STORYMIRROR

Sachin S. Chalgond

Inspirational

2  

Sachin S. Chalgond

Inspirational

नवी संसद भवन

नवी संसद भवन

3 mins
84

नव्या संसद भवनाचं उद्घाटन आत्ता पार पडलं.

खरंतर नेहमी लोक सभेत किंवा राज्य समेत वाद होतात पण नव संसद भवन हे सुरवाती पासूनचं वादात होतं.

पहिले म्हणजे नविन संसद भवनाच्या इमारतीय बजेट वादात सापडले.

नव्या संसद भवनाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिसेंबर 2020 मध्ये करण्यात आली.

'नविन संसद भवनासाठी 862 कोटी चीं तरतुद करण्यात आली होती.'

जुलै 2022 रोजी संसद भवनाच्या वरती स्थापित केलेल्या राष्ट्रीय चिन्हाचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

"सेंट्रल विस्ट प्रकल्प" ज्यात नवीन संसद भवन, पंतप्रधानांच निवास स्थान, केंद्रिय सचिवालय यांचा समावेश आहे.

हे प्रोजेक्ट सुधारण्यासाठी झाडं तोडण्यावरुन पर्यावरण तंज्ञां कडुन केंद्र सरकारला सवाल करण्यात आले होते मात्र केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाकडून झाडे तोडण्याचं टाळून त्या ऐवजी झाड लावणार असल्याचं सांगितलं. संसद भवनातून काढलेली 404 झाडं इको पार्क मध्ये लावण्यात आल्याची माहिती सरकारने सेंट्रल विस्टा च्या वेब साईटवर दिली आहे.

संसद भवनाविषयीच्या गाजलेल्या गोष्टी

पहिलि गोष्ट म्हणजे सेंगोल

नविन संसद भवनात सभापती आसनाच्या बाजूला हा सेंगोल (राजदंड) बसविण्यात आला आहे.

भारताला स्वतंत्र्य मिळले त्याच्या पूर्व संध्येला महणजेच 14 ऑगस्ट 1947 ला पंतप्रधान नेहरुना सेंगोल देण्यात आला.

सेंगोल हा शब्द तामिळ शब्द सेनमई यावरुन घेण्यात आला आहे. त्याचा अर्थ निति परायता असा आहे. न्यायाचा रक्षक म्हणून त्यावर हाताने कोरलेला नंदी बसविण्यात झाला आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे संगोल धारण करणाऱ्या व्यक्तीला न्याय आणि निर्पेक्ष पणे राज्य करण्याचा आदेश देण्यात आला आहे. लोकांच्या सेवेसाठी आपल्याकडे हि जबाबदीशे देण्यात आली आहे हे त्यांनी विसरु नये असे निर्देश असतात.

आणि दुसरे म्हणजे नव्या संसद भवनाच्या उभारणीत गाजलेल नाव म्हणजे 'बिमल पटेल'. बिमल पटेल संसद भवनाचे आर्किटेक्ट आहेत. त्यांनी विश्वनाथ धाम, काशी विश्वनाथ मंदिर, गुजराथ हायकोर्ट बिल्डिंग, आए आए एम अहमदाबाद कँम्पस, टाटा सिजीपीएल टाऊन सिफ, साबरती रील फ्रेड डेव्हलपमेंट

प्रोजेक्ट आणि पंडित दिनदयाल पेट्रोलियम विद्यापिट सह आता हे नव्या संसद भवनासह अनेक मोठ्या इमारतीचं डिझाइन केलं आहे. आर्क्टिक क्षेत्रातल्या असामान्य कार्यासाठी त्यांना 2019 मध्ये पद्म पुरस्काराने सन्मानित करूयात आलं आहे.

★ नव्या संसद भवनाच्या इमारतीच्या बांधकामाची वैशिष्ट्ये:-

• संसद भवनाच्या नव्या इमारतीच्या बांधकामाची एकूण कॉस्ट 862 करोड इतकी आहे.

