STORYMIRROR

Arjun Munde

Others

2  

Arjun Munde

Others

आठवणीतील क्षण

आठवणीतील क्षण

4 mins
127

     माझी शिक्षिका म्हणून प्रथम नेमणूक जिल्हा परिषद प्राथमिक विद्यामंदिर ,मोयखेडे दिगर तालुका : जामनेर ,जिल्हा: जळगाव येथे झाली . माझे या गावातील अनुभव फार छान आहेत . शाळा आठवीपर्यंत होती . शाळेभोवती चा परिसर अतिशय निसर्गरम्य आणि सुंदर होता. मी आणि राधा शाळेवर जॉईन झालो. खुप छान दिवस होते ते. दररोज आम्ही नवीन काहीतरी करायचं असा निश्चय आम्ही घेतला. आम्ही अतिशय उत्साहाने कामाला लागलो . मुलांना जास्तीत जास्त ज्ञान देण्याचा प्रयत्न करणे हा आमच्या दोघींचा आवडीचा छंद होता. परिसर नवीन त्यामुळे तेथील भाषा शब्द सगळच नवीन होत आम्हाला. आम्ही दररोज ना समजलेल्या शब्दांची चर्चा करायचो . त्यातून आमची भाषा शब्द संपत्ती वृध्दी गत होत गेली. 


      पोटाच्या मुलीप्रमाणे आम्हाला जीव लावला सर्वांनी. त्यामुळे तो गाव ती शाळा तेथील सर्व अनुभव अविस्मणीय आहेत. त्यातील काही मोजके अनुभव मी सादर करणार आहे.आम्ही दोघी मिळून शाळेत जायचो. खेडेगाव होते तरी आम्हाला एकमेकी सोबत वेळ कधी कसा गेला हे समजयाचेच नाही. आमचा स्टाफ पण अतिशय प्रेमळ आणि जीव लावणारा होता त्यामुळे आम्हाला घराची आठवण येवू दिली नाही . शाळेत आलो तरी घरात असल्या प्रमाणे वाटायचे. 


      आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री.विजय रामचंद्र पाटील, श्री.पद्माकर तायडे ,श्री. शिवाजी पालवे , श्री . जितेंद्र पाटील, श्री म. राधा मान्ते, श्री म. जयश्री गुट्टे इ. होते . मोयखेडे दिगर या गावातील एक मंदिर खूप प्रसिद्ध आहे. "नरहरी महाराज मंदिर " हे जागृत देवस्थान आहे .अशी सर्व भाविकांची श्रद्धा आहे. मलाही मंदिर आवडायचे.


       अशीच एकदा आमच्या शाळेची सहल नेण्याचं ठरवलं . सर्वानुमते शेगाव आणि आनंद सागर या ठिकाणी सहल नेण्याचे ठरले. सहल जाणार म्हणून सर्वांचाच उत्साह वाढला होता . आम्ही सहलीला जाणाऱ्या मुलांच्या याद्या बनवल्या. पालकांचे संमती पत्र जमा केले. s.t. महामंडळाने दिलेल्या तारखेनुसार आमची सहल जाण्याची तारीख ,वार ,वेळ निश्चित झाली. पहाटे साडे चार लाच शाळेच्या मैदानात जमा होण्याचे ठरले. मला व राधा कडे मुलांची पहाटेची हजेरी घेण्याची जबाबदारी दिली होती. आम्ही सर्व मुलांना आवश्यक त्या सर्व सूचना दिल्या . सर्व जण खूप आनंदात होतो . सहल हा एक आनंद उस्तव वाटायला लागल. 


     राधा व मी पहाटे ३:३० वाजता उठलो.आंघोळ करून मस्तपैकी स्वयंपाक केला .छानपैकी नवीन साड्या घातल्या आणि तयार झालो. डब्बे आणि पाणी बॉटल सर्व तयार केले. आणि शाळेच्या मैदानात गेलो . सर्व विद्यार्थी आमच्या अगोदर शाळेत हजर होते. आम्ही हजरी घेतली . परत मुले आणि मुली मोजल्या. तितक्यात सहलीला जाणाऱ्या गाडीने हॉर्न वाजवला . सर्व जण एकदम आनंदात बसस्टँड वर गेलो . गाड्या एकदम नव्या होत्या खूप छान वाटलं . सरांनी सर्व मुले परत मोजले . नंतर सर्व जण बस मध्ये चढलो. सरांनी नारळ बसच्या चाकाखाली ठेवले . सर्व मुलांनी आनंदात नरहरी महाराज की जय असा जयजयकार केला. अंगावर रोमांच आले जयजयकार ऐकून आणि आमचा सहल प्रवास सुरू झाला.


