स्त्री एक प्रश्न
स्त्री एक प्रश्न
जडण घडण या विषयावर मला लिहायाच आहे समजल्यावर मी माझ्या आतापर्यंतच्या आयुष्याच्या प्रवासाबद्दल विचार करू लागली. माझं बालपण , माझं तारुण्य, माझं वयवाहिक जीवन , माझ्या आयुष्यातील या काळात आलेला चढ उतार.
यादरम्या मिळालेल्या प्रत्येक अनुभवाची मी मांडणी करत होते.
काही गोष्टी मिळाल्या, काही गोष्टी गमावल्या.विचार करता करता जाणवल प्रकर्षाने आपण आयुष्यातुन वजा झालेल्या गोष्टीकडे बघतो . पण अधिक झालेल्या गोष्टीसाठी वेळही देता येत नाही. खरंतर आपण त्या गोष्टींना गृहीतच धरतो.
मी आता असं मांडल्यानंतर आता सर्वाना त्याची जाणीव झाली असेल. पण आज मी जडण घडण म्हणजे माझ्या आयुष्यावर काही बोलणार नाही. माझ्याकडे एक असा विषय आहे जो समाजात प्रथम स्थानावर आहे. तो म्हणजे स्त्री, मी स्त्रीयांच्या जडण घडनेबद्दल बोलणार आहे .
समाजामध्ये आता स्त्रियांना प्रथम स्थान दिल जातं, आपला समाज हा पुरुषप्रधान नाही कारण स्त्रियांही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत असं बोल जात. पण
खरंच असं होत का? कारण आजही स्त्री शिक्षण आणि तिच्या अधिकारासाठी कितीतरी खटले चालताना कोर्टात बघितले आहेत मी. याउपरोक्ष सामाजिक मंच्यावर जे अधिकारी एखाद्या स्त्रीचा सत्कार करताना दिसतात, तिने केलेल्या कामगिरीबद्दल सांगून स्त्री किती कणखर आहे सांगतात हेच अधिकारी घरी असणाऱ्या त्यांच्या महिला वर्गाला म्हणावा तसा अधिकार देतात का?
स्त्रीयांनी प्रत्येक क्षेत्रात स्वतःला सिद्ध केले आहे.
शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले , Dr.म्हणून रमाबाई जोशी, योद्धा म्हणून झाशीच्या राणी, पोलीस अधिकारी म्हाणून किरण बेदी, उत्तम खेळाडू म्हणून पिटी उषा, अंतराळ यात्री म्हणून कल्पना चावला या आणि अशा अनके स्त्रिया आहेत. पण यांच्या या प्रवास एक स्त्री म्हणून त्यांना भोगावे लागणारे कष्ट, यातना याचा विचार करता अजूनही आपण जुन्या परंपरा कवटाळून बसलो आहोत हे प्रकर्षाने जाणवतं.
मोठ्या हुद्यावर स्त्री असली तरी रात्री उशिरापर्यंत बाहेर होती त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागत. पण पुरुष उशिरा आला तर कामात व्यस्त असणार म्हणून वेळ जहाला असेल असं गृहीत धरलं जातं. स्त्रीने घरी सर्व गोष्टी करताना वीचारून करायच्या पण पुरुष मात्र न सांगता निर्णय घेऊ शकतात.
स्त्रियांनवर होणाऱ्या या अन्यायाला मला वाटतं कधी कधी स्त्रियांही काही प्रमाणात जबाबदार आहेत. कारण जी आई आपल्या मुलीला तिच्या प्रत्येक निर्णयात पाठिंबा देते आणि तिला समजून घेते तीच आई सासू म्हणून वेगळी असते.
तसेच एकाच कार्यालयात कामं करणाऱ्या दोन स्त्री कर्मचारी एकमेकांशी छान मिळून मिसळून वागतात पण दोघिमध्ये एकीची प्रगती होत आहे दिसल्यावर सर्व काही विसरून तिला मागे खेचण्यासाठी प्रयत्न करतात. स्त्री म्हणून तिने घर, ऑफिस आणि मुलं हे सर्व जातीने लक्ष द्यायचं पण हे करत असताना कधी थकून जर तिने स्वतःला होत असणारा त्रास सांगितला तर तू काही नवीन करत नाही सर्वच स्त्रिया हे करतात. असं बोलून तिने केलेल्या कामाला शुन्य ठरवून टाकतात. अशा वेळी आपण का आणि कोणासाठी जगतोय हा एकाच प्रश्न असतो समोर.
एका स्त्रीला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवाऱ्या बरोबर एक सांत्वनाचा हात पाहिजे असतो. पण तोच न मिळाल्यामुळे कधी कधी ती आधारासाठी, स्वतःला रमवण्यासाठी , स्वतःच्या आनंदासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिच्या चरित्र्याची पावती मागणारे पण खूप लोक उभे असतात. अशी वेळ आली तरी ती घाबरत नाही. पण ती कोलंडून पडते , जेव्हा तिची रक्ताची माणसं देखील त्याच लोकांमध्ये असतात. शब्दांनी नाही पण त्यांच्या नजरेतल्या त्यांच्या प्रश्नानेच ती हरते.
बालपणी मुलगी म्हणून असं करू नकोस तस करू नकोस , तरुणपणी मुलगी म्हणून हे शिक ते शिक, लग्नानंतर या जबाबदाऱ्या घे त्या घे आणि स्वतःला सिद्ध कर.
प्रश्न उत्तराची मेफील
डोळ्यातल्या भावनांना ओठावर आणले तिने
घाबरत का होईना स्वतःचे मन मोकळे केले तिने
प्रश्न आणि उत्तरांचा मग सुरु झाला प्रवास
प्रवाहाप्रमाणे वाहायचा स्वभाव तिचा खास
कोणत्याच प्रश्नांना तिने अनुत्तारित नाही सोडलं
उत्तर देता देता तिचं आयुष्य मात्र संपलं
वाहून गेलेल्या पाण्याप्रमाणे एक दिवस तीही वाहून गेली
प्रश्न उत्तरांची ही मैफिल ती गेल्यावरही तशीच सुरु राहिली
स्त्रियांच्या या जन्माला वाटतं खरंच काही किंमत नाही
तिच्या असतित्वाची जाणीव शेवटपर्यंत कोणालाच का नाही
समाजात ही आणि अशी खूप उदाहरण आहेत ज्यामुळे एकंदरीत स्त्रीच्या जडण घडणावर कधी कधी प्रश्न उभे राहतात. म्हणून या उद्भवणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधून जर का आपण खऱ्या अर्थाने स्त्रीला प्रथम स्त्रीने सन्मान दिला तर भविष्यात उभं असणार चित्र हे वेगळ असेल.कारण वरती दिलेल्या प्रत्येक उदाहरणात स्त्रीला स्त्रीने आधार दिला असता किंवा तिच्या दुःखाच्या मुळापर्यंत जाऊन तिला बाहेर पडण्यासाठी मदत केली असती तर कोणी तिला चुकीच ठरवायला धजावलंच नसतं. पण संस्काराच्या, रूढी, परंपरेच्या नावाखाली स्त्रीला नेहमी वाकवलं जातं.
स्त्रीकडे बघण्याचा दृश्चिकोन बदलात तर खऱ्या अर्थाने स्त्री समजेल.
