स्त्री
स्त्री
नमस्कार सर्वांना !
आज मी माझा पहिला लेख लिहीत आहे . खूप विचार केला पण, लेखना करिता विषय सापडत नव्हता . मी स्वतःलाच बोलत असतांना पुटपुटले "लिहायची त खूप इच्छा आहे पण , लिहावे कश्यावर ?" मैत्री वर ? कि प्रेमावर ? जातीवर ? कि जाती वर चालत असलेल्या राजनीतीवर ?
मनातून आवज आला , अश्या विषयावर लिहावं ज्यावर फारस बोल जात नाही . किंवा त्या विषयावर लिहावं इतका तो विषय कोणाला महत्वाचा वाटत नसावा . चला तर मग ! मी ज्यास्त वेळ न घेता माझ्या विषयावर येते . आजचा माझा विषय आहे "स्री " ती स्री जी एक मुलगी असते , ती स्री जी एक सून असते , ती स्री जी एक बायको असते , ती स्री जी एक आई असते . वव्यक्तिमत्व एक पण भूमिका अनेक ! असा उल्लेख केला तरी चालेल . कारण हे फक्त तीच करू शकते ती . एक मुलगी जरी असली तरी दहा मुलांना पुरून उरेल इतकी तिच्यात सामर्थ्य असते . ती एक सून असली तरी दोन कुटुंबाना जोडून ठेवण्याची जादू असती तिच्यात . ती एक बायको असली तरी नवऱ्याच्या प्रत्येक सुख - दुःखात ती खमकी उभी असते . म्हणूनच तिला अर्धांगिनी म्हणत असावे . आणि , सर्वांना पुरून उरणारी आई देखील ती असते . आई चा महिमा सांगावा तितका कमीच आहे . खरं तर , आपल्यापयकी कोणीच ना आईची जागा घेऊ शकत ना आईचा महिमा काही शब्दात मांडू शकत . असो विषय तो नाही विषय आहे " ती "....
आपल्या सर्वांची अशी समज आहे कि आता आपण एकविसाव्या शतकात जगतो , आपल्या सर्वाना आपल्या हक्का साठी लढण्याचा सर्वांना सामान अधिकार आहेत . पण, खरंच असं आहे का ? पुरुषप्रधान जातीचं ठीक आहे , ते त्यांना हवं तस वागू शकता , समोरच्याला त्याच्या इचे प्रमाणे वागायला लावू शकता . पण, कितपत स्त्रिया वरील उल्लेख प्रमाणे वागतील? अथवा वागू शकतील ?
जरी आपण एकविसाव्या शतकात राहत असलो तरी , आज पण मुलीनं करिता एक मर्यादा आहे आणि ती मर्यादा प्रत्येक गोष्टी बदल आहे . शिक्षनापासून ते लग्ना पर्यंत , बोलण्यापासून ते चालण्या पर्यंत, बसण्यापासून ते उठण्यापर्यंत , पण एक गोष्ट मी इथे आवर्जून नमूद करू इच्छिते काही मुलींच्या बाबतीत वरील मर्यादा अपवाद असतात .पण, फहक्त काही मुलींच्या बाबतीत ! आणि मी हि गोष्ट नकी सांगू शकते कि ह्या काही मुली तळहाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच असाव्यात . मुलगी झाली कि लहान पणी पासून तिच्या लग्नाची काळजी . आणि ती काळजी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या पुढील प्रसंगातून आढळून येते . समजा, मुली च वजन ज्यास्त असेल तर कस तिनी वजन कमी करायला हवं हे सांगितल्या जाते , जर मुलीचं वजन कमी असेल तर कस तिनी वजन वाढवण्याची गरज आहे हे तिच्या मनावर बिंबवल्या जाते . जर ती मुलगी सपष्टवक्ती असेल त कश्या प्रकारे ती तिच्या या स्वभाव पाई माहेरी परत येईल हे सांगितल्या जाते . अश्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतींनी मुलींनी कस परफेक्ट असायला हवं हे सांगितल्या जाते . अरे कम ऑन यार्र्रर्र्र ! ती मुलगी आहे कोणतं रिमोट कंट्रोल वरच खेळणं नाही , किंवा दुकानातली वस्तू नाही कि त्या वस्तू मध्ये फौल्ट आहे म्हणून ती वस्तू गिराहीक विकत घेणार नाही . ज्या प्रमाणे एखादी वस्तू आवडल्यास गिराहीक थोडं फार ऍडजस्ट करून का होईना ती वस्तू विकत घेतो का? त ती त्याला खर्च मनातून आवडलेली असते . तसेच जर एखाद्याला एखादी मुलगी खरंच मनातून आवडत असेल तर तो तिच्या सोबत लग्न करेलच ती जाड आहे कि बारीक, उंच आहे कि ठेंगणी , गोरी आहे कि काळी या सर्व गोष्टींचा त्या मुलाला काही फरक पाडणार नाही . आणि ती जशी असेल तस तो तिला aacept करेल .
तुम्ही कधी बघितलं का ? मुलगा खूप वेळ पासून बाहेर आहे म्हणून त्याला "कॉल ,म्यासेज , करून कुठे आहे ? घरी कधी येणार ? किती वेळ अजून? बाहेर जायची वेळ काळ काही आहे कि नाही ?" अश्या आमुक काही प्रश्नाच्या कुंपणात उभं केलं असावं आणि जरी वरील प्रश्न केले तरी त्यावर फारशी कारवाई करण्यात येत असेल असं मला तरी नाही वाटत ! हेच सर्व जर एका मुली सोबत घडले ती फार काळ घरा बाहेर राहिली तर कश्या प्रकारे तिनी घरी उशिरा येऊन अक्ष्यम गुन्हा केलेला आहे हे सिद्ध केले जाते . मग त, त्या बिचाऱ्या मुलीच्या मनात आपण घरा बाहेर का पडलो ? इथं पासून ते आपण आता कधी घर बाहेर पडायचंच नाही इथं पर्यंत विचार येतात .
असो , अश्या बऱ्याच छोट्या - मोठ्या गोष्टी आहेत ज्या कडे आपण फारसे लक्ष्य देत नाही . पण आपण सर्वानी मिळून जर अश्याच काही छोट्या मोठ्या गोष्टीं कडे लक्ष्य दिले आणि ह्या सर्व गोष्टी नीट करण्याचा पर्यटन केला तर , आपल्या भारतातील मुली पूर्ण पणे स्वतंत्र व्हायला वेळ लागला नाही .
धन्यवाद🙏 !
लेखिका - कल्याणी पांडे
