Raju Gavali

Tragedy Inspirational Action Thriller Crime

4.6  

Raju Gavali

Tragedy Inspirational Action Thriller Crime

फिनिक्स

फिनिक्स

4 mins
489


आज प्रेरणाचा वाढदिवस होता सकाळपासून ती खूप आनंदी होती कधी एकदा घरी जाते असं तिला झालं होतं. प्रेरणाच्या वडिलांची कुडाळ - वेंगुर्ला रस्त्यावर पालकरवाडी येथे एक छोटीशी वडापावची टपरी होती. तिची शाळा सुटली की ती व तिचा छोटा भाऊ आनंद आपल्या वडिलांच्या टपरीवर त्यांना मदत करण्यासाठी येत असत. प्रेरणा नववीत व आनंद सातवीत शिकत होता.


संध्याकाळची सात-साडेसातची वेळ होती रस्त्यावर वाहनांची ये जा नेहमी प्रमाणे सुरू होती. वडिलांच्या हातावर गरम तेल पडल्यामुळे ते दवाखान्यात जाण्यासाठी सहा वाजताच घरी निघून गेले होते. प्रेरणाची आईपण त्यांच्या बरोबरच गेली होती त्यामुळे आज टपरी बंद करण्याचे काम प्रेरणा वर होते.


ते दोघेही टपरी बंद करून घराकडे जाण्यासाठी निघाले, नोव्हेंबर महिना असल्यामुळे थंडी अंगाला झोंबत होती धुके पण पडले होते तिने आनंदचा हात पकडला व दोघेही रस्ता ओलांडू लागले अचानकपणे एक भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दोघांनाही जोरदार धडक दिली त्या टकरीमुळे ती दोघं रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडीत फेकली गेली.


ट्रकवाला तेथे न थांबता तसाच बेदरकारपणे भरधाव वेगाने निघून गेला. प्रेरणाने पाहिले की आनंदला खूप मार लागला होता डोक्यातून रक्त वाहत होतं तिच्याही दोन्ही पायांना आणि हाताला जोरदार मार लागला होता कदाचित तिचा हात मोडला होता खूप वेदना होत होत्या तरीपण ती हळूहळू सरकत आनंदाकडे गेली.


तिने पाहिलं आनंद बेशुद्ध पडला होता. ती कशीबशी रांगत रस्त्यापर्यंत पोहोचली मदतीसाठी येणाऱ्या वाहनाची वाट पाहू लागली. थोड्या वेळाने तिला एक कार येताना दिसली तिने हात दाखवला पण ती कार काही थांबली नाही कदाचित तीच्या रक्ताने माखलेल्या कपड्यांकडे बघुन तो थांबला नसेल.


वेदनेत विहळत असहाय्यपणे जोरात रडत ती तशीच पडली होती. थोड्यावेळाने एक टेंपो येताना दिसला ती तशीच सरकत सरकत रस्त्याच्या मध्यभागी गेली टेंपोवाल्याने तिला पाहिले व त्यांनी जोरदार ब्रेक मारला. टेंपोवाला अब्दुल खाली उतरला पण तिला पाहून तो उडालाच. तसाच धावत टेम्पो जवळ गेला व त्यांने पाण्याची बाटली आणली थोडे पाणी घेऊन त्याने प्रेरणाच्या तोंडावर शिंपडले तीने कसेबसे डोळे उघडले तेव्हा अब्दुलने तिला विचारले "काय झाले?" प्रेरणाने वर पाहिले व हाताने झाडीकडे बोट दाखवत एकदम अशक्त आवाजात "आमचा अ‍ॅक्सीडेंट झाला…आहे.. माझा भाऊ तिकडे झाडीत…दवाखान्यात...तुमची मदत" …पुढे बोलण्याची तिची ताकद संपली होती. अब्दुल धावतच झाडीकडे गेला तेथील दृश्य पाहून क्षणभर

त्याच्या डोळ्यासमोर अंधार आला. आनंद रक्ताच्या थारोळ्यात पडला होता त्यांनी आनंदला उचलले व टेंपोच्या हवद्यात ठेवले.


प्रेरणा उठायचा खुप प्रयत्न करीत होती पण तिला जमत नव्हतं. अब्दुलने तीला उचलून आनंद जवळ ठेवून पुढच्या काही सेकंदात टेंपो कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयाच्या दिशेने सुसाट वेगाने सोडला. एक एक सेकंद महत्वाचा होता. पाचव्या मिनिटाला तो रुग्णालयात पोहोचला टेंपोतून खाली उतरून धावत ओरडतच आत गेला "डॉक्टर… नर्स" … त्याचे ते ओरडणे ऐकून नाईट ड्युटी वर असलेली सीनियर सिस्टर डिसूजा आपल्या केबिन मधून बाहेर आली समोरच अब्दुल रक्ताने माखलेल्या कपड्यांमध्ये उभा होता तीला पाहताच त्याने घडलेल्या अ‍ॅक्सीडेंट बद्दल सांगितले. वॉर्डबॉयच्या मदतीने आनंदला व प्रेरणाला टेंपोतून बाहेर काढून रूग्णालयात आणले तोपर्यंत डॉक्टर जाधव व डॉक्टर साळवी तेथे पोहोचले होते. त्यांनी दोघांनाही आय.सी.यू मध्ये ऍडमिट केले व लगेच उपचार सुरू केले.


