शाकाहारी मासांहारी
शाकाहारी मासांहारी
प्रिय मधुरा,
शाकाहार मांसाहार हा फारच मोठा विषय आहे आणि त्याच्या घरचे पाणी सुद्धा न पिण म्हणजे भेदभावाला खतपाणी घालणे होय. माझ्या बऱ्याच मैत्रिणी माझ्या घरचं पाणीसुद्धा पीत नाही कारण आम्ही शाकाहारी मांसाहार दोन्ही खातो. यात त्याचा श्रध्देचा विषय म्हणून मी सोडून देते किंवा उगाचच आग्रह धरत बसत नाही. पण एके दिवशी काही कामानिमित्त माझी मैत्रीण भर दुपारी घरी आली सोबत मुलगाही होता तीचा,तो मुलगा उन्हात लालबूंद झाला होता,ओठ कोरडे दिसतं होते,
मी तिला त्याला दोघांनाही पाणी घेऊन आले,ती त्यावर बोलली अगं तुम्ही नॉनव्हेज खाता ना आम्हाला चालणार नाही म्हणून.तीच काही वाटलं नाही मला परंतू त्या मुलाला हवंय पाणी मला दिसतं होते.मग तीला मी विचारलं तुमच्या सोसाइटीत विहीर आहे का गं,नाही तर तु अस का विचारतेय मला, मग पाणी कुठंन येत मी, मैत्रीण कार्पोरेशनच येत गं,सकाळी तुमच्या सोसाइटीत पाणी वाॅचमनच सोडत असेल ना,त्याला विचारलंस काय तू शाकाहारी कि मांसाहारी मग रोज बर त्याच्या हातचं पाणी पितेस गं,मी तीला बोलले नियम पाळायचे तर सर्व ठिकाणी नाहीतर पाळायचे नाही, बाजारातून भाजीपाला,वस्तू खरेदी करतांना बरं तु विचारत नाही हा प्रश्न,ते सोड गं,पाणीपुरीच्या गाड्यावर पाणीपुरी बरी खातेस आम्हा मैत्रिणीं सोबत तेव्हा बर त्याला विचारत बसत नाही भैया कुठंन पाणी आणलस आणि तु नाॅनव्हेज खातो का नाही खात ते,हे सर्व कस आपल्या सोयीनुसार सर्रास करायचं नाही का?? ठिक आहे तुम्ही पाळतात काही गोष्टी मी त्याचा आदर करते पण प्रत्येक वेळी सक्ती करायलाच हवी का??लेकरू बघ तहानलेले गं?इतकं सांगूनही तीला काही फरक पडतांना मला दिसलाच नाही मग मी आपण नंतर कधीतरी बोलू तु आधी घरी जा अस बोलले ती तसीच घरी निघून गेली पाणी न पिता.
मधुरा हे सगळं यासाठी सागीतल कि माणसांवर प्रथांचा किती पगडा आहे त्यात जीव गेला तरी चालेल पण तो सोडायचा नाही. मुळात मला अस वाटतं( हे माझं व्यक्तीगत मत आहे) हे अस कोणताच देव,धर्म सांगत नाही मग असंच असतं तर कोकणातील बर्याच देवीदेवताना माशांचा नैवेद्य असतो,सप्तश्रृंगी देवीला बोकडाचा नवस असतो अस वेगवेगळ्या का प्रथा असाव्यात,का माणसांनी स्वताःच्या सोयीनुसार तयार केलेल्या मला तरी वाटतात. हा विषय इतका प्रगल्भ आहे ना मधुरा जितकं आपण बोलू तो वाढतच जाणार म्हणून मी मध्यम मार्ग निवडला,
"शाकाहार मांसाहार असा भेद नसावा ज्यास जे जे आवडतं ते ते त्याने खावे" यात कुणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही याची मी पुरेपूर काळजी घेते. धार्मिक विषयाला साद घालून मोठमोठी सरकारं, पक्ष निवडून येण्याची ताकद असते तर आपण यात दोघी कुठेच नाही.
