Kishorkumar Bansod

Inspirational

4.3  

Kishorkumar Bansod

Inspirational

प्रेमाची भेट

प्रेमाची भेट

3 mins
202


गणेशराव सरस्वती विद्यालयात गणित शिक्षक होते. गणित विषयात त्यांचा हातखंडा होता. ते विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जात. शिक्षकी पेशासोबतच ते समाजकार्यातसुद्धा सक्रीय होते.


गणेशरावांना पाच वर्षे वयाचा मुलगा होता. त्याचे नाव होते भानू. कुरळ्या केसांचा, गोरापान. भानू खूप सुंदर बोलायचा. सगळे शेजारी त्याचे खूप कौतुक करायचे. आई-वडीलांना एकुलता एक असल्याने तो सर्वांचा लाडका होता.


आज श्रावणी पौर्णिमा होती. रक्षाबंंधन निमित्ताने सगळीकडे उत्साही वातावरण होते. घरोघरी पाहुणे येत होते. भानू मात्र एकटाच उदास बसला होता. त्याच्या अनपेक्षित वागण्याने त्याची आई त्याच्या जवळ जाऊन त्याला म्हणाली, "बाळा काय झालं तुला, काय हवंं तुला?"


भानू रडक्या स्वरात म्हणाला, "काही नाही!"


आई म्हणाली, "सांग ना सोन्या काय झालं बरं!"


तो म्हणाला, "आज राखी... सगळ्या मुलांना त्यांंची ताई राखी बांधते पण मला राखी कोण बांधणार!"


आई म्हणाली, "मी बांधणार राखी तुला!"


भानू म्हणाला, "नको" आणि तो मोठ्याने रडू लागला. त्याचा रडण्याचा आवाज ऐकून त्याचे बाबा आले, त्यांना सगळं समजलं. ते भानूची समजूत काढू लागले. पण भानू काही समजत नव्हता. त्याच्या हट्टापायी कुुुणाचे काही चालेना.


एवढयात खाड्कन गेट उघडण्याचा आवाज आला. रामू माळी आत आला, त्याच्यासोबत एक छोटी मुलगीसुद्धा होती. गणेशरावांच्या घरी तो आठवड्यात, पंंधरा दिवसातून फुलझाडांची देखरेख करायला यायचा. भानूच्या रडण्याचा आवाज सुरूच होता.


गणेशरावांना पाहूूून रामू म्हणाला, "साहेब नमस्कार जी..."


गणेशराव म्हणाले, "नमस्कार रामू, ये ये!"


भानूच्या रडण्याचा आवाज येतच होता. रामूसोबत असलेल्या मुलीला पाहून गणेेशराव म्हणाले, "ही कोण!"


रामू म्हणाला, " साहेब, माझी लेेक सुशी, आज मागच लागून पडली, मी येतेे म्हणूूून इचि आय मनली घेेेऊन जा,

म्हणूून घेऊन आलो जी!"


सुशी दिसायला चुटूकदार मुलगी, तिचे लांबसडक केस तिच्या चेेेहऱ्याचे सौंदर्य अधिकच खुलवत होते. भानूच्या रडण्याचा आवाज येेतच होता.


गणेशराव म्हणाले, "भानू बाहेर ये बरं!"


आवाज ऐकून भानू बाहेर आला.


गणेेेशराव म्हणाले, "भानू ही सुुशी, तुझी बहीण, ही तुला राखी बांधणार!"


गणेशरावांनी आपल्या सौ.ना आवाज देऊन पूजेेेचं साहित्य आणण्यास सांगितलं. भानूच्या आईने सगळे सामान

आणले. गणेशराव म्हणाले, "सुशी हा तुझा भाऊ भानू! याला तू राखी बांध."


सुशीने राखी बांधली. भानूसुुद्धा रडणे विसरून प्रसन्नभावाने राखी बांधून घेत होता. रामू मात्र अवाक होऊन हेे सगळं बघत होता. त्या दिवशीपासून प्रत्येक रक्षाबंधनला सुुशी भानूला राखी बांधायला यायची. गणेशरावसुुद्धा तिचे आदरातिथ्य करायचे.


भानू व सुशी आता मोठे झाले होते. भानू आय. आय. टी. मुुंबईमध्ये शिक्षण घेत होता. सुशीने नुकतीच दहावीची परीक्षा देेऊन ११ वी विज्ञान शाखेत प्रवेेेश घेतला होता. सुशीची डॉक्टर व्हायची खूप आवड होती. पण आर्थिक बाजू साथ देत नव्हती.


ती स्वाभिमानी होती, कुुुणापुढं हात पसरण्याची तिची सवय नव्हती. स्वबळावर शिक्षण घेण्याचं तिने ठरविले. तिच्याकडे पुस्तके खरेदी करण्यासाठीसुद्धा पैसे नव्हते. तिची ही अडचण भानूच्या मित्राकडून भानूला कळाली. त्याला खूप वाईट वाटले.

त्यानं सुशीला मदत करायचं ठरविलं. सुशी खूप स्वाभिमानी आहे हेसुद्धा तो जाणून होता.


श्रावण सरी कोसळत होत्या. सर्वत्र हिरवळ पसरली होती. धरा नवा साज लेऊन नववधुप्रमाणे नटली होती. आज श्रावणी पौर्णिमा म्हणजेेेच राखी होती. सुशी नेेहमीप्रमााणे भानूला राखी बांधायला गेली. भानूसुद्धा सुुट्यावर घरी आला होता.


सुशीने त्याला राखी बांधली. भानूने सुशीला ओवाळणीत नीट परीक्षेच्या पुुस्तकांचा संच भेेेट दिला. सुशीचे डोळे पाणावले.


गणेशराव म्हणाले, "मुली खूप अभ्यास कर, यशवंत हो!"


सुुशी सगळ्यांचा निरोप घेऊन घरी निघाली. त्या दिवसापासूूून तिनेेे अविरत अभ्यास सुुरु केला. काही झालं तरी उत्तम गुणांनी

नीट परीक्षा पास करण्याचा सुुशीने चंग बांधला. नीट परीक्षेचा निकाल लागला. सुशी उत्तम गुणांनी पास होऊन तिची निवड शासकीय वैैद्यकीय महाविद्यालयात झाली.


या राखीला भावाकडूून मिळालेली प्रेमाची भेट सुुशीच्या जीवनाला कलाटणी देेऊन तिच्या स्वप्नाची पूर्तता करणारी ठरली. तसेेच भावा-बहिणीच्या पवित्र नात्याला दृढ करणारी व भरपूर जीवनानंद व ऋणानुबंध घट्ट करणारी ठरली.


Rate this content
Log in

More marathi story from Kishorkumar Bansod

Similar marathi story from Inspirational