सुदामा
सुदामा
सुदामा हा गरीब घरचा मुलगा होता. तो वृंदापरीला राहत होता. लहानपनी विद्या शिकण्यासाठी ते सांदीपनी गुरूला भेटाला गोकुळात आले आणि त्या गुरूपासून शिक्षा घेण्यासाठी वेद-पुराणाचं ज्ञान घेण्यासाठी गोकुळात आले. ते आश्रमात गेले तिथे इंधन नव्हते मग सुदामा आणि श्रीकृष्ण दोघे पण कुऱ्हाड घेऊन गेले आणि पाणी चालू असतांना खूप ओले झाले पाणी जास्त असल्यामुळे ते ओले झाले आणि थकले, एका झाडावर जावून बसले. सुदामाला खूप थंडी लागत होती, आणि भूक पण लागली होती, सुदामा घरून निघतांनी फुटाणे घेऊन आले होते आणि झाडावर बसून कृष्णाच्या लपून फुटाणे खात होते आणि त्याचा कडकड आवाज कृष्णाला ऐकू येताच कृष्णाने सुदामाला विचारले, आवाज कशाचा आहे म्हणून तेव्हा सुदामा म्हणाले, की थंडीमुळे माझे दात वाजत आहे. अशाप्रकारे त्यांची मजा येत होती.
ते गोकुळातच राहत होते, नंतर खूप मित्र सवंगडी त्यांना मिळाले पण सर्वांत जवळचा मित्र सखा होता, "श्रीकृष्ण" आणि ते सर्वजण मिळून दह्याची मडकी फोडत होते, खूप खोडकर होते. सुदामा आणि कृष्णाची मैत्री म्हणजे भावाभावाचं प्रेमच होतं. सुदामा गरीब होते त्याची गरीबाची झोपडी होती. लहानाचं मोठे ते गोकुळात झाले आणि विद्या संपल्यावर आपल्या गावी परत गेले मग त्यांचा विवाह झाला. त्यांनी त्यांची आणि श्रीकृष्णाची कथा त्यांच्या पत्नीला सांगितली आणि ते खूप गरीब असल्यामुळे त्यांची पत्नी त्यांना म्हणत असे तुमचा सखा राजमहालात राहतो मग तुम्ही का त्यांना भेटायला जात नाही आपले हाल त्यांना सांगा त्यांना तुमची दया येईल.
श्री कृष्णाच आणि सुदामाचं मैत्रीच नातं हे सदैव अतूट होतं...
