Tushar Bhutkar

Inspirational Others

4.0  

Tushar Bhutkar

Inspirational Others

पैलवान आई

पैलवान आई

5 mins
345


पैलवान... पैलवान म्हणजे जो मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या पैलतो, कुस्ती करतो म्हणजे स्वतःच्या ताकदीच्या जीवावर भल्या भल्यांना लोळवतो. हो ना...! पैलवान आजकाल हा शब्द जो वाळलेला असतो त्याला लावतात... जो कधी कुस्ती खेळला नाही त्याला लावतात... मजाक आहे बर का...!! उगाच मनाला लागून घ्यायचं भो कोणी..!!

           पण माझ्या दृष्टिकोनातून माझा पैलवान कोण आहे माहितेय? थांबा! थांबा...!!आहो, मीच सांगतो तुम्हाला, "मी माझ्या आईला पैलवान म्हणतो."

   माझं तर म्हणणं आहे, या जगातील तमाम आया, प्रत्येक स्त्री जी कुटुंबाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर पैलवून जगते ती पैलवनाच आहे...!

अशाच एका पैलवान आईची कथा... तिच्या संपूर्ण आयुष्याचा प्रवास आपण समजून घेणार आहोत... आता ही कथा काल्पनिक आहे. ही कथा नगरी भाषाशैलीत लिहिली असल्यामुळे त्या भाषेतील जसे उच्चार आहे तसे शब्द वापरले गेले आहे. तुम्हाला माझ्या दृष्टिकोनातून ती स्त्री... पैलवान कशी हे समजून घेऊया...


कर्णाली अंकुराव शेतीकर... ही एक गरीब शेतकऱ्याची लेक... शेतकऱ्याची लेक असल्यामुळे शेतात तिला कष्ट करायची सवय... जनावराचा चारा देणं असो या कोणताही काम पोरगी न डगमगता दिमाखात करणार... अंकुरवाची तशी पाहिली तर १२ एकर शेती. पण अवर्षण ग्रस्त भागात असल्यामुळे काही त्यातील पडीकच... काही वर्षानंतर पोरीचं लग्न उच्च शिक्षित मुलाशी घमेर रेष्ठे याच्याशी होतो. घमेर अभियंताच शिक्षण घेतलेले असत. पोरग शिकलेले आहे म्हणून जमवतात... लग्न होत... जेव्हा ती बाळाला जन्म देणार असते तेव्हा तिचा त्रास असह्य असतो... त्या वेदनेने ती जीव तोडल्यागत तिला वाटत... तो त्रास सहन करून ती दोन जुळ्या लेकरांना जन्म देते...

      फक्त पैसे कमावण्याच्या पाठीमागे लागलेला घमेर कर्णालीकडे लक्ष देत नाही. कर्णालीची सासू काही वर्षांपूर्वी निधन झालेली असते. कर्णाली जेव्हा घमेर कडे बोलायला जायची तेव्हा तो तिच्याशी भांडायचा... मारायचा... कारण काय तर, "तुम्ही माझ्याशी २ शब्द प्रेमाने बोलत जा..!काय नुसतं काम काम... बाकीच्या जबाबदाऱ्या पण आहे...!"

घमेर तिला म्हणतो, "तू नको शिकवू. काय महत्वाचय...! (रागाने बोलतो) तुझ्यापेक्षा जास्त शिकलोय मी...! मला कळत काय ते योग्य...! अन तुझ्याशी बोलून काय करू? माझं काम सोडून देऊ का? माझं काम सोडू का...? माह्यासाठी कमावतो का...? मी कमवत नाही तुझ्यासोबत गप्पा मारतो...!! रागारागात लॅपटॉप बंद करत... आता बोल की..!!" जोरात तिच्यावर ओरडतो अन तिला हणतो...

          पण ती शांतपणे... डोळ्यातील पाणी पुसत... पोरांना जेऊ घालते... त्यांना झोपवते... अन रात्रीच्या त्या अंधारात विचारात मग्न होते, "असा कसा हा जन्म? बाई...! चांगलं बोलावं तरी वाईट! अन वाईट तर आपल्याला करता येत नाही! बोलले असते, 'जेवली का? कशीय? पोर त्रास देत तर नाही ना जादा...?' एक हास्य दिल असत पण नाही... नोकरसारखी वागणूक..! काम करायचं पण जीवाने जाणणारा जेव्हा जीवावर उठतो तेव्हा स्त्री कमजोर पडते...!" लेकरांवर हाताने स्पर्श करत ती झोपी जाते.

           सकाळी उठून नवऱ्याला स्वयंपाक करून वेळेवर डबा देते... नवरा वळून बघत नाही... पुन्हा ती घरातल्या कामाला लागते... पोरांना अंघोळ घालून जेऊ घालते... घर पुसून साफ करते... सासरे जनजीतराव दुपारी कामावरून आले की त्यांना जेवायला वाढते... गोळ्या देते हृदयविकाराच्या. असेच तिचे दिवस सारतात... एक दिवस माहेरी जाते... बऱ्याच दिवसांनी आई वडिलांना भेटायला... इकडं जनजीतराव हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने जातात. नवरा हिलाच दोषी ठरवतो...

            पोर मोठी होतात... पोर पण अभियंते, वकील बनतात... पण आईला खूप जीव लावतात... नवरा... सुधारला... नाही तसाच... काही लोक खूपच अर्धांड असतात...! त्यांचा अहंकार त्यांना कधी सुधारू देत नाही...! कर्णाली... आता लेकरांना कामाला जायला डबे करून देते... नवऱ्याला डबा देणार... शेतात जाणार... बायांसोबत काम करणार... घरी येणार स्वयंपाक करणार. "आपलं नित्याचे काम कधी सुटतात का? बाईच्या जातीला मरुस्तर काम बाई...!" कर्णाली मनातल्या मनात विचार करते.

