Madhuri Dashpute

Inspirational

4.0  

Madhuri Dashpute

Inspirational

निसर्गमाया

निसर्गमाया

6 mins
252


 "अग काय हे मेघा"?!! "रोज सकाळी इथे पक्षांसाठी दाना,पाणी ठेऊन जातेस... कित्ती घाण करतात ते दिवसभर गॅलरीत, टेरेस वर.. तू जातेस निघून पण दिवसभर उच्छाद मांडतात ते इथे"..

        "कावळे, चिमण्या, कबुतर सगळीच येतात अन नुसताच गोंगाट करतात.. त्यात हीं त्यांची विष्ठा इकडे तिकडे पडलेली असते. मला नाही आवडत हे सगळं"...

        ''अहो आई'', पण मी आवरते ना सगळंच ऑफिस वरून आले की..

         "तू आवरतेसच आणि तूच आवरायचं हीं आहेस, घाण तुझ्यामुळेच होते ना इथे सगळी.. आणि झाड, वेली पण किती लावून ठेवल्या आहेत... दिवसभर पाला, पाचोळा पडतो आणि घरात घाण हीं येते.. नाही म्हणून सांगितलं तरी ऐकत नाहीस"..

        मेघा सासूचं सगळं बोलण ऐकत होती..आणि तिची ऑफिस ची वेळ हीं झाली होती.. मेघा काही न बोलता निघून गेली ऑफिस ला.. अर्थात दाना, पाणी ठेऊनच गेली पक्षांसाठी...

        संध्याकाळी ती सोबत दोन वॉलपेपर घेऊन आली.. आधी सगळं आवरून घेतलं.. जेवण हीं झाली, तितक्यात रोजच्यासारखं शतपावली करायची म्हणून सासुसोबत निघाली.. उन्हाळा तीव्र असल्यामुळे संध्याकाळी हीं उकड्याने हैराण झाला होता जीव.. काही पावलं चालून झाल्यावर सासू म्हटली की जरा बसून घेऊया या झाडाजवळ, बर वाटेल.. घामाने पार जीव कासावीस होतोय..

       सासूबाईंच असं बोलण ऐकताच ती हळूच गालात हसली आणि दोघेही एका झाडाखाली निवांत बसल्या.... इतक्यात मंद वाऱ्याची छान झुळूक आली आणि क्षणात असह्य उकाड्याने शरीरावर शीतल रोमांच दाटले... सासूबाई लगेच म्हणाल्या,, "किती बर वाटल नाहीं,या असह्य उकाड्यात हीं मंद वाऱ्याची झुळूक हळुवार तनाला स्पर्शून गेली आणि तणासोबत मन हीं उल्हासित होऊन गेलं"..

      रेश्मा सासूबाईंच बोलण गालात हळूच हसू आणून ऐकत होती.. जरा वेळ गेल्यावर रेश्मा 'निघूया का आता'? असं सासूबाईंना म्हणाली... सासूबाईला त्या झाडाखालच्या शीतल जागेवरून उठावंसं वाटत नव्हतंच खरं, पण उशीर होत होता म्हणून दोघेही निघाल्या...

      घरी परतल्यावर दोघेही आपआपल्या खोलीत जाऊन निजल्या... पण दिवे नव्हते म्हणून आज पंख्याला सुट्टी मिळाली होती.. पण पंख्यांची अशी अचानक उन्हाळ्यातली सुट्टी परवडणारी नव्हती... घामाने जीव कासावीस होत होता, सासूबाईंना तर जरा उकाडा सहन होत नसे, म्हणून मग त्यांनी आपल्या खोलीतली खिडकी उघडली आणि क्षणात छान हवा आत आली, आणि अगदी प्रसन्न वाटलं सासूबाईंना...

       क्षणात त्यांचा डोळा लागला आणि पहाटेच घडाळाच्या गजराने जाग आली त्यांना.. डोळे उघडून त्यांनी प्रथम पंख्याकडे पाहिलं पण अजूनही त्याची सुट्टी संपली नव्हतीच... मग सासूबाई स्वतःशीच पुटपुटल्या " काय मेली जाऊन बसलीय रात्रीपासून, पण तरी इतकी छान झोप लागली मला,, खिडकी उघडली ना म्हणून", "किती गार वाटलं उघडताच आणि कधी डोळा लागला कळलं देखील नाही.." म्हणतं त्या आपल्या खोलीतून बाहेर आल्या..

