Ramesh a Chavan

Crime

3  

Ramesh a Chavan

Crime

तिचं अस्तित्व

तिचं अस्तित्व

18 mins
88


(सुखी चालल्या संसाराची दारूच्या आहारी जाऊन केलेली दुर्दशा घेतलेली उधारी परत न केल्यामुळे सावकाराच्या अत्याचाराला बळी पडलेल्या स्त्री ची कहाणी)

(एक लहान मुलगा दारामध्ये बसलेला असतो)

आज लय उशीर झाला पटपट जाऊदे मला नाहीतर माझं लेकरू वाट बघत असेल बिचारं एकालाच हाय घरला ह्या मूडदया काय ठिकाना नसल घरला (लगबगीने घरी पोचते)

(लहान मुलं) आई आई भूक लागलेय कायतरी खायला दे ना तो अंकू दादा लोज कुकुळे खातो दे काही तली

काय देऊ लेकरा तुला काल तर दिला होता ना रोज रोज नाय मागायचं 

कायतली दे

काय हाय आपल्या घरात द्यायला आणि ते नाय खायचं रोज रोज ती मोठ्या लोकांची पोरं खातात घरात जेवण आहे ते खा

नाय नाय मला पाहि दे पाहि दे(रडत)

मला कुकुळे पाहि दे

गप बस रे  बाप बेवडा कसलीच काय त्याला पडलीच नाय.

मी आपली राब राब राबते आणि तुमची कसंबसं पोट भरते. या खा माझ्या अंगावर थोडपार मांस उरलाय तो खा म्हणजे तुमचा पण पॉट भरल आणि मी पण कायमची सुटेन ह्या नारकातून असा पण तुमचा बाप बेवडा दिसभर ढोसून असतो कसली संसाराची काळजी नाय आणि त्यात हे घेतलेले कर्ज त्या गुलामाचा नुसता पाठी तगादा दोन घरची धुनी भांडी करते त्यावर पैसे मिळतायत त्यात काय करू मी कुठून आणू रोजच तुम्हाला खायला (मुलहा जोरात रडतो)

(आई मायेने कुरवाळत) ये माझ्या लेकरा (कुशीत बिलगत) नका रडू तूमची ही माय जिती हाय तो पर्यंत नाय तुम्हाला उपाशी राहू देणार करू दे तो मुडदा काय करतोय तो

(तेवढ्यात पियालेल्या नवऱ्याची घरामध्ये एन्ट्री होते) 

ये लक्ष्मी कुठ हाय मी आलोय

हो या तुमचीच वाट बघतेय काय आरती करू तुमची 

थोबाड फोडीन तुझा जास्त बोललीस तर(खाली पडतो) 

अहो नाय झेपत मग पिता कशाला एवढि

मी तुझ्या पैश्याची पित नाय समजला चल मला भूक लागली जेवायला ताट वाढ

अजून जेवण नाय झाला घरात व्हता तो बनवायचा ना जेवण

मी जेवण बनवू व्हय मी बनवू तुला कशाला आणलंय लग्न करून ह्या साठीच ना फुकट नाय आणली तुला पैसे मोजून आणलंय तुला समजलं आणि मला सांगते व्हय तुझ्या तर आता (परत पडतो) 

हो त्यासाठीच आणलीत म्हणून मी राबराबते आणि तुम्ही आयत्यावर तुकडे मोडताय 

मला उलटी बोलतेस तुझी एवढी हिम्मत घरात अजून काय मरत होतीस तुला काय काम धंदा नाय चल जेवण वाढ

अहो समजत का नाय तुम्ही घरी लहान लेकरू हाय आणि आपल्याला गिळायला अन्न लागतो त्यात तो कर्ज वाला सारखे पैसे मागतो मी एकटी कमावून किती घर चालवू थोडी तुमची बी मदत झाली तर कशाला कुणापुढे हात पसरवायला पाहिजे कस चांगला संसार चाललं कशाला उगाच कुणाची दगदग आणि जीवाला घोर पायजे 

ये बाई तुझा रामायण चालू नको करू दे ती भाकरी इकडं आणि मला शहाणपण नको शिकवू नायतर मारून टाकीन तुला इथं कायमची समजलं

हो मारा अगदी जीवनाशी मारा मग मी तरी सुटेन मग तुम्ही जीवच रान करायला मोकळे 

(रागात उठून तिला मारायला सुरुवात करतो)

