STORYMIRROR

Shreya Chougule

Abstract

2  

Shreya Chougule

Abstract

प्रेम हे...

प्रेम हे...

2 mins
107

💕Season of Love*💕...अर्थात... प्रेमाचा ऋतू म्हणून ओळखला जाणारा...फेब्रुवारी महिना..❤


खरंच... प्रेमाशिवाय आयुष्याला अर्थच नसतो खरंतर...💞

'प्रेम' ही जगण्यासाठी निसर्गाकडून मिळालेली...🍁.. एक खूप मोठी संजीवनी आहे...❣


💗प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं... तुमचं आमचं सेम असतं...💗


एखाद्याच्या दृष्टीने महत्त्वहीन असणारी व्यक्ती..दुसऱ्या एखाद्याच्या आयुष्यात खूप महत्त्वपूर्ण आणि खास असते...😎...


आणि ...प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एकतरी व्यक्ती असतेच..😇...

प्रेमच आयुष्याला अर्थपूर्ण बनवतं... आणि जगण्यासाठी एक नवी प्रेरणा देतं..👍🏻

प्रत्येकाच्या आयुष्यात जगण्यासाठी अस एक भरभक्कम कारण असतं.. आणि ते म्हणजे..प्रेम..🥰


या पृथ्वीवर अवतरल्यानंतर जेव्हा आपण बोलायला लागतो..तेव्हा उच्चारलेले पहिले दोन शब्द..🗣...अर्थात आई & बाबा ...👨‍👩‍👧..आणि खरंतर आपल्या आयुष्यातील पहिलं वहिलं प्रेम..💕

प्रेमाची सुरुवात होते ती इथूनच..❣... आणि आयुष्याच्या संध्याकाळी ..🌄..विसावा घ्यायलाही ..🥱..ते थांबतं.. इथेच...❣


त्यानंतरच्या आयुष्यात जर आपल्यावर सर्वाधिक प्रेम...❤.. कुणी करत असेल तर..तो असतो तुमचा भाऊ..👩‍❤‍👨..मग तो लहान असो वा मोठा..☺

त्याला भारी कौतुक असतं आपलं..!😉

बिचारा आपले सगळे नखरे सहन करत असतो..🙃

...दोघांच्या भांडणात जरी आपण चुकीचे असलो...👎🏻.. तरीही बाबांचा ओरडा मात्र त्यालाच खायला लागतो...😉..पण तरीही.. तो निस्वार्थपणे आपल्यावर प्रेम करत असतो..💕


पुढच्या आयुष्यात अनेक व्यक्ती भेटत जातात..त्यांच्याशी मैत्री जमत जाते..आणि..ते कधी आपले होऊन जातात...कळतही नाही...!


गुरूंप्रती असणारी ...👩🏻‍🏫👨🏻‍🏫आदरयुक्त भीती..आणि..त्यांच्यासाठी काहीही करायला सदैव तयार असणारं मन..त्यांच्यावरील प्रेमाची साक्ष देतं...🥰


पण..हे सगळं झालं आपल्या बाबतीत...🤓

ज्यांच्याकडे असं काहीच नाहीये...त्यांचं काय..??🤔

जन्मतःच ज्यांचे आई बाबा हे जग सोडून गेलेले असतात...ज्या वयात ..👧🏻..खेळलं पाहिजे..👯🏻‍♀..

.बागडलं पाहिजे..💃🏼..हुंदडलं पाहिजे..🕺🏻...मस्ती करायला पाहिजे ..🧚🏻‍♀..त्या वयात...परिस्थितीमुळे गंजलेल्या...😔... आणि ज्यांना गरिबीमुळे फुटपाथवर भीक मागत फिरावं लागतं...अशा मुलांचं काय...???😕


ते सुद्धा भुकावलेले असतील ना प्रेमासाठी..😞...त्यांचेही डोळे ..👁..आसुसलेले असतील ना...आई बाबांची फक्त एक झलक पाहण्यासाठी...???😟..

स्वतःला सूज्ञ समजणारे आपण कधी हा विचार केलाय का हो...???🤔


देव दगडात नाही..तो माणसात आहे..आणि..हे ज्याला समजलं...त्याने अवघ विश्वच जिंकलं...🌎


मंदिराच्या दानपेटीत..🏤.. पैसे टाकण्याआधी ..💵...ज्याला त्याच मंदिराच्या पायरीवर बसलेला असहाय्य भिकारी..🧟‍♂.. दिसतो..आणि ते पैसे दानपेटीत न पडता..त्या भिकाऱ्याच्या छोट्याशा वाडग्यात..🍛.. पडतात...तेव्हा...त्या भिकाऱ्याच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य...😃..आणि तोंडभरून मिळालेले आशीर्वाद ...🙌🏻

कशाचीच सर नाहीय ओ त्याला...🤩


आयुष्याचं गमक जाणून घ्यायचं असेल ना...तर फक्त एकदा समोरच्याला प्रेम देऊन बघा...🤝🏻❣

    आयुष्यात खूप काही मिळवल्याच समाधान मिळेल तुम्हाला...❣


Rate this content
Log in

More marathi story from Shreya Chougule

Similar marathi story from Abstract