सिस्टर डिसुझाने कुडाळ पोलिस स्टेशनला फोन लावून झालेल्या अॅक्सीडेंट बद्दलची माहिती दिली थोड्यावेळाने इन्स्पेक्टर सावंत तेथे आले व त्यांनी अब्दुल कडून झालेल्या घटनेबद्दलची सर्व माहिती जाणून घेतली तसेच कॉन्स्टेबल चव्हाणला घटनास्थळी पुढील चौकशीसाठी पाठवून दिले. सिस्टर डिसूजाला "मुलं कुठली आहेत?" असे विचारल्यावर तिने आनंदच्या खिशात सापडलेले शाळेचे ओळखपत्र इंस्पेक्टर सावंत यांना दिले त्यावरील घरचा पत्ता घेऊन एक कॉन्स्टेबल तिच्या आई-वडिलांना आणण्यासाठी पाठवला.


डॉक्टर जाधव व डॉक्टर साळवी आय.सी.यू मध्ये दोघांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत होते. प्रेरणाचे आई-वडील रुग्णालयात येताच आपल्या मुलांची चौकशी करू लागले सिस्टर डिसोजाने त्यांना एका बाकावर बसवले व त्यांना आधार देऊ लागली जवळच उभे इंस्पेक्टर सावंत आय.सी.यू च्या दरवाजा कडे पाहत होते.


थोड्या वेळाने आय.सी.यू चा दरवाजा उघडला व दोन वॉर्डबॉय स्ट्रेचरवर प्रेरणाला घेऊन ऑपरेशन थिएटर कडे निघाले बरोबर डॉक्टर जाधवही होते. प्रेरणाच्या आईचे हुंदके थांबत नव्हते तिचे वडीलही रडत होते थोड्यावेळाने ऑपरेशन थेटरचा दरवाजा उघडून डॉक्टर जाधव बाहेर आले यांनी शर्थीचे प्रयत्न करून प्रेरणाचा जीव वाचवला पण आनंदच्या डोक्याला गंभीर इजा होऊन खूप रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याला ते वाचवु शकले नाही.


आनंदचा मृत्यू झाल्याचं समजताच त्याच्या आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला ती दोघं जोरजोरात रडू लागली. बरोबर एका तासाने प्रेरणा शुद्धीवर आली शरीर असहाय्य वेदनेने दुखत होते जोराने ओरडत आपल्या आई-बाबांकडे पाहून रडू लागली. अचानक तिच्या लक्षात आले की आनंद कोठे आहे तिने सिस्टर डिसूझाला विचारले आनंद आता ह्या जगात नाही हे ऐकल्यावर प्रेरणा बेशुद्ध पडली.


इन्स्पेक्टर जाधवने कायदेशीर कारवाई पार पाडली व डॉक्टर जाधवने आनंदच्या बॉडीचे पोस्टमॉर्टेम करून त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले, मुलाचे अंत्य-संस्कार पार पाडून त्याचे वडील एकदम खचले होते. प्रेरणालाही आता रुग्णालयातून घरी आणण्यात आले दिवसामागून दिवस जात होते. प्रेरणा आता पुन्हा शाळेत जाऊ लागली दहावीच्या परीक्षेत ती चांगल्या मार्क्सने उत्तीर्ण झाली. कुडाळ येथील कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले.


प्रेरणा बारावीत असताना तिचे वडिल हार्टअ‍ॅटॅकने वारले पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर प्रेरणा व तिच्या आईवर कोसळला पण मायलेकी तशाही आघातांमध्ये पाय रोऊन उभ्या होत्या. आपल्या आई बरोबर पूर्वी प्रमाणेच वडापावची टपरी सुरू ठेवली. काळाशी त्या दोघी झुंजत होत्या पण आई गेलेल्यांसाठी झुरतही होती. वर्षभरात तीही गेली. प्रेरणाने तीन वर्षात जवळचे, मायेचे, आतड्याचे एकुण तीनजण गमावले होते.


नियती इतकी क्रूर कशी काय असते? एकावर एक होणाऱ्या आघाताने खचून गेली होती पण तुटली नव्हती 'फिनिक्स' पक्षी जसा आगीत जळून राख होतो पण पुन्हा त्याच राखेतून पुनर्जीवित होतो तशीच प्रेरणा उभी राहिली. वडापावची टपरी सुरू ठेवली व आपले शिक्षण पूर्ण केले. आज ती एक शिक्षिका आहे. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy