मंगळाचे गैरसमज
मंगळाचे गैरसमज
मुलाला वा मुलीला मंगळ म्हटला की सगळ्यांना धडकी भरते.... अणि हा मंगळ फक्त विवाहाच्या वेळी डोक वर काढतो... मग शांती, ग्रह पूजा n ऑल. अलीकडे एक msg आलेला मुलगा चांगला आहे सगळं पसंत आहे पन मुलगा मंगळी आहे..... म्हणून लग्न नाही जुळल........ कुणी सांगितलेले म्हणतात मुलीचे बाबा मरतील हे लग्न झाल्यास. असं काही नसत, मंगळाची एक भीती पसरलेली आहे त्यात अंधश्रध्दा जास्त......ज्यांच पोटपाणी यावर चालत ते याचा फायदा घेणार. मग हे सगळं थोतांड आहे का..??? ..तर नाही.....
मंगळ असलेल्या मुलाने वा मुलीने मंगळ असलेला जोडीदार बघावाच आपल्या पूर्वज लोकांनी ग्रहांचा अभ्यास करून हे शास्त्र मांडलाय. त्यावेळी कुठे तुमच technology होत.? ... तरी त्यांनी सगळ लिहून ठेवलाय ना...??? .. Science ने तेच prove केलाय एव्हढेच... मग, मंगळ असल्यास मंगळाची मुलगी का करायची?....प्रत्येक राशीचा, ग्रहाचा एक स्वभाव असतो....त्यानुसार मंगळ हा पराक्रम कारक ग्रह आहे.... पराक्रम म्हणजे स्वभावात उग्रपणा येणारच... मंगलिक लोकांमधे हा जास्त असतो. मग हा मंगळ लग्नाच्या वेळीच का डोके वर काढतो...??? . तर... लग्नानंतर विवाहित जोडप्यात एक वेगळ relation असतं. Physically ते एकरूप होतात..... मंगळाच्या स्वभावाची उग्रता ही स्वभावात असते ही उग्रता या नात्यावर प्रभाव टाकते.
बेडरूममधल्या त्या नात्यात याचे परिणाम बघायला मिळतात पण यात होते त्या दोन जिवांची घुसमट. वरवर सगळं ठीक दिसतं कारण ही अशी गोष्ट असते जी बाहेर बोलू शकत नाही. मग ते दोघेही गुपचूप रेटत राहतात. याचं frustration निघत जातं मग भांडणे n ऑल... त्यात खराब मनस्थितीत कुणाच्या तब्येतीवर परिणाम होवून काही झाल की खापर बिचार्या मंगळाच्या डोक्यावर......
.....
आणि यात अजून मंगळाची शांती करा..... शांती करून स्वभाव बदलणार का...?... शांती पंडित करून देतो.. मुळात कुठलीही पूजा शांती ही आपली आपण करावी..... तब्येत माझी बिघडली अणि मेडिसिन तू घे अस करून कस चालेल ना..? आपले पूर्वज खूप विचारी होते.... हे अस घडू नये म्हणून त्यांनी एक धाक घालून दिला. काय तर जिवाला धोका. Atleast मरण्याच्या भीतीने तरी लोक हे करणार नाहीत म्हणून. पण त्याचा असा चुकीच्या पद्धतीने बाऊ नको. अलीकडे एक वाचलेले...
नाव - मंगळ
पत्ता - आकाशात कुठेतरी आणि
काम - लोकांची लग्न मोडणे ......
नका अस उडवू....... आपल्याच धर्माचा आपण अपमान करतोय......
आता हेच बघा तुलसीदासांनी लिहिलय
"जुग सहस्र जोजन पर भानू।
लील्यो ताहि मधुर फल जानू।।"
एक युग =12000 वर्ष
एक सहस्त्र =1000
एक योजन = 8 मील
युग x सहस्त्र x योजन = पर भानु
12000 x 1000 x 8 मील=96000000 मील
एक मील =1.6किमी
96000000 x 1.6=153600000 किमी
त्यांनी 1511 मध्ये सूर्य अणि पृथ्वीचं अंतर सांगितलंय......
कस मोजले त्यांनी शिडी लावून......
नाही ना...? .... विचार करा.......
