प्रेमाची ओळख
प्रेमाची ओळख


एक लहान गावात एक कुटुंब राहत होतं. अगदीच श्रीमंत नव्हते पण दोन वेळच आणि हव असं जगू शकत होते. आई, वडील, भाऊ आणि बहीण असे चौघे राहत होते. वडील सरकारी नोकरीवर चांगल्या पदावर काम करत. आई चांगली गृहिणी आणि भाऊ नुकताच कंपनीत कामाला लागला. सगळं नीट असताना, कधी हे विचार करतात हे इतकं नीट कसं? नाही ना? सगळं निट चालू आहे तेव्हा आपण हा विचार करतो हे निट कोणामुळे? पण हा प्रश्न त्या आई वडिलांच्या मुलीला पडतो. असंच एकदा बाबा कामावरुन आल्यावर त्यांची बॅग खाली ठेवता मुलगी बाबांना विचारु लागते.
“बाबा एक विचारु?”
बाबा बोलतात “अगं विचारतेस का? बोल ना !!”
मुलगी विचारते “बाबा प्रेम म्हणजे काय ?”
१० वर्षाच्याचा चिमुकलीचा प्रश्न ऐकुन बाबा हसत म्हणाले,
“का बरं !! तुला अचानक का हे विचाराव वाटल?”
ती लगेचच उत्तरली “शाळेत माझी मैत्रिण म्हणाली मोठे झाल्यावर कोण प्रेम करत नाही. हे खर आहे का बाबा?”
“हमम... तुला काय वाट?” बाबा मुलीलाच विचारतीत
ती हळूच बोलते “बाबा आपण खूप आनंदाने राहतो, सर्व दररोज नव्या उमेदीने जगतो. पण आपण सुखी का ?”
बाबा हसत उत्तर देतात “अगं वेडी यालाच तर प्रेम म्हणतात”
तिला बाबांचा बोलण्याता अर्थ कळत ना आणि ती बोलते “ते कसं???”
बाबा बोलतात “प्रेम हे सांगता येत नाही किंवा दाखवता येत नाही. जेव्हा मुलांना जन्म देते तेव्हा तिला खुप त्रास होतो तरी ती आपल्याला कधी न थकता व न बोलता हवे ते हवे तेव्हा देते. ती तिला झालेल्या वेदना सांगत नाही. घरातील प्रत्येक जण घरासाठी करत असतो. घरातील माणसांन साठी करत असतो.”
हे ऐकून मुलीला आईचं प्रेम कळतच पण ती परत बाबांना विचारते,“बाबा तुम्ही आम्हाला हवं ते हवं तेव्हा देतां, पण स्वत: मात्र कसलीच आणि कोणाकडुनही अपेक्षा करत नाही का ??”
बाबा त्यांचाच मुलीचे प्र
श्न एकुन थक्क होतात आणि म्हणतात, “मी लहान असताना मला हवं ते मिळाले नाही कारण आमची परिस्थिती चांगली नव्हती, तेव्हाच मी विचार केला कमवून आपल्या आई वडिलांना आणि कुटुंबाला सुखी ठेवायचे. त्यांना माझ्या सारखे दिवस नाही एवू द्यायचे.”
हे ऐकुन मुलगी बाबाला बिलगते आणि म्हणते, “आता मला खऱ्या प्रेमाची ओळख कळाली!!”
बाबा विचारतात “ते कसं ?”
ती म्हणते “आई इतका त्रास होऊनही, तोडांवर स्मितहास्य ठेवुण सर्व करते आणि तुम्ही कुठुंब सुखी कसं राहील या साठी झटता पण ते मात्र आम्हाला मरेपर्यंत कलत नाही. आज कळाल, आपण सुखी का ?”
बाबा तिचे बोलणे ऐकतच बसतात आणि त्यांना ते आवडत देखील
ते म्हणतात “का?”
ती म्हणते “ प्रेमाची ओळख तेव्हाच कळते जेव्हा आपल्याला त्याची किंमत वेळेत कळते आणि प्रेम न सांगता करतात तेच खरं प्रेम, जे कधीच कमी होत नाही तर वाढतं !!”
चिमुकलीचे बोल ऐकून बाबाला अनावर होतं आणि डोळे पाणावतात. ते म्हणतात “प्रेम दिल्याने कमी होत नाही, सर्वांवर नकळत प्रेम कराव. प्रत्येकालाच त्याची गरज आहे.” बाबा तिच्या डोक्यावर हात ठेवून रुममध्ये जातात. पण चिमुकलीला जीवनाचा अध्याय समजावून जातात जो प्रत्येकालाच गरजेचा आहे.