       रेश्मा तिचं आवरून ऑफिस ला जाण्याच्या तयारीत होती, तिने सगळं पटापट आवरलं आणि ऑफिस ला निघाली.. सासूबाईंना येते म्हणतं ती निघाली ऑफिस च्या दिशेने... इतक्यात सासूबाईंच लक्ष हॉल मधल्या दोन नवीनच चित्रांकडे गेलं..

'अरे हे काय'?!! म्हणतं त्या पोस्टर लावलेल्या भिंतीच्या दिशेने वळल्या आणि अगदी निरखून ते दोन्ही चित्र न्याहाळू लागल्या...

         न्याहाळून झाल्यावर त्या काहीतरी विचारात तश्याच पुढे आल्या... आणि त्यांनी पाहिलं की, आज रेश्मा ने दाना पाणी ठेवलंच नव्हतं पक्षांना. अरे, ती विसरली बहुतेक!! असं म्हणतं त्या अजून पुढे गॅलरीत जाऊन उभ्या राहिल्या आणि तेथून एक नजर पारसबागेकडे भिरकावली.. रेश्मा ने आज झाडांना पाणी हीं दिलं नव्हतं, ती पार रुसवेली दिसत होती.. त्यांच्यातला टवटवीतपणा आज कमी झालेला दिसत होता. नाहीतर एरव्ही पहाटे रोज त्यांना पाण्याने अंघोळ घालताच ते अगदी सुटबुटातल्या माणसासारखे सुंदर, छान, गोड दिसायचे.. पण आज अगदी रुसल्यासारखे दिसत होते ते..

        सासूबाईंना कळतच नव्हतं, या सर्वांमागच कारण.. त्या तश्याच आत गेल्या.. त्यांची सर्व काम आटोपली, पण आज त्यांना घर अगदी खायला उठत होत.. आज अगदी शांत आणि निस्तब्धतां पसरली होती सगळीकडे...

        रोजच्यासारखा पक्षांचा चिवचिवाट की किलबिलाट काहीच आज कानी येत नव्हतां .. रोज दाना पाणी खायला येणारे आज फिरकत होते पण दुरूनच पाहून परतून जात होते... एक दोन वेळा येऊन पाहून गेले ते पुन्हा फिरकलेच नव्हते...

         झाडें वेली हीं आज हिरमुसलेल्या दिसत होत्या... त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज संपून जणू सुरकुत्या पडाव्या तस त्यांच्याकडे पाहून वाटत होत... हे सगळं पाहून सासूबाई हीं आतून हिरमुसल्याच होत्या पण अजूनही फारस त्यांच मन पूर्णपणे निसर्गाशी समरस झालं नव्हतं....

        त्या सारखं आत बाहेर करत होत्या, तसंच आताही त्या बाहेर पुन्हा उत्सुकतेपोटी गॅलरीत आल्या पण पुन्हा खिन्न होऊन आत जायला निघाल्या तसं एक चिमणी अचानक गॅलरीत येऊन पडली... तसं सासूबाईंनी वळून पाहिलं आणि पाहिलं तर काय, ती चिमणी बेशुद्ध अवस्थेत पडली होती.. तप्त उन्हामुळे तिची अंगाची लाहिलाही झाली होती आणि पाणी कुठेच न मिळाल्याने तिला भोवळ आली होती... सासूबाई धावत आत गेल्या आणि एका भांड्यात पाणी घेऊन आल्या.. त्यांनी ते त्या बेशुद्ध पडलेल्या चिमणीच्या अंगावर एक दोन शिंतोडे टाकले तसं ती चिऊताई शुद्धीवर यायला लागली...

         सासूबाईनीं ती पाण्याची वाटी तिच्याजवळ सरकवली आणि आत जाऊन काही दाणे हीं घेऊन आल्या... चिऊताई आतापर्यंत पूर्णपणे शुद्धीवर येत होती.. तीने झटकन त्या वाटीतल पाणी पिलं, काही दाणे आपल्या चोचित घेतले आणि भुर्रर्रर्रकन उडाली, चिव चिव करत तिच्या मार्गाने...

         सासूबाई मात्र आता खूप आनंदल्या होत्या.. समाधानाच्या भावना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या... त्या तसच आत गेल्या आणि पुन्हा मूठभर दाणे आणि भांड्यात पाणी घेऊन बाहेर आल्या, आणि रोजच्याजागी ठेवलं..

