता खोटा देखावा

   तलवार जिजाऊ ने चालवली

   महाराष्ट्राचे रक्षण कराया"

तरुण पिढी निर्माण करा ती

आई बहिणीचे रक्षण कराया

नकोती नुसती अश्लील वानी

परस्त्रीला मातेसंम जाना.

       

      आताची स्त्री स्वतःची देहविक्री करते का करते फक्त पैशांसाठी स्वतःचा अनमोल चरित्र घाण करायचे तुमचे हातपाय धड धाकट असताना कामे करा मेहनत करा धूनी भांडी करा घाण काम करून पन्नास रुपये भेटतो त्या शिवाय कष्ट करून दहा रुपये भेटले तर त्यात समाधान मानले तर काय वाईट होईल. रंभा , मेनका ,उर्वशी ह्या सगळ्या देवी इंद्र दरबारी त्यांच्या नृत्याने देवाचं स्वागत करायच्या पण आता खूप वाईट प्रकारे ज्या स्त्रयां बीयर बार मध्ये नाचून आणि देहविक्री करून स्वतः पैसे कमावतात. पूर्वीच्या स्त्रिया ज्याप्रमाणे स्वतःचे चारित्र्य जपून सगळे काही कर्तव्य पार पाडत होत्या त्यात प्रकारे आताच्या स्त्रिया ही का करत नाहीत फक्त शिक्षणाचा फरक आहे बाकी सध्या स्त्री आणि कालची स्त्री यात जास्त काही फरक आहे असे मला तरी वाटत नाही राहणी मां बोलणे चालणे अथवा एकत्र कुटुंब व्यवस्था अजूनही बऱ्याच ठिकाणी आहे.पण तरीही आजच्या स्त्रीला आणि कलच्याही स्त्रीला माझा मानाचा मुजरा कारण ती आहे तर सगळे विश्व आहे तीचं तर आई आणि तीच तर दुधावरची साई ........


   "जन्मजांमंतरी चे असते

नाते आई आणि मुलाचे 

कुणीतरी व्हा रे

🚩 जिजाऊचा शिवबा

देवकी श्री कृष्णा

सीता माईचे लव्ह कुश

अंजनीचा मारुतीराया

थांबावा स्त्रियांची अवहेलना

गगनपरी चरित्र हो स्रीचे

वासनेची नजर नको झेलण्या

स्त्रिनेही अब्रू ती जपावी

ती नाही रस्त्याची बाहुली

स्वतः स्वतःची ओळख बनवा

होऊनी झाशीची राणी

स्त्री कालची असो व आजची

तिची घ्याहो पुरुषांनो काळजी

नकोत नुसता इंग्रज खेळ

महाराष्ट्राची स्त्री संस्कृती नाळ.....

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺


Rate this content
Log in