STORYMIRROR

Arjun Munde

Tragedy

2  

Arjun Munde

Tragedy

स्त्री सदैव बंदिस्त

स्त्री सदैव बंदिस्त

1 min
71

आयुष्यात अनेक व्यक्ती येतात, सर्वांचे अचुक बारकाईने निरीक्षण करणे हा माझा आवडीचा छंद आहे . प्रत्येकामध्ये अनेक चांगल्या गोष्टींचा समावेश हा नक्कीच असतो. बाबांनी मला शिकवलं की इतरांच्या चांगल्या गोष्टी आत्मसात करायच्या . असं केलं आणि करत राहिलं की आपल्या व्यक्तीमत्त्वाबाबत अमुलाग्र बदल घडतो आपल्यात सकारात्मकता वाढीस लागते.

 मला अनेक पती पत्नी यांच्या नात्याबाबत निरीक्षण करायचा छंद मला लागला . त्यातुनही अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. 

काही काही ठिकाणी मला असं जाणवलं की स्त्री ही फक्त एक गुलाम आहे. घरातील सर्व मंडळी हे बिनधास्त आयुष्य फक्त एका स्त्रीमुले जगतात . पण त्या महिलेला सर्व गृहीत धरु लागतात . कोणत्याही गोष्टीसाठी तिला काही कळत नाही

असंच तिच्यावर बिंबवले जाते , चारचौघात तिला बघा चुलीकड असं टाकुन उतरुन बोललं जातं. आजही अनेक खेड्यातील महिला अशा मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या देखील करतात . आपण आज एकविसाव्या शतकातील सर्वात जबाबदार नागरिक आहोत हे जसे त्रिकालाबाधित सत्य आहे. त्याप्रमाणे आणखी एक सांग ते. एका स्त्री ला समान वागणूक मिळत नाही . तिला ना आचार स्वातंत्र्य ना विचार स्वातंत्र्य आणि अनेक ठिकाणी तिला पैसे खर्च करण्याचे ही स्वातंत्र्य नाही. 

अनेक जणांना माझे वक्तव्य हे जास्त शहाणपणा चे वाटेल , 

पण ही एक गंभीर समस्या आहे. स्त्री ही सतत बंधनात असते. ती कधीही स्वातंत्र्य नाही. 

     अनेक ठिकाणी तिला खुप स्वातंत्र्य असते . तर लगेच फार कामातुन गेलेली आहे असं म्हटलं जातं.

असे अनेक न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तिला जाते. तिच्यावर अनेक प्रकारच्या बंधनकारक गोष्टी सतत लादल्या जातात.



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy