Jyoti Bawa

Inspirational

4.0  

Jyoti Bawa

Inspirational

तो प्रवास

तो प्रवास

3 mins
251


जोत्सना एक सर्व सामान्य मुलगी आई वडिलांची आज्ञाधारक ,सर्वांशी प्रेमाने जुळवून घेणारी शिक्षणाची आवड असणारी घरची परिस्थिती सर्वसाधारणच, मागे अजून तीन भावंडे त्यामुळेच वडिलांनी लकरच स्थळ पाहून लग्न ठरवले ,जेमतेम अठरा वर्ष वय होते त्यामुळेच थोडा अल्लड स्वभाव , स्वप्नांच्या जगात रमणारा .पण महेश तसा तिच्या पेक्षा मोठा असल्याने विचारांची तफावत..तो खूपच व्यवहारी तर ती भावनिक अशी दोन टोकं.. पण सहजीवनाचा प्रवास सुरू झाला तिच्या काही सहजसुलभ भावनांचाही महेश विपर्यास करे मग त्यातून खुप तणाव,गैरसमज होत असे हळूहळू तो जोत्सनाच्या प्रत्येक वागण्याचा वाईटच अर्थ काढू लागला आणि त्याचा मूळ स्वभाव ,संशयी वृत्ती बाहेर आली तो सतत तिला चाचपडत असे ,ती माझ्या व्यतिरिक्त दुसर्‍या कुणाचा विचार करते ,अशी असुरक्षिततेची भावना त्याच्यात बळावली मग तो सारखा तिच्यावर संशय घेत असे तिच्यावर पाळत ठेवत ,हळूहळू हे प्रमाण वाढले..ज्योत्याना एव्हानं कळलं होतं आपला सहजीवनाचाप्रवास सोपा नाही त्याचा संशयी स्वभाव हा एक मानसिक आजार आहे हे तिच्या लक्षात आले. खूप संघर्ष करतकरत डाॅक्टर कडे जाऊन ट्रिटमेंट सुरू केली याच काळात तिला दोन मुली ही झाल्या पण ती सतत तणावग्रस्त वातावरणात मुलींना सांभाळत होती रोज नवी काहीतरी विषय घेत त्या दोघांत वाद होत असे वाद इतका विकोपाला जाई की तो तिच्यावर हात उचलत असे..

     हे सगळं वाढतच होते तिचा सगळा वेळ स्वतःला सिद्ध करण्यात जाई.,तिने त्याचा आजार स्विकारला होता म्हणून येईल त्या प्रसंगाला ती सामोरे जात होती स्वप्नात रमणारी जोत्सना अचानक खूप मोठी झाली होती आणि सगळं सावरण्याचा प्रयत्न जिवाच्या आकांताने करत होती पण व्यर्थ होते ..मुलींचे या सगळ्यात खूपच भावनिक नुकसान होतं होतं सगळे कळूनही तिला यातून मार्ग दिसत नव्हता मुलींच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला होता तिला आता मुली किंवा तो असं एकच निवडणे हा एकच मार्ग तिला दिसत होता ,खरंतर तिला कुटुंबातील इतर कोणाची भक्कम साथ हवी होती म्हणजे ती एकटी आता हि परिस्थिती हाताळू शकत नव्हती कारण महेश आता आक्रमक होई मग सगळच खूप टोकाला जाई, तो तिला सतत दोष देणे आणि सोडून दे नाहीतर मी आत्महत्या करीन अशी धमकी देई हा सगळा प्रकार एक आजारच आहे हे तिला कळत होते पण ती एकटी मुली सोबत आता ही परिस्थिती हातळणे शक्य नव्हते आणि त्याला सोडून वेगळा निर्णय घेणे हे ही तिला जमत नव्हतं वीस बावीस वर्ष ती त्याच्यावरच्या प्रेमापोटी आज उद्या सर्व बदलेल या आशेवर सगळ्या प्रसंगातून मार्ग काढत होती..पण शेवटी मुलीसाठी तिला वेगळा निर्णय घ्यावाच लागला ,कारण त्याचा आजार हा तिच्या भोवतीच घुटमळत होता त्याची रोजची तगमग अस्वस्थता तिला आता पाहवत नव्हती काही वाईट घटना घडण्यापेक्षा त्याच्यापासून दूर राहून काही चांगलेच घडेल या आशेवर तिने शेवटी वेगळे होण्याचा निर्णय घेतला .. पण हा सगळा प्रवास तिच्यासाठी खूप खूप काही शिकवून गेला ,शिकवत होता एक सर्व सामान्य मुलगी पण आयुष्यातील हा प्रवास तिला वेगळ्याच वळणावर घेऊन गेला .यादरम्यान ती खूप काही शिकली जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी तिला मिळाली स्वप्नात रमणारी जोत्सना सत्यात जगायला शिकली.. तिचा हा प्रवास फक्त शारीरिक नाही तर मानसिक दृष्टया तिला खूप काही शिकवत होता.


 


 


Rate this content
Log in

More marathi story from Jyoti Bawa

Similar marathi story from Inspirational