VIJAY WATHORE

Inspirational

1.5  

VIJAY WATHORE

Inspirational

शेवटची भेट...

शेवटची भेट...

3 mins
3.3K


आजचा दिवस लवकर जातोय असं वाटत होतं. सकाळपासून मन नूसतं बेचैन झालं होतं . ऑफिसमध्ये कामात लक्ष लागत नव्हतं , आजची संध्याकाळ होऊच नये असं वाटत होतं पण वेळ कोणासाठी थांबली आहे का ? बघता बघता पाच वाजले आणि मी ऑफिस मधून निघालो. तिने नेहमीप्रमाणे मला गार्डन ला भेटायला बोलावलं .ती सहा वाजता येणार होती...

म्हणून मी १५ मिनिटं आधीच आलो होतो.खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं हवी होती मला तिच्याकडून....

संध्याकाळची वेळ असल्यामुळे पाणीपुरीवाले,भेळवाल्यांचा खुप गोंगाट आणि रहदारी होती.म्हणून मी पुढे जाऊन एका ठिकाणी बसलो.समोर बगीचा..त्यात मऊ मऊ गवत पसरलं होतं आणि क्षितिजाजळ सूर्य मावळत होता..जणू तो काही आज आमच्या भेटीच्या साक्षीसाठी थांबला होता.इतक्यात ती समोरून येताना दिसली. आज माझ्या आवडीचा सफेद रंगाचा सलवार-कमीज घातला होता.खूप सुंदर दिसत होती आणि मावळत्या सूर्याच्या गुलाबी प्रकाशात तीच ते सुंदर रूप अजूनच खुलून दिसत होतं..पण आज रोजच्यासारखं हसू तिच्या चेहऱ्यावर नव्हतं.खूप शांत दिलेत होती ती..आणि त्याला कारणही तसंच होतं. ती माझ्यापासून थोड्या अंतरावर बसली.आम्ही दोघेपण शांत बसलो होतो..कोणीही बोलायच्या मनस्थितीत नव्हतं...अस वाटत होतं वेळेचं चक्र थांबलं की काय..आणि..

माझ्या डोळ्यासमोर ती घटना पुन्हा आठवली...

७ दिवस अगोदर

मी : का पियू ? सोड सगळं आपण परस्पर लग्न करू .मी सगळं मॅनेज करतो.तू टेंशन काहीही नको घेऊ...

पियू : नाही विजू... मला नाही जमणार.. मी माझ्या आई-वडिलांच्या विरोधात नाही जाऊ शकत ..मी त्यांना समजावेन...

मी : पण किती दिवस ..तीन महिने झाले रोज तेच चालू आहे आपलं..तुझ्या घरचे ऐकणार नाहीत...मला माहिती आहे.

पियू : पण मी अजून प्रयत्न करतेय...

मी : पण हे किती दिवस चालणार पियू ते आपल्या लग्नाला कधीच परवानगी देणार नाहीत ..हे मला माहिती आहे आणि तुलाही पण ..तरीही हा अट्टाहास का ?

तुझं माझ्यावर प्रेम आहे ना..बस मला एवढं पुरेसं आहे..आपण नव्याने आपलं आयुष्य सुरू करू...तू फक्त हो म्हण ...

पियू : नाही विजू मी नाही सोडू शकत माझ्या आई -वडिलांना...मला ते हवे आहेत .

मी : मग मी नाही हवा ?

पियू :- मला तुम्ही दोघेही हवे आहात... मी काय करू ?

मी : हे बघ तुला काय तो निर्णय घ्यावाच लागेल...एकतर मी किंवा तुझे आई वडील ?

मी सगळा निर्णय तुझ्यावर सोडलाय .(आणि मी निघून गेलो)

चार दिवस आम्ही एकमेकांना ना फोन केला ना मॅसेज... सहाव्या दिवशी तिनेच फोन केला..

पियू : हॅलो विजू....मी बोलतेय .

मी : हो बोल ...काय काम आहे.

( थोडा वेळ ती बोललीच नाही )

मी : पियू तू आहेस ना...

पियू : हो..आहे...(तिचा आवाज जड वाटत होता)

मी : काय झालं ?

पियू : मी माझ्या आई-वडिलांना नाही सोडू शकत....

विजू तूच सांग मी काय करू...आपणाला वेगळं व्हावच लागेल ..माझ्याकडे काहीच पर्याय नाही...

...आणि ती रडायला लागली .

मला काय बोलावं हेच कळेना ...मला हे उत्तर अपेक्षितच नव्हतं...

पियू : तू मला उद्या संध्याकाळी भेट ....

आणि तिने फोन ठेवला...

विजू ......विजू..... तिच्या आवाजाने मी भानावर आलो...

विजू खूप उशीर होतोय..मला निघायला हवं.

इतक्यात तिने तिच्या पर्समध्ये हात घातला आणि मी दिलेली सर्व ग्रीटिंग आणि लेटर मला दिली.

मी : का पियू ? तुला आता मी नकोसा झालोय?

पियू : नाही विजू ...मी तुझ्याशिवाय कोणावरही प्रेम केलं नाही..पण काही प्रश्न असे असतात , ज्यांची उत्तरं न सापडलेलीच बरी... प्लिज विजू आता मला काहीच विचारू नको.

मी ही त्यावर काही बोललो नाही...आम्ही दोघ तसेच शांत बसलो होतो...सूर्य क्षितिजावरून खाली जात होता.जणूकाही तोही सांगत होता ..आता वेळ संपत आली आहे.

ती अचानक उठली आणि मला म्हणाली ,

विजू ....(तिचे डोळे लाल झाले होते...तिला शब्द जड झाले होते.) मी..मी आता तुला कधीच भेटणार नाही.

तिने माझा हात तिच्या हातात घेतला . आणि म्हणाली . विजू मला विसरण्याचा प्रयत्न करा..माझ्या सगळ्या आठवणी विसरून जा. माझ्यासाठी तू आयुष्य खराब करू नकोस ...

खूप मोठा हो.मी आता तुला कधीच भेटणार नाही..ही आपली शेवटची भेट ...आणि ती मला तिथेच सोडून निघून गेली आणि मी तसाच तिच्या पाठमोऱ्या छबीकडे पाहात राहिलो..शेवटपर्यंत.....


Rate this content
Log in