जास्त बोलू नको नाहीतर तुडविन तुला अजून

( पोरं आणि ती रडायला सुरुवात करतात )

मला पैसे दे मला दारू प्यायची  हाय माझी मगाशी घेतलेली उतरली अजून प्यायची हाय

(बायको बोलते )कुठून आणू तुम्हाला रोजरोजचा पैसा घरात  खायला आणायला पैसा नाय  मग तुम्हाला दारू साठी रोज रोज कुठून आणू मी पैसे सांगा महिना झाला आता तो सावकार येल पैसे मागायला सकाळ पासन पोर खायला मागतात कुना कुना साठी देऊ मी पैसे सांगा.

मला माहित नाय पाहिजेत मला 

( पैसे हिसकून घेतो आणि दारू प्यायला निघून जातो)

काय करावं ह्या माणसाचं सांगून समजत पण नाय आणि सुधारत पण नाय चल पोरा दोन घास खा दुपार झालेय आणि झोप आता उद्या(आणि दरवाजा बंद करते)


(अचानक दाराची कडी वाजते)

कोण हाय

मी

कोण मी

कोण मी मला तोंड वर करून विचारतेस पैसे घेताना नाय विचार केला आणि आता कोण मी

अहो साहेब तुम्ही हाय व्हय मला वाटलं दुपारच्याला अचानक कोण आलं हाय म्हणून इचरलं

(दरवाजा उघडते)

या बसा ना साहेब

ते मुडदा कुठे गेला घरात नाय वाटतो

साहेब काय सांगू.....

काय पण बोलू नको मला माहित आहे ना सगळं म्हणून तर मी सगळे पैसे एकदम नाय मागत पण नाय नाय करून अर्धे झाले बघा देऊन बाकी आहेत ते दे हळू हळू आपल्याला घाई नाय

नाय साहेब लवकरच देण तुमचे पैसे साहेब काम पण कमी हाय तेव्हा पैसे पण कमी भेटतात एकटीच्या जीवावर समदं घर चालवाव लागत साहेब

हो कळतो मला तुझी तळमळ हा तुक्या असा बेवडा कामधंदा काय करत नाय त्यानं थोडी मदत केली असती तर बरं झालं असत तुला

हो ना साहेब साहेब तुमच्या वलकीवर कुठं काम असेल तर बघा एकाद

काम भेटेल ग पण ह्यान केलं पाहिजे ना

ते पण खरं हाय साहेब तरीपण बघा कुठं भेटलं तर कसे नाय करतात ते बघते मी पण हा काय माणूस सांगून समजत नाय की सुधारत नाय काय करू मी सांगा तुम्हीच आता साहेब

आता तुझा नवरा मी काय सांगणार कशाला राहतेस त्या सोबत दे की त्याला सोडून आणि जग तुझी तू मोकळी जिंदगी कशाला उगाच पिंजऱ्यात अडकून राहिलीस 

नाय साहेब कुठं जाऊ मी आता हेच माझं घर आणि हेच नरकतील जीवन आता हितच जगायचं आणि मरायचं

असा तर पण ह्या नारकामधून बाहेर पडायला एक मार्ग आहे माझ्याकडे माझं ऐकलस तर चांगले दिवस येतील तुझे बग जमत असेल तर सांग मला

कसला मार्ग साहेब सांगा लय कंटाळा आलाय ह्या जीवनाचा हो का बघ जर तुला वाटत असेल की हे उरलेलं पैसे माफ करावं आणि चांगले दिवस यावे तर एक माझा काम करावं लागेल तुला जमेल का ते बघ

काय काम साहेब धुनी भांडी कपडा लता समद करेन बघा

ये बया माझ्या घरी ढीगभर काम करणाऱ्या बाया पडल्यात त्यात तुला कुठं नेऊन ठेऊ मी 

मग कसलं काम साहेब 

मी काय म्हणतो बघ पटलं तर तुझा नवरा असा हा बेवडा त्यात हे पोर आणि अंगावर कर्ज आणि ह्यांचा खर्च तू एकटी कशी करनार आणि त्यातही तू अशी जवान तुझी ही जवानी का बरबाद करतेस बघ एकदा माझ्याकडे एकदम सुखात ठेवेन तुला राणी सारखी ये फक्त माझ्या मांडीवर येऊन बस बघ तुझा सगळं ठीक होईल त्या बेवाड्याला पण नाही कळणार एकदा फक्त मिठीत ये सगळी गरिबी हटेल तुझी ति पण कायमची आहे मंजूर काय बोल आताच हो नाही बोललीस तरी चालेल विचार करून सांग ह्यात फायदा तुझा आहे सगळं काही भेटेल तुला

