स्वावलंबी मुलगी
स्वावलंबी मुलगी
एके काळी एका शहरात एक कुटुंब राहात होते.त्या कुटुंबात एक मुलगी जन्माला आली. ती खूप सुंदर व धष्टपुष्ट होती. परंतु ती वयाच्या नवव्या महिन्यात गंभीर आजारी पडली. त्यातच नियतीने तिचे कान व डोळे हिसकावून घेतले. परंतु अशा परिस्थितीत तिचे आई-वडील खचले नाहीत धाडसाने परिस्थितीशी सामोरे गेले. त्यांच्या मुलीला परिस्थितीशी लढायला शिकवले.
ती हळूहळू मोठी होत गेली.आणि आई वडिलांच्या मदतीने तिने शिक्षणाचा मार्ग निवडला.ती शिक्षणात प्रगती करू लागली. आणि सुदैवाने तिला एक चांगली शिक्षका मिळाली. ती तिला अंध लोकांची लिपी म्हणजे ब्रेल लिपी शिकवू लागली. ती त्यात पारंगत झाली. व यशस्वी होत गेली आणि अशाप्रकारे तिने तिचे शिक्षण पूर्ण केले. आणि नियतीच्या पुढे हात न टेकता ती स्वतःच्या पायावर उभी राहिली. व डॉक्टर ची पदवी बहाल केली.
तिच्यासारख्या मूकबधीर व अंध मुलांवर उपचार करू लागली. व ती जगातील पहिली मुलगी ठरली जी अंध व मूकबधीर असून डॉक्टर झाली .व तिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तिने तिच्या आई वडिलांचे नाव मोठे केली. अशाप्रकारे ती एक धाडसी व स्वावलंबी मुलगी म्हणून समाजापुढे वावरू लागली.
