"जीवन" - एक प्रवास !
"जीवन" - एक प्रवास !

1 min

1.9K
आयुष्यभर सोबत असून
जवळ कधी बसत नाही
एकाच घरात राहून आम्ही
एकमेकास दिसत नाही
हरवला तो आपसातला
जिव्हाळ्याचा संवाद
एकमेकांस दोष देऊन
. . नित्य चाले वादविवाद
धाव धाव धावतो आहे
दिशा मात्र कळत नाही
हृदयाचे पाऊल कधी
हृदयाकडे वळत नाही
इतक जगणं झालं पण
जागायलाच वेळ नाही
. . जगतो आहोत कशासाठी
. काहीच कसलाच मेळ नाही !
क्षण एक येईल असा
घेवून जाईल हा श्र्वास
अर्ध्यावरच थांबलेला असेल
हा जीवनाचा प्रवास !
अजूनही वेळ आहे
आनंदाने जगूया....
. सुंदर अशा या सृष्टीला
डोळे भरून बघूया !