साहेब काय पण काय बोलताय  साहेब कष्ट करून जगणारी आम्ही माणसं आहोत असा नका बोलू आणि भले कसाही असुदे माझा नवरा आहे साहेब असा विचार नका मनात आणू असा घीण काम मी कधीच करणार नाय साहेब जा तुम्ही मी देण तुमचं उरलेले पैसे थोडे थोडे

बघ विचार कर अजून वेळ नाही गेली  नाहीतर उगाच पस्तावशील बाकी निर्णय तुझा 

नाय साहेब हे सोडून दुसरं कसलं काम बोला मी करेन पण असा विचार नका मनात आणू जा तुम्ही साहेब उद्या पगार झाला की देणं आणून तुमचे पैसे

बरं बरं जाऊ दे आता आलेली संधी तू सोडतेस सक्ष्यात येणाऱ्या लक्ष्मी ला ठोकारतेस बाकी तुझी मर्जी अजून नाही वेळ गेली आज रात्री परत विचार कर आणि मला सांग सकाळी काय ते 

नाही साहेब आम्ही गरीब हाव पण लाचारी नाय एकवेळ उपाशी झोपू पण असे घाण काम नाय करणार मी आणि मला विचार करायची गरज नाही मी देणं तुमचं पैसे

ठीक हाय तुझी मर्जी चल येतो मी उद्या आणून दे पैसे 

हो

(तो उठतो आणि दरवाजा जवळ जातो जायला आणि ती आपल्या कामाला वळते तेवढ्यात तिचा हात पकडतो)

साहेब काय करताय सोडा माझा हात

नाय सोडणार मला तू हवी आहेस 

चांगले पणी सांगतोय नाय ऐकत मी जिद्दी माणूस हाय तुला माहीत हाय न्हवं जी गोष्ट मला आवडते ती घेतल्या बिगर मी गप बसत नाय 

सोडा साहेब मी तुमच्या पाया पडते सोडा मला

नाय सोडणार तुझ्या ह्या रसारसलेल्या जवानीचा एकदा  मला स्वाद घेऊ दे आज लय दिवसापासून वाट बघत होतो ह्या संधीची गप गुमान तयार हो नाहीतर जबरदस्ती करेन मी

नाय साहेब सोडा

आयला चांगला सांगतोय ऐकत नाय तू थांब आता बघतो कशी माझ्या तावडीतून सुटतेस ते 

(जबरदस्ती कार्याचा प्रयन्त करतो पण ती स्वतःला सावरून ती त्याच्या डोक्यात काठी घालते)

(जोरात ओरडत) चल निघ नालायका आमची इज्जत  रस्त्यावर पडलेय का कुणी बी यायचं आणि लुटायची

(तो परत झुंझायचा प्रयत्न करतो)

(कोयता घेऊन) थांब तिथेच एक जरी पाऊल टाकलं ना तर नरड्याचा घोट घेण मी चालता हो 

तो:- आज वाचालीस माझ्या हातातून पण लक्ष्यात ठेव जातो आता पण एक दिवस नाही तुझा जवानी लुटली तर नाव नाय लावणार(तो निघून जातो)

(जाग्यावर तिथेच बसून रडवलेल्या स्वरात)

देवा काय जे जगणं दिलंस मला काय हे भोग माझ्या नशिबाला अशे दिस दावण्यापेक्षा मरण दे देवा मला मरण दे


(रस्ताने जाताना सावकार)

एवढी हिम्मत तिची मला नाय बोलली आणि माझ्यावर वार करायला उठली एकना एक दिवस दावतो तुला माझा हिंगा मग कळेल सावकार कसा हाय तो लक्ष्मी लक्ष्यात ठेव हा सावकार तुझ्याकडून पैसे वसूल करेल ते पण व्याजासह त्या बरोबर तुझी ही जवानी ही लुटेल लक्ष्यात ठेव मला मारलं काय बघतो तुला


(दोन दिवसा नंतर)

