STORYMIRROR

ABHAY BAPAT

Crime

3  

ABHAY BAPAT

Crime

सा य ना ई ड - भाग 1

सा य ना ई ड - भाग 1

4 mins
214

गुंगीत असलेली ती मुलगी कोचावर पहुडली होती,तिचा डावा हात लांब पसरला होता.

 तिच्या बाजूला जो माणूस उभा होता,त्याने आपल्या हातात टेप रेकॉर्डर चा मायक्रोफोन धरला होता.

"तुझं नाव काय आहे?" त्याने विचारले.

माणसाच्या आवाजाच्या कंपनाने टेप रेकॉर्डर वरचा एक दिवा लुकलुकला.

त्याने डाव्या हाताने टेप रेकॉर्डर च्या आवाजाच्या पातळीत थोडा बदल केला.

त्याचा आवाज शांत,ठाम, सकारात्मक वाटावा असा होता. गरजेपुरता भारदस्त, अधिकार युक्त होता. मुलीच्या अंतर्मनात उत्तर देण्यासाठी विरोध निर्माण होणार नाही इतपत हुकुमी आवाजात त्याने सावकाश पुन्हा प्रश्न विचारला

"तुझं नाव काय आहे?"

गुंगीत असलेली मुलगी चुळबुळली,तिच्या पापण्या फडफडल्या.

माणसाच्या आवाजात घाई-आतुरता नव्हती फक्त पूर्वीचाच शांत अधिकारयुक्त आग्रह होता.

"तुझं नाव काय आहे?"

यावेळी मुलीचे ओठ थरथरले, स्वर औषधाच्या अंमलाखाली असल्यासारखा अस्फुट होता,आवाज न कळण्या जोगा होता.

"तुला जरा मोठ्याने बोलावे लागेल"

तिला शुद्धीवर आणण्याच्या खटपटीत त्याने पुन्हा आग्रह धरला, "तुझं नाव काय आहे?"

"अनन्या"

"आता कसं छान ! तुझं पूर्ण नाव काय?"

"अनन्या"

"तुझं पूर्ण नाव"

"अनन्या गुळवणी"

",-ट्रुथ सिरम नावाच्या औषधाने माझी कसोटी घ्या असं मला सांगीतल्याच तुला आठवतंय?"

उत्तरा ऐवजी तिने आळसटलेली जांभई दिली.

‘ आठवतंय का तुला?"

"हो"

"तू सहकार्य करशील असं वचन दिलं होतंस."

"होय."

"तू करणार आहेस ना सहकार्य?"

"हो."

"तुझा उजवा हात हलव, अनन्या"

तिने उजवा हात हलवला.

"छान, आता जरा तुझा उजवा हात वर उचल."

उजवा हात हलला पण उचलला गेला नाही

"तुझा उजवा हात उचल, अनन्या. “

अनन्या,उचल तुझा उजवा हात ! घे वर.”

हळूहळू हात उचलला गेला,त्याचा तिला होणारा त्रास जाणवत होता

"उंच उचलून धर, उंच उचलून धर अनन्या, उंच"

" छान, छान,आता सोडून दे तुझा हात खाली. खरं सांग मला, तू या जगात कोणाचा तिरस्कार करतेस का?"

"आता नाही"

"तुझा कोणी तिरस्कार करतं का?"

"आता नाही"

"तू कोणाच्या प्रेमात पडली आहेस का?"

"हो"

"अत्ता पर्यंत तू कुणाचा तिरस्कार केला होतास का?"

"हो"

"स्त्री चा की पुरुषाचा?"

"पुरुष"

"कोण आहे तो माणूस?"

"तो जिवंत नाहीये"

"अनन्या, मी डॉ. डोंगरेआहे ,मी तुझा डॉक्टर आहे, तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे?"

"होय"

"तू तुझ्या बद्दल सर्व काही मला सांगशील?"

"होय"

"तू संपूर्ण सत्य सांगणार आहेस का?"

" मी....होय"

"तू तिरस्कार केला आहेस असं कोणीतरी आहे?"

"हो"

"तो जीवंत आहे?"

" नाही “

"कधी गेला तो?"