            काही वर्षानंतर आई वडील नदीला आलेल्या पुरात वाहून जातात... भावाकडून एक पैसा घेत नाही... भाऊ १ एकर देतो पण त्या जमिनीचा काही उपयोग नसतो... एकटपन माणसाला खचवत पण सवय लागली का त्याला सर्वांना पुरून उरेल अस बनवत.

     असेच दिवस जातात... पोरांची लग्न होऊन सूना येतात...त्या... त्या समजदार असतात... त्या कर्णालीला मदत करतात... तिच एकटेपण दूर होत. आपल्याला समजून घेणार कोणीतरी आयुष्यात आहे याच त्या माऊलीला समाधान वाटत... सुनांना जेव्हा तिची जीवनकथा समजते तेव्हा ते कर्णालीला "पैलवान आई " म्हणायला लागतात.

       पैलवान का? पैलवान कमी पडला तरी हार मानत नाही... समोरच्याला चितपट करायचा प्रयत्न करतो...! तेल लावून तासन तास खेळतो...! एकटा असतो पण लढाईत कधी कमी पडत नाही...! कुस्ती म्हणजे त्याचा जीव असतो...! कुस्ती खेळायला तो कशाची अपेक्षा न बाळगता तासन तास तालमीत जातो... सर्व शिकतो... पराभव सहन करतो... पण एकदा असा डाव खेळतो की सर्वांची मन जिंकतो...!!

     तशीच घरातील कष्ट करणारी स्त्री असते. तिची तालीम किचन, शेती असते... तासन तास ती त्यात असते... स्वयंपाक करणे म्हणजे सर्वांच्या आनंदासाठी तिचे कर्तव्य जस पैलवानाच कुस्तीतील हेवेदावे शिकून लोकांची मन जिंकणं..! तिचा कुस्तीचा डाव म्हणजे तिचे कर्म... शेतात जाऊन कष्ट करेल आणि सर्वांना पोटभर खाऊ घालीन.

            पैलवनाच शरीर बळकट असत. कुस्तीतील डावात मार भेटला तरी तो खाऊन आनंदाने खेळायचं आणि जिंकायचं... ती जेव्हा पोटुशी असते, तिला होणारे त्रास किंवा शरीरात होणार्‍या बदलांना ती विनासायास सामोरी जाते. वंशपंपरा कायम होणार, मुलगा/मुलगी नातवंडे अंगणात बागडणार त्यांच्या आगमनाने कुटुंब पुर्ण होणार हा आनंद शब्दात व्यक्त होणे नाही. पण ती माऊलीचं कौतुक करावं, आधार देण्याचे कार्य जाणीवपुर्वक होत नाहीत. मुलांना जन्म देत असते तेव्हा वेदनेने हार मानत नाही... त्रास सहन करते आणि तिच्या काळजाचे तुकडे... तिने नऊ महिने संभाळलेले दोन जीव जगात येतात...स्त्री त्रास सहन करून पण आनंदाने सेवा करते आणि सर्वांची मन नेहमी जिंकते...! शक्तिशाली नसेल पैलवनासारखी पण सर्व कुटुंबाबची जबाबदारी इमानदारीने पैलवते...! ती स्त्री पैलवान आहे का नाही...?

        काही वर्षांनंतर वय झाल्याने कर्णालीच निधन होत. आयुष्यभर सर्वांच्या कल्याणासाठी तिने हाल, कष्ट सहन केले आणि या जगातून निरोप घेतला. पैलवान आयुष्याची कुस्ती जिंकला पण मृत्यूशी कुस्तीत तो हरला...! पण त्याने मृत्यूला पण कुस्ती खेळायला भाग पाडले... जसा पैलवान जिंकत जातो... खूप मोठ्या मोठ्या स्पर्धा जिंकतो... निवृत्त होऊन सर्वांच्या मनाला चुटुक लावून जातो तसा! आणि हा रुबाब राहिला की, जेव्हा स्त्री आजी होते... नातवासाठी ती एक रुबाबदार असते... कधी स्वतःच्या नातवासाठी तर कधी दुसऱ्याच्या... पण खर सांगू, स्त्रीच्या प्रेमात... आईच्या प्रेमळ हाकेत आणि मैत्रिणीच्या सल्ल्यात... प्रियसीच्या स्मित हास्यात... बहिणीच्या भांडण्यात... जो रुबाब असतो ना अस्सल पैलवानी असतो... जेवढा त्याला त्याच्या मिशा पिळून होतो तेव्हढा...!


कष्ट करते, शेतात राबते

समोरच्याच्या आनंदासाठी

जी स्वतःची दुःख विसरते

लढते एकटीच मैदान

करते सगळं सहन

हार मानत नाही

नेहमी जिंकते मन

मायेचा प्रेमळ साद

आजीचा कथेचं नाद

किती देऊ त्याला दाद

पैलवणासारखी भक्कम

पैलवणासारखी दांडगी

पैलवनाप्रमाणे शरीर नसलं

पण पैलवणासारखं जीवनशैली

जिंकते मैदान, गाजवते जीवन

पैलवान आई तब्येतीने नसली

पण जीवनाच्या क्षणोक्षणी

वाटे मज पैलवान...!!


   तर अशी होती ही पैलवान आईची कथा... आई मला पैलवानासारखी वाटते... जे गुण पैलवानात असतात तेच मला तिच्यात दिसरात... प्रत्येक स्त्री ही माझ्या दृष्टिकोनातून पैलवान आहे आणि तुमच्या...??


Rate this content
Log in

More marathi story from Tushar Bhutkar

Similar marathi story from Inspirational