       आमची गाडी ८:३०वाजता नांदुरा फाट्याजवळ आली . तिथे 105 फूट उंच हनुमानाची मूर्ती आहे . त्यावेळी नेमका मूर्तीचा अभिषेक सुरू होता. आम्ही अभिषेक पूर्ण होई पर्यंत थांबलो दर्शन घेतले आणि पुढे निघालो. गजानन महाराज यांच्या मंदिरात आम्हाला सहल असल्यामुळे लगेच प्रवेश मिळाला . आम्ही सर्व मंदिरात गेलो . मूर्तीसमोर उभे राहता च माझ्या डोल्यामधून आनंदाश्रू मन भरून मूर्तीचे नेत्रसुख घेतले. मन श्रध्देने आणि भक्तीने भरून आले. मन प्रसन्न झाले. 


     मंदिरातून बाहेर आलो . शॉपिंग करण्यासाठी फक्त 10मिनिटं वेळ दिला. विद्यार्थी आणि आम्ही दुकाने पाहीली .हव्या असणाऱ्या वस्तू आम्ही घेतल्या. नंतर आम्ही सर्व बसने आनंद सागरला गेलो. नावाप्रमाणेच हा खरोखर आनंदाचा सागर वाटायला लागलं . सर्व परिसर फार स्वच्छ आणि सुंदर होता.माझी पहिलीच वेळ होती जाण्याची . मला तो बस पार्किंगचा परिसर पण खूप आवडला. मनात म्हणाले बाहेर इतकं छान आहे तर आत तर किती किती छान असेल .


       आम्ही सर्व मुलं मुली एका बाजूला उभे राहिलो . सर्व सर यांनी मिळून प्रवेश तिकीट काढले आणि आम्ही आत निघालो. मध्ये जाताना सुरुवातीला प्रवेशद्वार फारच सुंदर आहे. सर्व मुलं आनंदात सर्व गोष्टींचे बारकाईने निरीक्षण करू लागले . मी प्रवेशद्वारावरील नक्षीकाम , हत्ती हे काळजी पूर्वक पाहून नजरेत समाविष्ट करत होते त्या गोष्टीचे सौंदर्य. खुप छान वाटलं . तो अनुभव आणि त्या आठवणी विसरता येत नाहीत. इतका सकारात्मक प्रभाव त्या गोष्टीचा मझ्यावर पडला .

       

      नंतर पायऱ्या होत्या दोन्ही बाजूंनी पाणी वाहत होते . पायऱ्या संपल्या की समोर पाहिलं तर सर्व महाराष्ट्र मधील थोर संत यांचे दर्शन झाले. गणपती मंदिर, शिव मंदिर . मत्स्यालय पाहिलं . मुलांना खेळण्यासाठी असणाऱ्या पार्कमध्ये नेले मूल पण छान खेळली . मी आणि राधा ने पण झोका खेळला . नंतर सर्वांना एकत्रित जमा केले . मुलांची हजेरी घेतली तर एक मुलगा कमी होता आणि सर्व जण घाबरलो . मग तायडे सर म्हणाले मी आणतो त्याला तुम्ही सर्व इथेच बसा आम्ही सर्वजण बसलो एका बाजूला. तायडे सरही लगेच आले त्या मुलाला घेवुन. तो खेळत खेळत थोडा समुहापसून दूर गेला हे त्याचे त्यालाही कळाले नाही. आम्ही सर्व गाण्यांच्या भेंड्याही खेळलो . नंतर गरमागरम पोहे आणि इमरती जिलेबी खाल्ली सर्वांनी फार स्वादिष्ट होते सर्व . नंतर आम्ही जलाशय, जलपरी ,झुलता पूल पाहिलं . स्वर्गाहून सुंदर वाटत होत सर्व . मग आम्ही परत पुढे पुढे गेलो . ध्यान मंदिरात फक्त शिक्षकांना प्रवेशाची परवानगी मिळाली . आम्ही सर्व विद्यार्थ्यां ना रांगेत बसवले आणि  


अर्धे शिक्षक अगोदर आणि नंतर अर्धे असे धून मंदिरात जायचं ठरलं. आम्ही गेलो आणि आनंदचे परमोच्च सुख, शांती समाधान मला ध्यान मंदिरात जाणवली. मी सर्व गोष्टी आत्मिक अनुभवत होते. "धरती पर स्वर्ग है तो यही है " याचा अनुभव मी त्या प्रेक्षणीय स्थळी घेतला. आम्ही सहल खूप एन्जॉय केली. परत निघालो . आम्ही 9 जानेवारीला शेगावी गेलो. रात्री 12वाजले तरी आम्ही सर्व बसमध्येच होतो सर्व शांत असताना शिवानी नावाची माझी लाडकी विद्यार्थिनीने अचानक, हॅपी बर्थ डे टू यू जयश्री मॅडम... अशा शुभेच्छा दिल्या. खुप मोठं सरप्राईज ठरलं ते माझ्यासाठी. मी तो क्षण कधीही विसरणार नाही. 


    सर्व जण मोयखेड्यात पोहचलो . सर्व विद्यार्थी घरी गेले सुखरूप आपल्या आपल्या पालकांसोबत .


Rate this content
Log in