"उन्हाळ्याच्या सुरुवातीला"

"कसा गेला तो?"

गुंगीतल्या त्या मुलीने सहजतेने आणि नैसर्गिक पणे उत्तर दिले, 

" मी ठार मारलं त्याला"

डॉ. डोंगरे पुढच्या प्रश्नाची तयारी करत होते,ते दचकून मागेच हटले, त्या झोपळू आवाजाने त्यांना चांगलाच दणका दिला.

शुद्ध पाणी आणि सोडियम पेंटोथोल भरलेल्या काचपात्रा शेजारी उभ्या असलेल्या, त्यांच्या नर्स कडे त्यांनी दृष्टिक्षेप टाकला. बेशुद्धी आणि औषधाची सुस्ती याच्या सीमा रेषेवर ती मुलगी राहील आणि खोटं सांगण्याची मानसिक शक्तीच तिच्यात राहणार नाही या साठी आवश्यक तेवढाच द्रवाचा डोस तिच्या रक्त वाहिनीत जात होता.

" अनन्या,तू मला ओळखतेस का?"

" मी ओळखते तुम्हाला"

"तुझा माझ्यावर विश्वास आहे का?"

"हो"

"अनन्या, तू मला सत्यच सांगितलं पाहिजेस"

"मी सत्यच सांगते आहे"

"कुणाचा तिरस्कार केलास तू?"

" माझे काका हर्षल यांचा “

"तुझ्या म्हणण्याचा अर्थ हर्षल मिरगल?"

"हो."

"ज्याने तुझाही तिरस्कार केला तो कोण होता?"

"हर्षल काका च."

"तो मेला?"

" हो,तो मेलाय."

डॉक्टर नी पुन्हा नर्स च्या भावना हीन चेहेऱ्याकडे पाहिले.

ते थोडे संकोचले , नंतर म्हणाले, "अनन्या,मला खरं सांग,कसा मेला तो?"

"मी मारलं त्याला.”

"कसं मारलंस त्याला तू?"

"विष प्रयोग"

"का मारलंस त्याला तू?"

"मला दूर निघून जायचं होतं"

"कशा पासून दूर जायचं होतं?"

"गायबच व्हायचं होतं"

"का?"

"निमिषने माझ्यावर प्रेम करू नये म्हणून"

"निमिष कोण?"

"निमिष जयकर"

"कोण आहे हा ज्याच्यावर तू प्रेम करतेस?"

" निमिष."

"निमिष जयकर?"

"हो"

"तो पण तुझ्यावर प्रेम करतो?"

"हो."

"तुझे काका हर्षल, तीन महिन्यापूर्वी वारले?"

"मी मारलं त्यांना."

"कसं मारलंस तू त्यांना?"

"विष प्रयोगाने."

"कोणत्या प्रकारचा विष प्रयोग?"

" विषाच्या गोळ्या"

"कुठे मिळालं विष तुला?"

"ते होत तिथेच"

" नंतर काय केलंस विषाच तू?"

"तळ्यात टाकून दिलं"

"तळ्यात नेमकं कुठे?"

"जिथे बोटी ठेवतात तिथून फेकून दिल "

"तू टाकलस की फेकलस?"

"फेकलं"

"ते पुडीत होतं की बाटलीत?"

"बाटलीत."

"द्रव की गोळ्या?"

"गोळ्या."

"बाटली बुडाली कशी?"

"मी बाटलीत शिशाच्या गोळ्या टाकल्या होत्या."

"कुठे मिळाला तुला त्या?"

"हर्षल काकांच्या बंदुकीच्या शेल्स मधून कापून काढल्या"

"किती?"

"दोन."

"रिकाम्या शेल्स चे काय केलंस?"

"बंदुकी च्या पेटी मागे टाकल्या"

"या बद्दल अत्ता पर्यंत तू कुणाला बोलली आहेस?"

"नाही."

"विष कुठून मिळवलस तू?"

मुलीचं उत्तर,अस्फुट,अस्पष्ट होतं.

तिने ओठ हलवले,मोठया वाक्याच्या जुळवा जुळवीच्या प्रयत्नात असल्याप्रमाणे तिच्या जिभेचा आवाज झाला,तेवढे ही कष्ट खूप आहेत हे जणू ओळखून ती मुलगी पुन्हा झोपेच्या अधीन झाली.

डॉक्टरांनी नर्स ला,तिला दिलं जाणार औषध बंद करायचं सूचित केलं

"अनन्या,"

काहीच प्रतिसाद आला नाही.

"अनन्या," यावेळी आवाज मोठा होता.

"अनन्या," "माझं ऐक , अनन्या, तुझा उजवा हात हलव"

काहीच प्रतिसाद आला नाही.

"अनन्या तुझं नाव काय आहे?"

मुलगी स्तब्ध होती.डॉ. डोंगरेनी तिच्या डाव्या पापणीवर अंगठा ठेवला,पापणी वर उचलली, डोळ्यात पाहिले आणि पुन्हा पापणी सोडून दिली.पुढे होऊन टेप रेकॉर्डर बंद केला.

"तिला थोडा वेळ झोपणे आवश्यक आहे"

ते नर्स ला म्हणाले.

"ती पुनः शुद्धीवर यायला लागेल तेव्हा तिच्या लक्षात येईल की ठरवले होते त्यापेक्षा तिने जास्त सांगितले आहे.ती चवताळल्या सारखी आणि कोपिष्ट होईल,लक्षात येतंय ना तुझ्या मिस् फेणाणी ?"

नर्स ने मान हलवली

"हे समजून घे की हा संपूर्ण संवाद हा व्यावसायिक आहे, गोपनीय आहे. आणि कोणत्याही स्थितीत जे काय बोललं गेलय ते तू कुठेही उघड करायचं नाहीं "

तिने त्यांच्या नजरेला नजर दिली, " तुम्ही ते सांगणार आहात ? " तिने विचारले

" कोणाला ? " त्यांनी थंडपणे विचारले

" पोलीस अधिकाऱ्यांना"

" नाही "

नर्स गप्प बसली.

डॉ. डोंगरेनी भिंतीच्या सॉकेट मधून प्लग ओढून काढला, टेप रेकॉर्डर ला कव्हर घातलं आणि नर्स कडे दिला.

" ती शांत आणि अविचलित राहील हे मी तुझ्यावर सोपवतोय. तिला उबदार वाटायला हवं,तू अधून मधून तिची नाडी तपासशील.काही गुंतागुंत निर्माण झाली तर काय करायचे याच्या सविस्तर सूचना मी देऊन ठेवल्या आहेत,तुला माझा नित्यक्रम माहीत आहेच."

नर्स ने मान डोलावली.

" मी कदाचित तास-दीड तासासाठी बाहेर असेन,नंतर परत येईन" ते म्हणाले.

" मला वाटत नाही बरेच तास ती शुद्धीत येईल.ती आलीच आणि तिला बोलावेसे वाटले तरी तिच्याशी काहीही चर्चा करू नको,तिला फक्त झोपायला सांग.तू हे लक्षात घे की तू इथे नर्स म्हणून व्यावसायिक भूमिकेत आहेस आणि इथे काय घडलय त्याबद्दल तू कुणाला काही सांगणार नाहीस."

तिने त्यांच्या कडे बघे पर्यंत ते थांबले.

नाईलाजाने तिने वर पाहिले.

 "ठीक आहे डॉक्टर." मना विरुद्ध ती म्हणाली.

डॉ. डोंगरे तपासणीच्या खोलीतून बाहेर पडले, सर्व साधारण हॉस्पिटल मधे असतात तशा रुग्णांना भीती वाटणारी पांढऱ्या टाईल्स नसलेली, , काळजी पूर्वक बांधलेली अशी ती खोली होती.खोलीत चकचकीत उजेडाची सोय होती पण अत्ताच्या स्थितीत मंद, अप्रत्यक्ष प्रकाश ठेवला होता. काळजी पूर्वक नियंत्रित केलेल्या तापमानानुसार त्या खोलीत हवा खेळवण्यात आली होती आणि भिंती पूर्ण पणे आवाज विरोधी होत्या. 

प्रकरण १ समाप्त.


Rate this content
Log in

Similar marathi story from Crime