काय रे तुक्या कुठं चाललास०

नाय कुठं मालक 

दारू ढोसायला व्हय अर लेका किती दारू पिशील 

नाय मालक थोडीशी घेतली ती त्यात काय पण नाय होत माझं अजून असती तर बरं वाटलं असतं

अरे वाघ आहेस तू वाघ तुझ्यासारख्याला काय एवढीशी बॉटल म्हणजे पाणी रे पाणी तुझ्यासाठी चल पाजतो तुला 

मालक तुम्ही पण

अरे चल रे तू माझा खास माणूस आहेस चल तू चल मग कसा काय चाललंय तुझं पोरं बाळ ठीक ना 

हो मालक तुमच्या कृपेने समदं ठीक

अरे माझी कसली कृपा मी साधा माणूस अडलेल्याना मदत करणं म्हणजे पुण्याचं काम रे म्हणून करतो छोटीसी मदत बाकी काय नाय रे आणि गाढवा तू एवढा धडधाकट किती दिवस बायकोच्या जीवावर जगणार रे बिचारी राब राब राबते काय करून ठेवलीस तिची हालत तू पण काय तरी कामधंदा कर मग तिला पण मदत होईल बिचारी किती सुकून गेलेय

हो साहेब बघा कुठं काम असेल तर 

आता कसा बोललास चल उद्या नक्की काम बघतो तुला मेहनत करायची आणि खूप पैसे कमवायचे 

हो साहेब

आता बघ माझं तुमच्यावर कर्ज आहे 

हो साहेब

मग मला पण सारखं तुझ्या घरी जाऊन मागायला कसा तरी वाटतो रे बिचारी हात जोडते रे माझ्यासमोर लय बेकार वाटतं मनाला रे पण काय करणार व्यवहार म्हटलं की व्यवहार येतोच

आणि नसले पैसे तर नाही मागत हा मी तसा पण मला कळतो सगळं बिचारीची दया येते रे मला

हो साहेब देऊ हळूहळू 

दया आरामात काहीच घाई नाही मला आता चल तुझी उतरली असेल थोडीशी मार मग चांगलं वाटेल तुला

नको साहेब

अरे चल रे मी काय म्हणतो तुक्या 

काय साहेब 

माझ्याकडून उधारीवर पैसे घेतले होतेस कधी देणार म्हणतो

मालक देतो थोडे थोडे आता तुम्हीच म्हणालात की दे आरामात घाई नाही 

(हसत) अरे घाबरला की काय मस्केरी करत होतो रे अरे वेड्या तू काय देणार पैसे काही कमावतो का तू

सायेब माझी बायको देल पैसे कालच तिचा पगार झालाय

काय घाई नाही रे असंच बोललो मी बाकी वसुली तर तिच्या कडून च करणार मी तू नको काळजी करू चल तुला आज मी पाजतो 

अहो नको साहेब 

अरे चल जेवढी पाहिजे तेवढी पी (त्याला घेऊन जातो)

अण्णा आज मोठे शेठ आलेत जेवढी लागेल तेवढी दारू वता ह्याच्या नारड्यात अगदी जीव जाई पर्यंत कसलीच कमी पडू द्यायाची नाय समजलं

हो शेठ

वा तुक्या आज तुला लॉटरी लागली शेठ तुला पाजतात आज

ये बस तुक्या आज पाहिजे तेवढी पी मज्जा कर

(कॉउंटर ला जाऊन) अण्णा जेवढी मागल तेवढी द्या समजला का 

हो शेठ पण पैसे

अरे मी आहे ना आज माझ्याकडून त्याला पार्टी काय कमी नाय पडला पाहिजे समजलं मला एक काम आठवलं जरा मी जाऊन येतो ह्या तुक्याच्या नादात विसरून गेलो होतो काम लय अर्जंट हाय किती हिसाब होईल ते लिहून ठेव आल्यावर देतो पैसे

हो शेठ 

ये तुक्या लेका पाहिजे तेवढी पी तो पर्यंत मि येतो वसुली करून (आणि तो निघून जातो)

(दुकानाचा मालक) बोला तुक्याशेठ किती बॉटल आणू बोला

आधी दोन बॉटल सोबत मस्त चाकाना घेऊन ये

हो हो आणतो ही घ्या साहेब पॅक भरून देऊ का

नको नको मी घेतो(आणि दारू पियला सुरवात करतो)

