STORYMIRROR

Pallavi Charpe

Others

2  

Pallavi Charpe

Others

मासिक पाळी आणि गैरसमज

मासिक पाळी आणि गैरसमज

4 mins
264

एक नाजूक विषय......मासिक पाळी.... घराघरातील एक common topic असला तरी याबाबत कुणी उघड बोलत नाही......science कितीही पुढे गेल तरी ही अंधश्रध्दा जाणार नाही...

मासिक पाळी.... एक नॉर्मल प्रोसेस..... निसर्गाची स्त्रीला दिलेली अमूल्य भेट... एक नवीन सृजन करण्याचा हक्क स्त्रीला मिळतो तो यामुळेच.....

पन मग याला विटाळ का मानतात......???...

ज्या गोष्टीमुळे सृष्टी चालते तो वाईट का?.....

मासिक पाळी सुरू असतांना तिच्यावर बंधने का???....

याला कारण आहे आपली पुरुषप्रधान संस्कृती......

आजही समाजात मासिक पाळीला विटाळ समजल्या जाते.... त्या 4-5 दिवसात देवाला हात लावायचे नाही पूजा करायची नाही...घरात शिवाशिव करायची नाही आणि अजून खूप काही....

कुणी बनवले हे नियम...कुणालाच clear माहीत नाही...Na त्याच्यामागचा logic शोधायचा कुणी प्रयत्न करत..... पिढी दर पिढी चालत आहे...... .

पणजी, आजी, आई, आपण, आपली मुलगी....

त्यात भर म्हणजे कितीही प्रगती करा... अगदी डॉक्टर मुलीसुद्धा हे पाळतात..... At least मंदिरात न जाणे, प्रसाद न खाणे एव्हढे तरी...... अणि चुकून हे सगळे न मानणारी एखादी स्त्री असेल तर ती चर्चेचा विषय.....

यावरून कुणाशी जास्त वाद घातला की विषय कुठे संपतो तर चार दिवसाने एव्हढ काय बिघडत?... .....

इथे प्रश्न चार दिवसाचा नाहिये... आमच्या अस्तित्वाचा आहे.....

एखाद्या मुलीला पाळी येत नसेल तर ती मुलगी चालेल कुणाला?..... नाही...... पण का?..... तर ती तुमचा वंश चालवू शकत नाही मग एव्हढी महत्त्वाची गोष्ट तुम्ही अशी शुल्लक का समजता....

आजही भरपूर घरी या काळात मुलींची स्थिती खूप वाईट असते...

त्यातले काही प्रकार असे

घराच्या बाहेर बसणे... घरात एका बाजूला असणे,... वेगळे झोपणे, वेगळी रूम, घरचे सगळे दुरून हातात देतात न ऑल.....

काही घरी या काळात बाहेरची कामे केलेली चालतात...जस भांडी घासणे, कपडे धुणे न ऑल घरातली नाही.....

त्यावर एक वर्ग असतो जिथे पाहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी केस धुवायचे... अणि घरात वापरायचे..... सगळेच करायचे फक्त पूजा सोडून......

का तर म्हणे विटाळ असतो मग डोक्यावरून पाणी घेतल्याने विटाळ जातो का?..... नाही ना... उलट या काळात थंडीमुळे कितीतरी स्त्री वर्गाला पाळी न जाणे, त्रास होणे, पाळी अनियमित होणे, सांधेदुखी असे कितीतरी त्रास होतात....

आता यात काही महिलावर्ग म्हणतील आम्हाला नाही झाला....... त्यावेळी आणि आता फरक आहे... काळ बदलतो..... तेव्हाची स्त्री दणकट होती राहणीमान, खानपान वेगळे होते...... आता तस नाहीये....

अणि कितीही समजावुन सांगितल तरी मनाला पटत हे नाही आपल्या... कारण लहानपणापासुन डोक्यात तेच भरले असत... मग तुळशीला हात लागला की ती वाळत जाते..... अरे फक्त तुळशीच नाही ज्या स्त्री ची हार्मोन्स लेवल ताशी असेल तिच्या हाताने सगळीच झाडे मरतील.... या काळात लोणचे खराब होते, तूप खराब होते , पापड लाल होतात... आनि bla bla bla...

काही होत नाही.... एखाद्या वेळी coincidentally होवून जात.... ते ही हार्मोन्स मुळे.....

