स्त्री शक्ती
स्त्री शक्ती
नारी तू महान विश्वाची आहेस शान स्त्रियांचा आदर जेथे केला जातो तेथे लक्ष्मी वास करते. अनादी काळापासून स्त्रियांचा आदर व सन्मान केला जातो. गार्गी, मैत्रेयी सारख्या विद्वान स्त्रियांनी राज्यकारभार चालवला होता. कुटुंब प्रमुख म्हणून स्त्रियांनी राज्यकारभार चालवला होता. तसेच कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी स्त्रियांनी पार पाडली.
स्त्री अनेक भूमिकांमधून जात असते. मुलगी, पत्नी, आई, आजी, पणजी, अशा भूमिका तिला पार पाडाव्या लागतात. मुलगी म्हणून असताना आई- वडील, भाऊ - बहीण या सर्वांचा मान राखावा लागतो . घराच्या प्रगती साठी सर्वोतोपरी करावे लागतात. कोटुंबिक मर्यादा व आज्ञा पाळाव्या लागतात. पत्नीच्या भूमिकेत पतीचा मान सन्मान वाढिण्याकरिता प्रयत्न करावे लागतात. काही काळातच स्त्री आई बनते. मुलांचे संस्कारक्षम संगोपन - आदर्श व्यक्तीमत्व घडवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. जीवनाचा मोठा काळ मुलांच्या संगोपनात गेल्या नंतर हिच स्त्री आजी बनते. मुलांची लग्न झाल्यावर कुटुंब विस्तार होऊन सूना - नातवंडे येताच आजीची भूमिका पार पाडावी लागते. नातवंड सांभाळताना घर एकत्र राहण्यासाठी प्रयत्न करावे लागतात.
स्त्री आणि पुरुष संसाररुपी रथाची दोन चाके आहेत. कुटुंब व्यवस्था उत्तम रितीने पार पाडण्यासाठी दोघंही तितकेच महत्वाचे आहेत. आजची स्त्री ही समस्त नारी शक्तीचे प्रतिनिधित्व करते. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया अग्रेसर आहेत. पुरुषाच्या बरोबरीने सर्वच ठिकाणी काम करत आहेत. आजची स्त्री ही शक्तीसंपंन्न असून सबल झाली आहे
एकविसाव्या शतकात स्त्रीने आपली शक्ती ओळखली आहे. ती आपल्या आधिका रासाठी संघर्ष करताना पण दिसत आहे आज असे येक क्षेत्र नाही जिथे स्त्रीचा वावर नाही. आज तिचं रूप बदललं खरं परंतु एक गोष्ट तशीच चालत आलेली आहे, " चूल आणि मूल " स्वतःला घडवण्या सोबत घराची जबाबदारी अशी दुहेरी भूमिका तिला पार पाडावी लागते.
मुळात भारतीय महिला कधी आबला नव्हतीच . भारत हा नवदुर्गे ची पूजा करणाऱ्या संस्कृतीचा , स्त्रीशक्तीचा देश आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा सहभाग असतो असे म्हटले जाते. इतिहासातले अनेक महापुरुष स्त्रिमुळेच घडले.
निसर्गाकडून काही देणग्या पुरुषा पेक्षा जास्त स्त्रियांना दिल्या आहेत. स्त्री मध्ये सहनशीलता , नाविन्यता, सौंदर्याची जाणीव , काटकसर , वक्तशीरपणा, दूरदृष्टी, हे गुण स्त्रियांमध्ये जन्मजात असतात. आपल्या देशात महिलांसाठी आपल्या देशात महिलादिन , जननी सुरक्षा दिन असे दिन साजरे करतात. आजच्या स्त्री विषयी काही ओळी.....
'तू माता तू सरस्वती' .
तूच कालिका तूच रणरागिणी
तूच सखी आणि तूच दामिनी
तूच इंदिरा तूच झाशी.
तू जिजाऊ तू सावित्री.
तू प्रतिभा तू कल्पना
तूच यशाची आहेच खात्री
आजच्या स्त्री विषयी असे म्हणावे वाटते तुझ्यातील रणरागिणी वारे घुमू दे व अखंड वाहू दे काल काय आणि आज काय या पुढे ही तू तुझे नाव उज्ज्वल कर. तुझ्याशिवाय या जगाचा उद्धार होऊच शकत नाही.
"प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीच असते. महिलांना द्या सन्मान देश होईल महान"
