सय-एक गोड आठवण
सय-एक गोड आठवण
मावळतीला सूर्याच्या शलाकांनी क्षितिजाला ताब्यात घेतले होते. रंगभूमीवर नाटकाचा एक अंक संपल्यावर जसे पटल पडते ना तसंच काहीसं इथे घडत होतं. दिवसाचा अंक संपून आता रात्र होणार होती अन् तिमिराचे राज्य येणार होते.
दरम्यानची सांजवेळ मात्र खूप सुखद वाटत होती. जगण्याचं गुपित साठवलेले मन शांत झाले होते. आणि अचानक... वाऱ्याचा मंद स्पर्श झाला अन् अधर गुणगुणू लागले...
"कोवळ्या सयींनी सांज धुंद झाली
सरतो आहे दिन अन् रात्र मंद झाली..."