         आपल्या परसबागेत जाऊन झाडांना पाणी दिलं.. त्यांना छान न्हाऊ घातलं, सगळी झाडलोट केली... आता कस झाडें वेली आनंदल्या होत्या... आणि आनंदाने एकमेकांना सळसळ करून जणू आलिंगन देत होत्या.... हे सगळं पाहून सासूबाईंही आनंदल्या.. त्यात दिवसभरात मिळाली नाही ती एक वाऱ्याची झुळूक हळूच त्यांना स्पर्शून गेली... आता त्यांना अगदी भरून आल्यासारखं झालं.....

         सासूबाई ते सगळं आटोपून आत आल्या.. एव्हाना माध्यान्न सरून ऊन उतरत होत...

थोड्या वेळात सांजवातीची वेळ होईल म्हणून सासूबाईनीं उरलेली काम संपवली... ती करत असतांनाच त्यांच लक्ष पुन्हा त्या भिंतीवरल्या चित्रांकडे गेलं... त्यातलं त्यांनी एक चित्र, जे अशोभनीय आणि न आवडणार वाटल ते काढून भिंतीवेगळं केल...

          संध्याकाळी मेघा कामावरून परतली. तीने पाहिलं की सासूबाईंनी आपण लावलेल्या दोन चित्रांपैकी एक काढून टाकलंय, पण तिने आत्ताच काही न विचारायचं ठरवलं आणि आपली काम आटोपली... तसं तिने मुद्दामच काही वेळाने गॅलरीत ढुंकून पाहिलं तर तिथे दाणा पाणी रोजच्यासारखंच ठेवलेल दिसलं तिला... ती हळूच गालात हसली आणि आत गेली... खिडकीतून डोकावलं तर झाडेही रोजच्यासारखी हसतांना, खेळतांना दिसली तिला... मेघा ला एव्हाना जाणीव झाली होती सगळ्यांची पण ती गप्प बसली...

         आज मेघा ला सुट्टीच होती... सासूबाई आणि मेघा ने सकाळची सगळी आवराआवर केली..

तसं सासूबाईंनी मेघाला गाडी काढ म्हणून सांगितलं.. दोघेही गाडीत बसल्या... मेघाला ठाऊक नव्हतं की आपण कुठे जात आहोत पण सासूबाईंनी सांगितलं म्हणून ती निघाली त्यांना घेऊन... जातांना वाटेत एक रोपवाटिका होती, सासूबाईंनी तिथेच मेघा ला गाडी पार्क करायला सांगितली आणि रोपवाटिकेत जाऊन छान विविध प्रकारची फुलझाडे विकत घेतली. काही रोपे हीं घेतली आणि समाधानाचे भाव चेहऱ्यावर घेऊन तिथून परतल्या....

          दोघेही घरी आल्या तसं मेघा काही विचारायच्या आतच सासूबाई तिला म्हणाल्या की, "मेघा तूला कळलं असेलही कदाचित माझ्या वागण्यामागच गुपित पण तरीही सांगते", "अग, या निसर्गाची किमया विसरलेच होते मी.... त्याच्याशी एकरूप झालं तर किती सुखकर आणि चैतन्यमय वाटत हे आज कळतंय मला... आणि मनापासून आभार तुझे की या सगळ्यांची जाणीव तू करून दिलीस मला अन ती हीं अगदी नकळत"... "अग, हे पशु, पक्षी, हा निसर्ग, हिच तर खरी अमूल्य देण आहे ईश्वराची आपल्याला.... त्यांच्यामुळे आपण आहोत, हे समजुन हीं उमजत नव्हतं मला.. पण आज तू मला जाणीव करून दिलीस सगळ्यांची, म्हणून खूप आभार तुझे..... आणि त्या तू लावलेल्या चित्रातच खरं समजलं होत खरं तर, की,, उजाड माळरान कधीच शोभून दिसत नाही.. निसर्ग हा अनमोल ठेवा आहे आणि तो जतन करणं हे आपल्याच हातात आहे, हे तू पटवून दिलस मला.. वयाने मी मोठी असले तरी आज तू माझी गुरु झालीस हे नक्की", असं म्हणतं त्यांनी मेघाचे आभार मानले...

       मेघाने हीं "काहीतरीच हं आई", म्हणतं सासूबाईंना मिठी मारली आणि आपलं हास्य मोबाईलच्या कॅमेरात कैद केल, ते हीं फुल झाडांसोबत, आणि पोस्ट हीं केल खाली टॅगलाईन टाकत,"" निसर्ग हाच अनमोल ठेवा, तुम्ही, आम्ही साऱ्यांनी तो जपून ठेवा "".... 


Rate this content
Log in

More marathi story from Madhuri Dashpute

Similar marathi story from Inspirational