सगळे उपाय संपले की सांगितल्या जात आपल्या धर्म ग्रंथात सांगितलाय.... देवाचा धाक दाखवला जातो....

मग काय मान्य करण्याशिवाय पर्याय नसतो...

आपल्या पावित्र ग्रंथ भगवद्गीता... त्यामधे कुठेच याचा उल्लेख नाही... उलट तर द्रौपदीला कृष्णाने वस्त्रहरणाच्या वेळी वाचवले होते..... तेव्हा कृष्णाने नाही म्हटले ती विटाळ अवस्थेत आहे मग मी का जावू.? .....

अध्यात्म अणि थोतांड याची जेव्हा सांगड झाली.... तेव्हा एका वर्गाने स्वागताच्या फायद्यासाठी अनेक अंधश्रध्दा पसरवल्या कालानुरूप त्याच बरोबर ठरत गेल्या......

धर्मग्रंथात लिहिलाय म्हणून या प्रथा म्हणायच्या आणि मग जास्त वाद घातला की रामायण, महाभारत, शिव पुराण यात कुठेच याचा उल्लेख नाही तर म्हणायचे कुणी बघितलाय तेव्हाच.....

मला कुठल्याच ग्रंथ वा धर्मावर वाद नाही घालायचा... मुळात हा विषय नाजूक म्हणून कुणी बोलत नाही.... पण एक स्वतः आपल्या मनाला विचारा... एका घरी एक प्रथा, आणि दुसर्‍या घरी दुसरी अस कस होवू शकत? ..... एका धर्मात वेगळ दुसर्‍या धर्मात वेगळे अस कस?.देशाच्या एका प्रांतात एक आणि दुसर्‍या प्रांतात दुसरे कस?

स्पष्ट करून सांगते थोड.... सगळया धर्मात पाळी मधे स्त्री अपवित्र मानतात.... गुरुद्वारा एक असा आहे जिथे या काळात स्त्री पावित्रा मानतात, मुस्लिम धर्मात या काळात वेगळे राहतात, हिंदू धर्मात घरातली सोडून बाहेरची कामे चालतात....

आपल्याच देशात काही भागात या काळात कुठला सण, पूजा करायला मनाई असते तेच देशाच्या एका भागात कुठल्या पूजेच्या काळात पाळी आली तर ती पूजा पावन समजतात....

कामाख्या देवी मंदिरात देवीचे लाल वस्त्र तुम्ही प्रसाद म्हणून घरी नेता, नऊ महिने आईच्या पोटात त्यातच वाढता..... अणि त्यालाच विटाळ समजता...? ......

ही फक्त एक अंधश्रध्दा आहे.... माणसाने आपल्या सोयीने बनवलेला एक नियम..... खूप मागे जावून बघितल tr यामागची valid कारणे मिळतात....

जस त्या काळी महिलांना पाणी आणायला, लाकडे आणायला दूर जावे लागत होते.... या काळात रक्ताच्या वासाने जंगली पशू हल्ला करू नये म्हणून घरात राहायच असा नियम बनला नसेल कशावरून.? ...

त्या काळी महिलांना घरकाम खूप जास्त आनि मेहनतीचे होते , विहिरीचे पाणी काढणे, जात्यावर पीठ दळणे, यासारखी अनेक कामे करून अशक्तपणा येतो... म्हणून जुन्या लोकांनी या काळात स्त्रीला कुठलेच काम करू द्यायचे नाही हा नियम बनला नसेल कशावरून?....

लिहावं तेव्हढा हा विषय खूप खोल आहे... सांगायच एव्हढेच की पाळी hi निसर्गाची अमूल्य देण आहे.... तिला त्रास म्हणून नाही तर एक वरदान म्हणून बघा...... दृष्टिकोन बदला.... या काळातही नॉर्मल जगा.... आणि जगू द्या....

सगळया पुरुष वर्गाने या काळात स्त्रीला समजून घ्या.... तिला जास्तीत जास्त आराम द्या....शरीरातल्या बदलाने ऑलरेडी ती खचली असते, तिला मानसिक बळ द्या,खच्चीकरण न करता तिचा आधार बना ......

माझी सगळ्यांना एकच विनंती आहे श्रद्धा ठेवा त्याची अंधश्रध्दा बनू देवू नका ....


साहित्याला गुण द्या
लॉग इन