प्रेमाची परिभाषा
प्रेमाची परिभाषा
प्रेमात, इतकी मोठी ताकद आहे की, ती फक्त तोच जाणू शकतो. ज्याने जीवनात प्रेम केले आहे.आता मनात प्रश्न उभा राहतो की प्रेम म्हणजे काय ? प्रेमाचे प्रकार किती? असे अनेक प्रश्न उभे राहतात. पण ह्या जगामध्ये प्रेम दोन प्रकारचे आहे. एक 'स्वार्थ' प्रेम आणि दुसरे 'निःस्वार्थ' प्रेम.. हे दोनच प्रकार प्रेमाचे आहेत.
'स्वार्थ' प्रेम म्हणजे 'जर आम्ही एखाद्याकडून काही तरी मिळण्याची अपेक्षा ठेवत असेल तर त्याला स्वार्थ प्रेम म्हणतात आणि 'निःस्वार्थी' प्रेम म्हणजे आम्ही जर कसलीही अपेक्षा न ठेवता केलं जाणाऱ्या प्रेमाला निस्वार्थ भावनेचे प्रेम म्हणतात...जगाच्या दृष्टिकोनातून बघितल तर आज खरी गरज निस्वार्थ भावनेची आणि निस्वार्थ प्रेमाची गरज आहे.
आपण नेहमी एक इंग्रजी वाक्य ऐकत आलो आहे की, '𝐆𝐨𝐝 𝐢𝐬 𝐋𝐨𝐯𝐞 & 𝐋𝐨𝐯𝐞 𝐢𝐬 𝐆𝐨𝐝' (प्रेम ईश्वर आहे, आणि ईश्वर हेच प्रेम आहे.) पण खरोखर आम्ही ईश्वरावर सुद्धा निस्वार्थ भावनेचे प्रेम करतोय का. हे आपण स्वतः आत्मपरीक्षण करायला हवे. माणूस हा असा आहे की, देवाकडून जर भौतिक गरजा पूर्ण झाल्या तरच, देवावर प्रेम करतो. म्हणजेच कुठं तरी आपल्याला अस जाणवत की, देवाशी सुद्धा माणूस आज प्रेमाचा सौदा करताना दिसतोय. तर असो मला ह्यातून इतकेच सांगायचं आहे की, जर आम्ही प्रत्येक प्राणीमात्रावर आणि देवावर जर निस्वार्थ भावनेचं प्रेम केलं तर आम्हाला त्यातून खरोखर आनंद प्राप्त करता येईल..
साने गुरुजी सुंदर शब्दात आम्हाला समजवतात. ' ' खरा तो एकची धर्म , जगाला प्रेम अर्पावे '. जगाला आम्ही जर प्रेम दिले तर जग सुद्धा आमच्यावर प्रेम करेल.
मला माझ्या ओळी आठवतात...
'प्रेम करावे इतुके प्राण्या,
की प्रेमाने जग जिंकून घ्यावे...
(स्वरचित)
तर आम्हाला हे जीवन जगत असताना, जगावर तर प्रेम करायचं आहेच,पण स्वतःवरसुद्धा तितुकेच प्रेम करायचे आहे..एक गीतकार म्हणतो की,' या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे...तर हाच खरा मला प्रेमाचा अर्थ वाटतो.
