शोध अस्तित्वाचा
शोध अस्तित्वाचा
लग्न तसं उशिरा म्हणजे वयाच्या तिसाव्या वर्षी झालं. लगेच वर्षभरात छानसा मुलगा झाला. सगळे खुप खुश होते. घर, ऑफिस, बाळामध्ये पूर्णपणे रमली होती ती. पण बाळ तीन वर्षांचे तरी अजून बोलत नव्हते. सर्व चाचण्या केल्यानंतर कळले की बाळ स्वमग्न आहे. अन् पायाखालची जमीन हादरली तिच्या. हळूहळू ती डिप्रेशनमध्ये जाऊ लागली. नोकरी सोडावी लागली. आपल्याशिवाय बाळाचं कोणीच करू शकणार नाही हे उमगलं तिला. मग बाळाच्या विविध थेरेपीमध्ये गुंतून गेली ती. जीवन पार बदलून गेलं तिचं. पोहण्याच्या क्लासला बाळाला घालून बाळाला समुद्रात पोहण्याच्या राज्यस्तरीय स्पर्धेत उतरवून तिने स्वतःला व बाळाला सिद्ध केलं अन् तिच्या अस्तित्वाचा शोध तिला लागला. जिद्द सोडायची नाही.