Pooja Yadavrao Bhange

Tragedy

4.2  

Pooja Yadavrao Bhange

Tragedy

संवाद - मग , "चूक कोणाची" ?

संवाद - मग , "चूक कोणाची" ?

1 min
1.7K


पत्नी : जर आपल्या आई-वडिलांंची सेवा करण्याची जबाबदारी आणि अधिकार जर मुलींवर असला असता तर ......

पती : तर काय ?

पत्नी : ‌‌‌ अहो ! काही नाही , आता राहू द्या !

पती : अगं ! ऐकतोय मी बोल ना पुढे .....

पत्नी : ‌ ‌ जर आई - वडिलांंची सेवा करण्याचा हक्क मुलींना दिला असता तर या देशात "वृद्धाश्रम" नावाचा शब्दच संपुष्टात आला नसता .

पती : ‌‌‌ का ?

पत्नी : ‌‌ कारण या देशात एकही वृद्धाश्रम राहिला नसता .

पती : ‌‌‌ एकदम चूक !

पत्नी : ‌ ‌ चूक कोणाची ?

पती : ‌‌‌ प्रत्येक मुलींची !

पत्नी : ‌‌. ते कसे ?

पती : अगं ! काही नाही राहू दे ना आता !

पत्नी : ‌‌. सांगा ना ! ऐकतेय मी .

पती : ‌. जर प्रत्येक मुली लग्न झाल्यानंतर आपल्या सासरलाच माहेर समजून व तसेच आपल्या सासू-सासर् यांनाच आपले आई-वडील समजून दोन शब्द प्रेमाचे बोलत असले तर देशात काय पूर्ण जग फिरलो तरीही एक वृद्धाश्रम दिसला नसता !!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy