STORYMIRROR

PRATAP CHAUHAN

Inspirational

2  

PRATAP CHAUHAN

Inspirational

स्वातंत्र्यवीर

स्वातंत्र्यवीर

1 min
189

बाबाराव आणि विनायक (स्वातंत्र्यवीर) यांचे हे धाकटे बंधू. दोन्ही भाऊ अंदमानामध्ये असताना यांनीच घरची आणि देशातील अनेक भूमिगत स्वातंत्र्यसैनिकांची जबाबदारी सांभाळली. १९०६ साली विनायकरावांनी २० पिस्तुलांचे एक पार्सल भारतात पाठवले. ते पोलिसांना चुकवून आणण्याचे आणि लपविण्याचे काम नारायणराव यांनी केले. यातील एका पिस्तुलानेच पुढे अनंत कान्हेरे यांनी ब्रिटिश अधिकारी जॅक्सन याचा वध केला. यावेळी झालेल्या धरपकडीत नारायणरावांना अटक झाली आणि सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा झाली. 


नारायणराव (बाळ) सावरकर हे कलकत्याला दंतवैद्यकीय शिक्षणासाठी असताना डाॅ. हेडगेवार यांना भेटत असत. केशव बळीराम हेडगेवार हेही तेथील वैद्यकीय काॅलेजच्या वसतिगृहात राहात असत. तेथे अंदमानाहून विनायकराव सावरकर यांची पत्रे येत असत. यातून डाॅ. हेडगेवार यांनी स्फूर्ती घेऊन पुढे क्रांतिवीर बाबासाहेब सावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पायाभरणी केली . त्यांत नारायणराव यांचेही योगदान होते. नारायणरावांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड येथील चवदार तळे आणि नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात भाग घेतला होता. 

नारायणराव सावरकर यांनी मुंबई येथे "श्रद्धानंद" नियतकालिक चालविले. ते केसरी, नवाकाळ, प्रभात इत्यादी वृत्तपत्रात लेखन करून आणि स्फूर्तिदायक भाषणे करून जनजागृती करीत असत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या "हिंदुत्व" आणि "हिंदूपदपादशाही" या इंग्रजी ग्र॔थांचे मराठीत भाषांतर करून ते डाॅ. नारायणराव सावरकर यांनी प्रसिद्ध केले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational