रुपा
रुपा
रुपाली एक अवखळ लाडात वाढलेली मुलगी नावाप्रमाणे रूपवान......... तिच्या लहानपणी बाबा एका अपघातात गेले..... बाबा नसले तरी आई आणि आजी यांच्या छत्राखाली मोठी झाली.....बाबांची पेंशन होती...... आई आणि आजी मिळून पापड, लोणचे, याचा ऑर्डर घेवून पूर्ण करायच्या तेव्हढाच हातभार असावा म्हणून..... . कॉलेज मधे असताना एका मुलाच्या प्रेमात पडली..... ..मुलगा एका छोट्या पेपर कारखान्याचा मालक..... ..
घरी सांगितल्यावर आई आणि आजीलाही तो मुलगा आवड्ला....
ग्रॅज्युएशन झाले तस यथासांग लग्न पार पडले ...सासर नेहमीप्रमाणे सासर सारखेच..... आधी भांड्याला भांड लागत.... नंतर मात्र सासू सुन एकत्र नांदायला लागले...... प्रशांत..... रूपाचा नवरा तिच्यावर खूप प्रेम करायचा...... असेच दिवस आनंदात जात होते....सासरी ती चांगलीच रुळली होती..... पण अजून घरात पाळणा हलला नव्हता..... डॉक्टर कडे येरझारा सुरू झाल्या.... रुपाच्या आजीने सांगितलेले जुने उपाय झाले आणि तब्बल तीन वर्षानंतर ती सुखद बातमी आली.... तिची आई आजी सासू सगळेच खुश होते.... प्रशांत ला बाबा नव्हते लग्नाच्या एक वर्ष आधीच ते attack ने गेले होते..... आता नातवाच्या रुपात ते येणार अशी त्याच्या आईची भाबडी श्रद्धा.....
डोहाळजेवण झाले... सगळी हौसमौज झाली... प्रशांत तिची खूप काळजी घेत होता...... सगळे सुखात आनंदात होते... आणि तो दिवस उजाडला....
रूपाला एक गोंडस मुलगा झाला.... सगळ्यांचा आनंद गगनात मावत नव्हता..... पण.... पण तिला दूध.... ती बाळाला दूध पाजू शकत नव्हती... बाळ वरच्या दुधावर वाढत होत..... रूपा ला या गोष्टीच वाईट वाटायच पण सगळ्यांचा आनंद बघून.......नसते एखादीला दूध...... म्हणून ती स्वतःला समजावायची.... असेच दिवस जात होते रूपाला नेहमी उजव्या बाजूला एक गाठ जाणवायची पण तिला वाटायचं ती बाळाला दूध देवू शकली नाही म्हणून असेल.... हळूहळू ती गाठ वाढायला लागली..... तिचा मुलगा श्री एक वर्षाचा झाला..... त्याचा मोठा वाढदिवस करण्यात आला...... रूपाची आजी डोळे भरून म्हणाली सगळ भरून पावले आता मी डोळे मिटायला मोकळी........पण आपण विचार करतो तसाच आयुष्य नसत ना..?
गाठ वाढून आवळ्या एवढी झाली तेव्हा तिने डॉक्टरकडे जायच ठरवल..... प्रशांत सोबत ती डॉक्टरकडे गेली....... त्या गाठीच निदान झाल..... तिला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता....प्रशांत साठी तर हे धक्कादायक होत पन त्याच प्रेम होत रूपावर.... हळूहळू घरात सगळ्यांना कळल..... तीच केमोथेरपी सुरू झाल्या.... त्या इंजेक्शनच्या... त्या ट्रीटमेंट च्या असह्य वेदना ती सहन करत होती.... आपण बरं होवू ही आशा घेवून......ती तो जीवघेणा त्रास सहन करत होती.....
श्री आता जास्तीत जास्त त्याच्या आजीकडे रहायचा तिला त्रास होवु नये म्हणुन.....रुपाचे सौंदर्य आता कमी होत चालल होत तिचे काळेभोर लांबसडक केस झाडून गेले होते.... तिचा चेहरा भकास दिसत होता... अलिकडे श्री तिच्याकडे यायला घाबरत होता... सासू समजावायची लहान आहे ग तो..... होईल सर्व ठीक...... प्रशांत तिची काळजी घ्यायचा... त्यामुळे त्या त्रासात ही तिला बर वाटायच..... केमोथेरपीमुळे काहीच फायदा होत नव्हता म्हणून ऑपरेशन करायचे ठरले..... तिच्या सौंदर्याचा एक भाग तोडून फेकला जाणार होता.....पण उपाय नव्हता......
शेवटी ऑपरेशन पार पडले....... त्यानंतर ती रिकव्हर होत होती......आता तिला बर वाटायच.......तिला वाटू लागल होत की काहीच फरक नाही पडला.... तिचा एक अवयव नाहीये तरीही सगळ व्यवस्थित आहे.... तिला त्या त्रासातून सुटका झाली हेच खूप वाटायच....... पण सुटका झाली की अडकली ते तिच्या लक्षात येत नव्हत...... ती घरातील सगळ काम करू शकत होती.... पन प्रशांत तिला कुठे बाहेर नेत नव्हता.... आई बाहेर जायच्या ते एकट्याच... श्री च कारण पुढे करून...... आधी तिला खूप बर वाटायच पण हळूहळू तिच्या लक्षात आल कॉलनी मधल्या बाया तिला बघून काहीतरी कुजबुजत असतात...... एव्हाना श्री शाळेत जायला लागला होता....त्याच्या पॅरेंट मीटींग पन प्रशांत एकटा जावून यायचा....श्री तिच्याकडे कमी आणि आजी कडेच जास्त असायचा...
अजूनही तो त्यांच्याकडेच झोपायचा..... तिने न्यायचा प्रयत्न केला की मोठ्याने रडायचा... मग आई म्हणायचय असू दे ग..... लहान आहे तो......
प्रशांत तिला टाळायचा अस नाही... पन तो फक्त काळजी घ्यायचा....ते एक नाजूक नात त्यांच्यात उरलाच नव्हत आधी तिला वाटायच तो काळजी म्हणून पन तिच्या लक्षात यायला लागल..... ज्या रूपाची ज्या सौंदर्याची तो तारीफ करून थकत नव्हता त्या सौंदर्याकडे त्याला बघायच नव्हत....... त्या सौंदर्याला लागलेल ग्रहण सुटलाच नव्हत आणि आता ते आयुष्यभर असच राहणार होत......
प्रेम करणारी व्यक्ति अस खोट बोलून टाळत असते तेव्हा मनाला खूप भेगा पडतात.....प्रशांतच तिच्यावर प्रेम नव्हत अस नाही पन हा बदल तो स्वीकार शकत नव्हता...... त्याच्या नजरेत असलेली खिन्नता तिला दिसून त्रास होवु नये म्हणून तो तिच्या दूर राहत होता... तिला टाळत होता.... आपल्या कामात बुडवून घेत होता...... रूपा ला झोपेच्या गोळ्या सुरु होत्या... रोज अर्धी गोळी खावून ती झोपू शकत होती.... पण प्रशांत त्याची तर पूर्ण झोप उडाली होती.... आणी एक दिवस तिने बायांची कुरबूर ऐकली..... काय म्हणाव प्रशांत ला बिचार्याला कसे दिवस आलेत... ना बायको च सुख मिळत ना बायकोला घेवून चारचौघात मिरवू शकत.....
पद्मिनी ताई (रूपाची सासू) पण बघा ना एकट्याच जातात या वयात बाहेर आधी किती तोऱ्यात मिरवायच्या सुनेला.... रूपवान सून होती म्हणून ....... ती कचरा फेकायला बाहेर आली होती.... ते ऐकून ती लगेच घरात गेली..... दुपारी तिची सासू तिला आराम कर सांगून श्री ला घेवून कुठेतरी प्रोग्राम ला गेली होती...... रूपा दिवसभर आपल्याच विचारात होती...... घर तिला खायला उठल होत..... .संध्याकाळी त्या वापस आल्यावर तिने श्री ला जवळ घेतल तो निसटून जायचा प्रयत्न करत होता... तिने त्याला विचारायचा प्रयत्न केला...... तो का दूर पाळतो तिच्यापासून ती तर त्याची मम्मा आहे म्हणून..... तो निरागस रडत बोलून गेला तू माझी मम्मा नाही तुला तर एक ममच नाही...... दूदूच नाही तुला...... ..ते शब्द ऐकून तिची पकड ढिली झाली.....तो पळाला.....
तिने दार बंद करून अश्रूंना वाट मोकळी केली.... आरश्यासमोर जावून आपल रूप बघितल........ खरच तीच रूप बदलल होत... आतापर्यंत जे टाळायच म्हणून ती आरश्यात बघत नव्हती...जे सत्य ती स्वीकारत नव्हती ... ते रूप ती स्वतः बघू शकत नव्हती.......मग बाकीच्यांचा काय दोष..... .
रात्री प्रशांत उशिरा आला जेवण करून आपल्या फाईल घेवून बसला होता... नेहमीप्रमाणे तिला टाळत..... तिने जावून त्याच्या गळ्यात हात टाकले.... तो चिडूनच म्हणाला दिसत नाही का कामात आहे ना मी....? सॉरी म्हणत ती बेड वर आपल्या जागेवर जावून बसली.....
तिला लहानपणापासुन तिच्या रुपा च झालेल कौतुक आठवत होत..... प्रशांत जीवनात आल्यावर सोबत घालवलेले क्षण आठवत होते......
काही वेळाने ती झोपली समजून प्रशांत झोपायला आला...... आणि तिच्याकडे पाठ फिरवून झोपला.......खूप जिव्हारी लागल तिच्या... रूपा काहीतरी ठरवून उठली तिने गोळ्या घेतल्या आणि प्रशांत जवळ सरकली.... मला आजच्या दिवस झोपवून दे ना रे..? कसं कोण जाणे आज त्याला तिला टाळाव वाटत नव्हत.... त्याने एक हात तिच्या डोक्यावर ठेवला...... बस हे शेवटच.......
हो तिने सर्व झोपेच्या गोळ्या घेतल्या होत्या कधीही न उठण्यासाठी..... तिला सर्व सर्व आठवत होत... आणि हळूहळू अंधार पसरत होता.... तू माझी मम्मा नाही तुला एक मम नाही.... दूदूच नाही तुला .....
...... आणि सगळ शांत झाल.... कायमच...