• नव्या संसद भवनासाठी वापरलं गेलेलं सागवान लाकूड नागपुरातून आणलेलं आहे.

• लाल-पांढरे वाळूचे खडे राजस्थानतल्या सर्मथुरा इथून आणले गेलेत.

• भगवा हिरवा दगड उदयपूर इथून, लाल ग्रॅनाइट अजमेरजवळच्या लाखा इथून आणि पांढरा संगमरवर राजस्थानातल्या अंबाजी इथून आणला गेलाय.

● लोकसभा आणि राज्यसभेच्या चेंबर्समध्ये फॉल्स सिलिंगसाठी स्टील स्ट्रक्चर दमण-दीव इथून खरेदी करण्यात आलंय.

● फर्निचर मुंबईत बनवलंय.

● कार्पेट उत्तर प्रदेशातल्या मिर्झापूरचं आहे.

● राजस्थानातल्या राजनगर आणि नोएडा इथून दगडी जाळीचं काम करण्यात आलंय.

● अशोक चिन्हासाठीचं साहित्य महाराष्ट्रातल्या छत्रपती संभाजीनगर आणि राजस्थानातल्या जयपूर इथून मागवण्यात आलं.

● भिंतीवरचं अशोक चक्र मध्य प्रदेशातल्या इंदौरहून आणण्यात आलंय.

● नवीन संसद भवन ही त्रिकोणी आकाराची चार मजली इमारत असून संपूर्ण कॅम्पस ६४,५०० चौरस मीटरमध्ये पसरलेला आहे.

● ज्ञानद्वार, शक्ती द्वार आणि कर्मद्वार असे तीन मुख्य दरवाजे आहेत.

● व्हीआयपी, खासदार आणि व्हिजिटर्ससाठी विशेष प्रवेश द्वार आहेत.

● या इमारतीत एक कॉन्स्टिट्युशन हॉल सुद्धा आहे.


★ नव्या संसद भवनाची ईतर वैशिष्ट्ये :-

• संसद भवनाची नवी ईमारत विक्रम वेळेत उभारलेली आहे असं म्हटलं जातंय.

• 10 डिसेंबर2020 ला नवीन ईमारतीची पायाभरणी करण्यात आली होती तर 28 मे 2023 ला संसद भवनाचं उद्घाटन करण्यात आले.

• पंतप्रधानांना चेन्नईतल्या तिरु विदु थिराई अधानम् चे     अंमबलावन देविका परमास्वामीक यांनी राजदंड सुपुर्द केला.

• 75 वर्षांपूर्वी याण मठाच्या संतांनी पंडित नेहरूंना राजदंड दिला होता.

• संसद भवनाची हि इमारत 150 वर्षे व्यवस्थित टिकू शकते असही बोललं जातंय.

• नव्या संसद भवनात1272 सीट्स आहेत.

• त्यापैकी 888 लोक सभेसाठी.

• तर 384 सिट्स राज्यसभेसाठी राखीव आहेत.

• महत्त्वाचं म्हणजे टाटा प्रोजेक्ट लिमिटेड या देशातल्या सुप्रसिद्ध टाटा समूहाच्या कंपनीने संसद भवन बांधलय.


जुन्या संसदेचे काय ?

                      सरकारच्या म्हणण्यानुसार संसदेचे जुनी इमारत पाडली जाणार नाही. या इमारतीची दुरुस्ती केली जाणार आहे. लोकसभा सचिवालय यांच्याकडून संसद भावना बाबत तयार करण्यात आलेल्या पुस्तिकेनुसार नव्या संसदेच्या उद्घाटनानंतरही जुन्या संसद इमारतीचा वापर सुरू राहील. तसंच दोन्ही इमारती एकमेकांना पूरक राहतील असं सांगण्यात आलं आहे.


Rate this content
Log in

More marathi story from Sachin S. Chalgond

Similar marathi story from Inspirational