स्त्री सदैव बंदिस्त
स्त्री सदैव बंदिस्त
अनेक उदाहरणे आहेत की महिलेच्या प्रत्येक गोष्टीवर पुर्ण परिवाराचे नियंत्रण असते जसे की एखादी स्त्री जेव्हा आई होणार असते आणि अगोदर ही तिला अनेक मुलीचं असतील तर घरच्यांची इच्छा असते मुलगा होण्याची , तीच मत कोणी जाणुनच घेत नाहीत उलट तिलाच लाजिरवाणे शब्द , अपमानास्पद वागणूक देतात ए व्हडच नाही तर तुला जर मुलगा झाला नाही तर दुसरं लग्न करून देवू मुलाचं अशाही धमक्या देतात ,मग ती नाईलाजास्तव तयार होते आई होण्यासाठी तर ... मग मुलगा नसेल तर गर्भपात असे एक, दोन , .....कुणाकुणाच्या नशिबी तर दहा दहा वेळा गर्भपाताची वेळ येते या मुलगा होण्याच्य इच्छेखातर
असाही मानसिक, भावनिक त्रास आपल्या समाजातील अनेक भगिनींना होतो .
आजच्या शतकात ही परिस्थिती स्त्री भ्रूनहत्या बंदी असल्यामुळे बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आलेले आहे.
पण जेव्हा बंदी नव्हती तेव्हा मात्र अनेक स्त्रियांचे मृत्युदर वाढला होता या प्रकरणामुळे .
खूप वाईट वाटायचे जेव्हा मी स्त्री भ्रूनहत्येचा विचार करायची . सर्व जणांना मुलगी नको वाटते म्हणून . मग ज्या स्त्री च तिच्या इच्छेविरुद्ध गर्भपात होतो ती स्त्री बंदिनी च म्हणावी लागेल ना चुकीच्या हव्यासापोटी बळी जाणारी अबला नारी . .....
अनेक स्त्रियांना तर त्यांचा काही दोष नसताना ही त्यांना घटस्फोट देण्यात येतो. मग त्या स्त्री च्य त्यागाचे , समर्पणाची किंमत divorse देवून केली जाते.
कधी हुंड्यासाठी त्रास , कधी मूल होत नाही म्हणून त्रास , सर्व दिशांनी फक्त दोषी करार फक्त आणि फक्त महिलांनाच
पुरुषाचे बाहेर काही भानगड असेल तरीही दोष मात्र तिलाच . बाई बरोबर नव्हती म्हणून तर त्याने असे केले .
अशा प्रकारे अनेक ठिकाणी तर मी असे ही पाहिले आहे की घरातील सर्व सुशीक्षित आणि समजदार असेल की ते सूनाना मुलीप्रमाणे जीव लावतात तिचे सर्व लाड पुर्ण करण्यासाठी पुर्ण घर अका बोटावर तयार असते. त्या स्त्री ला घरातील लक्ष्मी असे समजून तिला मान देतात ती सदैव आनंदात राहावी यासाठी प्रयत्न ही करतात .
पण तिला बाहेर जायला बंदी असते . कोणाशी मन मोकळे बोलायलही चोरी असते . मग तीही बंधिस्त .
म्हणजे जन्म झाल्यापासून स्त्री ही बांधिस्त आहे .