(दुसरा बेवडा) अरे वा आज तुझी मज्जा आहे आज सावकार दारू पाजतोय

हो ना नशीब लागतो रे

आम्ही पण येऊ का कंपनी द्यायला

नको तुम्ही तुमची पुढ्यात आहे ती पिया

(तेवढ्यात बाहेरून एक माणूस येतो) अरे वा आज तुक्याशेठ लवकर बसले पियाला ते पण दोन बॉटल घेऊन ये तुक्या बसू का हित 

हो बस की लेका

आणि काय मग तुक्या आज काल सावकारा सोबत फिरतोस लय वजन वाढलं तुझं 

नाही रे सावकार रस्त्यात भेटले बोलले चल पाजतो तुला आणि आले घेऊन

आणि तुक्या कसल्या र पैश्याच्या वार्ता चालल्या होत्या

कसल नाय र शेठ करून कर्ज घेतले होत ना त्याचं अजून बाकी आहेत ना कधी देणार विचारात होते

लेका तू कामधंदा करत नाही मग पैसे कुठून देणार

मी थोडं पैसे देतो बायको देते

मग सावकार कुठे गेले तुला टाकून

माहीत नाय पण जाताना बोलले येतो वसुली करून असेन कुठेतरी वसुलीचा काम गेले असतील 

वसुली करायला अरे तुक्या काय लेका एवढा चांगला गडी तू आणि बायको पैसे देणार शी थु तुझ्यावर अरे पण लेका मी सावकाराला तुझ्या घरच्या दिशेने जाताना बघितली रे घाईघाईने

हो का मग गेले असतील घरी पैसे वसुली करायला आजचे दारूचे पैसे शेठच देणार आहेत आज मी खूप पिणार

अरे तुक्या येड्या माणसा तो तुझ्या घरी गेलाय

हो जाऊ दे मग

अरे समजत कसा नाही तू सावकार एक नंबर चा कंजूष माणूस एक रुपया कधी सोडणार नाय पैस्यांसाठी तो खून करायला पाठीपुढं बघत नाय आणि आज तो तुला दारू पाजतोय आणि तो तिकडे घरी गेलाय अरे जा तू पण घरी नाहीतर लय विकृत माणूस आहे तो पैसा साठी काही ही करेल खूप संसार त्याने उदवस्त केलीत तुला दारू पाजलेय म्हणून काहीतरी डाव असेल त्याचा जा तु 

गप रे अरे पंचपक्वांन समोर असताना सोडून मी कुठ बी जाणार नाय

तुक्या एक माझं नाही तर गमावून बसशील सगळं

गप बस रे मला पिऊदे अशी संधी कधी मिळत नाही मला आज भेटलेय आज खुप पिणार मी 

लेका असा नको करू ज तू घरी बिनकारणा शिवाय दारू नाय पाजनार तो जा तू पळ नाहीतर सगळं गमावून बसशील रे

जा तू हितुन मला पियू दे

जाऊ दे मी तरी कुणाशी बोलतोय मर पी पायजे तेवढी आणि हो बरबाद लावलीस रे संसाराची वाट लावलिस तू


(दुपारची वेळ पोरं घरात खेळत असतो ती कामावरून येते)

चला माझ्या पिल्लांला भूक लागली असेल ना ये माय ने बघ काय आणलंय ते या या माझ्या लेकराला भूक लागली असेल  ना खूप ये माय जवळ ये अरे हे काय खातस कुणी दिल हे तुला किती येल तुला सांगितलं की दुसऱ्यानं दिलेलं खायचं नाय म्हणून (पिशवी खाली ठेवायला वाकते तेवढ्यात)

सोड सोड कोण आहे सोड मला

मी हाय आज बरी गावली तावडीत आज नाय सोडणार तुला 

मूडदया त्या दिवशी च नाय पुरल तर आज परत आलास थांब दावते तुला

(दोघांची खूप खटपट होते पण त्याच्या शरीरसमोर

तिचा काहीच चालत नाही क्षणात कसं आभाळ फाटत तसा तिच्या तो जणू तुटून पडतो जपलेली इज्जत क्षणात भ्रष्ट होतं)

(तो कपडे घालत) तुला बोललो होतो ना की तुझ्या जवाणीची स्वाद घेणार आज झालं माझं स्वप्न पूर्ण आता तू रांड झालीस माझी चांगली भाषा सांगतली तर तुला कळली नाय आता भोग तुझ्या कर्माची फळ (अंगावर पैसे फेकतो) हे घे तुझी आजची कमाई मला फुकट खायची सवय नाय आणि हो आज जे काय झालं ते बाहेर कुणाला बोललीस ना तर तुझ्या नवऱ्याला जिता नाय ठेवणार समजलीस मी माझा मन होईल तेव्हा परत येन गप गुमान झोपायला तयार होयच आरडाओरडा केला ना तर तुझा नवरा..... समजलीस ना तू (तो निघूण जातो)

(त्याच जागी बसलेल्या अवस्थेत आपले कपडे व्यवस्तीत करीत आपल्या निपचित पडलेल्या मुलांच्या देहाकडे एक टक पाहत असते आणि जोराचा टोह फोडते)

नाही माझ्या बाळा काय झालं तुला 

(जाऊन पोराला उठवण्याचा प्रयत्न करते पण तिच ते मुलं कायम चे ते झोपलेल असत कधीच नव्हती न उठण्यासाठी)

ये बाळा उठ ना रे ही बघ तुमची माय खायला घेऊन आले उठ ना लेकरा उठ झोपलास काय बघ तुझ्यासाठी कुरकुरे चॉकलेट आणलाय उठ ना रे बाळा उठ बघ तुमच्या माय ची इज्जत लुटलेय त्या भडव्याने तू तरी उठ बदला घे त्याचा अरे ये चांडाला कुठे आहेस तू तुला फकस्त जेवायला आणि झोपायला बायको पायजे पण आज तो  लांडगा तिच्या शरीराचे  लचके तोडत होता तेव्हा कुठे उरपातला हॊतास रे  संपले रे सगळं संपलं आपल्या बाळाला पण मारलं रे त्याने मी पण संपले र इज्जत लुटली र माझी लुटली तो आज आला पुन्हा येल आणि ह्या शरीरा चे लचके तोडेल काय करू मी 

(उठून आरशासमोर उभी राहते) 

(स्वतःशी बोलत जोरात किंचालते) नाय नाय काय झालं माझं देवा काय मी केलं होतं तुझं वाईट सांग ना मला ह्या नरकयातना दिल्यास(मधेच जोरात हसत) थु तुझ्यावर हा तुझा पवित्र देह पर पुरूषाने भोगला कुठे कुठे कमी पडलिस तू बघ बघ तुझा काय अवतार झालाय तू तुझ लेकरु पण झोपल कायमच आणि तुझा नवरा तिकडं मज्जा करतोय हे कुणाला माहीत पडलं तर नाचकी तुझीच होईल कुणाला बी तोंड दाखवायच्या लायकीची नाही राहिलीस तू अशुद्ध झालीस का का तुझं सौंदर्य एवढं चांगलं होत का ते पर पुरुषाला आवडलं काय करशील हे विटाळलेलं शरीर घेऊन हो मुक्त कायमची ही दुनिया स्वार्थी आहेत इथे जागोजागी स्वापदे उभी राहतील  तुझ्या शरीराची लचके तोडायला नाही सोडणार तुला ते चाळण करतील तुझ्या देहाची लचके तोडतील तुझे तुकडे तुकडे करतील तुझ्या देहाचे विटंबळीस तू जगून काय करणार तू ज निघून या स्वार्थी दुनियेतून (आणि हातातल्या कोयत्याने स्वतःवर वार करते)


(दारू जास्त पियालामुळे तो हँग झालेला असतो उठण्याची ताकत नसल्यामुळे दरवाजातून सरपटत आतमध्ये जातो)

लक्ष्मी ये लक्ष्मी काय केलंस हे बोल ना ग अशी गप का बोल ना उठ ना ग बघ मी आलोय मला भूक लागलेय ग जेवण वाढ ना ये लक्ष्मी ते बघ आपलं बाळ झोपलंय आता उठेल आणि रडेल आई आई म्हणून त्याच्या साठी तरी उठ ना ग ये लक्ष्मी लक्ष्मी मला माफ कर लक्ष्मी तुझा मी अपराधी आहे ग होतीस तेव्हा तुझी कदर नाही मी केली ह्या ह्या बाटली च्या नादी लागून  दारूच्या नशेसाठी आपला  सोन्यासारखा संसार मोडला गोंडस बाळ त्यांचा ही विचार नाही केला माझी बायको लक्ष्मी होती घरची पण नाय समजून घेतली तिला तो जनावर माझ्या समोर तिचे लचके तोंडत होता पण काय नाय करू शकलो मी माझं संसार मीच उदवस्थ केल सगळं माझ्या डोळ्यासमोर झालं पण मी काहीच नाही करू शकलो रडत वाईट दारू वाईट नको आहे मला तो विष ज्यामुळे माझा सगळे कुटुंब सोडुन गेले

(उठून मुलाकडे जातो) ये बाळा तू तरी उठ ना रे बघ बाळा कधी तुला कुशी मध्ये नाही रे घेतली पण बघ आज तुझा बाबा तुला आज कुशीत घेऊन बसलंय बोला माझ्याशी हंस ना मला बाबा बोल ये बाळा उठ ना मी कामधंदा करत नाय म्हणून म्हणून तुझी माय पण रुसले तू तरी नको रागावू रे बापावर ये बाळा उठ ना उठ ना

(पोराला घेऊन तिच्याजवळ जात) ये लक्ष्मी येणं परत बघ मी दारू सोडली माझी शपथ आता नाय पिणार का रागावलीस बघ तुझा नवरा तुझी समजूत काढतोय खूप मेहनत करेन रात दिन काम करेन पण बोला ना माझ्याशी लक्ष्मी माझी लक्ष्मी तुझ्याशिवाय सून सून आहे ग हे घर ये ना ग लक्ष्मी

(रागाने) सावकार नाय सोडणार तुला माझं घर उजडलास तुला ही जिता नाय सोडणार हे रंगताने माखलेले हात सुकायच्या अगोदरच तुझा नाय जीव घेतला तर माझ्या बायको पोरांच्या आत्म्याला शांती नाही भेटणार सावकार

(रागाने कोयता घेऊन बाहेर पडतो)

कुठं लपलास बाहेर ये तू तुझ्या अत्याचारामुळे आज लय जणांचे संसार उदवस्थ झालीत पण आज शेवटचा ह्या पुढे नाय येणार कुणावर अशी येल आज संपवणार तुला

(आणि पाठमोऱ्या चालणाऱ्या सावकाराला)

नराधमा माझं घर उजडलास 

(छातीवर कोयत्याने वार करतो सावकार रक्तच्या थारोळ्यात पडतो त्याच्या छातीवर बसून जोरात वार करतो ओरडत सावकार जागीच गतप्राण होत)

लक्ष्मी बघ तुझा बदला घेतला मी बघ पैसा पैसा करून आणि दुसऱ्यांच्या आया बहिणी ची इज्जत लुटणाराला आज मी कायमची झोपवली

(आणि तिथून निघतो)

काय केलं मी हे आता मी कुठं जाऊ आता घरी वाट बघणारा तर कोणीच नाय जेव्हा होते तेव्हा त्याची काळजी नाही केली पण आता संपल सगळं कुणाकडे बघून जगू मी कुणासाठी जगू मी माझी लक्ष्मी आणि माझं बाळ मला सोडून गेले

मायबाप हो विनंती करतो तुम्हाला ही बॉटल आहे ना काही वेळेचा आनंद आहे पोटात असेल तर फक्त स्वतःला आपण राजा समजतो पण त्याच आनंदाने आज माझा सोन्याचा संसार उदवस्त केला काहीच नाही राहील मागे संपल म्हणून सांगतो हा विष नका पियू होत्याच न्हवत होत सगळं क्षणाची आनंद मिळतो पण कायमच आयुष्य भराच दुखः देऊन जातो काय होत माझ्या लक्ष्मीचं अस्तित्व हेच की स्वतःच मन मारून  आमच्यासाठी जगली पण जाताना वेदना अत्याचार आणि दुःख घेऊन गेली कायमची गेली कायमची गेली आता ती नाही हाय ह्या दुनियेत ती गेली नजरेआड गेली आता नाही येणार परत कधी नाही दिसणार कधी ती गेली पण आता उरलय फक्त तिचं अस्तित्व तिचं अस्तित्व (रडत) 


मिळाला दोन क्षणांचा आनंद

हा देह नशेमध्ये असताना

पहिला मी माझ्या डोळ्यांनी

माझा संसार उदवस्त होताना

 संसार उध्वस्त होताना


Rate this content
Log in

Similar marathi story from Crime