नैराश्य... नकारात्मक मानसिकता
नैराश्य... नकारात्मक मानसिकता


नैराश्य म्हणजे मनाने खचून जाणे.. एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही.... की "हे मला का मिळालं नाही" अशी भावना मनात रुजत जाते आणि ती मिळवण्यासाठी केलेली धडपड आठवून-आठवून मन खोल विचारांच्या गर्दीत हरवत.
"मी किती प्रयत्न केले ते मिळवण्यासाठी. माझे सगळे प्रयत्न निष्फळ ठरले. आता माझ्या जगण्याला अर्थ नाही." अशी भावना म्हणजे नैराश्य.
"लोकं काय म्हणेल मला....मी हरलो "
"हसतील सगळे माझ्यावर... माझ्या अपयशावर"
"खुप.. मोठ मोठ्या गोष्टी करत होता /होती आता कसा /कशी तोंडावर पडला /पडली." लोकांच्या अशा कुत्सित बोलण्यामुळे आणखीच मनोबल खचत त्या परिस्थितीतील व्यक्तीच.
एक तर कामात आलेल्या अपयशाला सामोरे जातांना दमछाक होते. आणि त्यात भरीस भर लोकांचे टोमणे.त्यामुळे आलेल्या अपयशाचं यशात रूपांतर करण्याऐवजी तो व्यक्ती नैराश्याच्या विळख्यात गुंतत जातो.
अशा वेळी आधार हवा असतो भक्कम..
कुणाची तरी साथ हवी असते प्रेमळ,
प्रोत्साहन हवं असत.. "तू फक्त लढ मी तुझ्या सोबत आहे " अशा शब्दांची.
पण ते कुठूनच मिळत नाही. आणि मग मन निराशेच्या गर्देत हरवत जात.
घरचे देखीलं अशावेळी आपला साथ देत नाही..कारण त्यांना खुप अपेक्षा असतात आपल्याकडून आणि आपण जर त्या पूर्ण करू शकलो नाही तर त्यांचा देखील हिरमोड होतो. त्याचं काही चुकत नाही तस बघितलं तर. आई -वडील मुलांकडून अपेक्षा ठेवणार नाहीतर कुणाकडून ठेवतील...बरोबर न.
आजकाल काही जण म्हणतात मुलांकडून अपेक्षा ठेऊ नये. त्यांना एक सांगावस वाटत. की पालक ते कोणतेही असो श्रीमंत वा गरीब.. आपापल्या परीने मुलांना मोठ करण्यात स्वतःच्या इच्छा मनातच मारतात पण मुलांना योग्य ते शिक्षण, कपडे, खाण -पिन सगळं करतात. मग मुलांकडून काही अपेक्षा केल्या तर बिघडलं कुठे. आणि जर अपेक्षा भंग झाला आणि दोन गोष्टी पालक बोलले मुलांना तर त्याच वाईट वाटून घेऊ नये मुलांनी.. कारण
"आई रागावली म्हणून मुलाची आत्महत्या "
"मोबाईल दिला नाही म्हणून.. मुलाची आत्महत्या "
"परीक्षेत कमी मार्क का मिळाले? हे विचारलं पालकांनी म्हणून मुलगा घर सोडून गेला" अशा बऱ्याच न्यूज आपण वाचतो. या सगळ्या घटना एकतर रागाच्या भरात होतात नाहीतर नैराश्यामुळे.
आपण काहीच नाही करू शकलो ही नाकारत्मकता मनात येऊन आत्महत्या करण्यासारखं टोकाचं पाऊल उचलल्या जात.
नैराश्य कितीही आल तरी मनानी खचायच नाही...कारण या जगात काहीही अमर नाही किंवा नष्ट हाेनार नाही असे काहीच नाही. त्यामुळे यश अपयश हे येणारच. अपयशाने खचून जाण्यापेक्षा त्यातून मार्ग काढून यशाचा खडतर प्रवास करावा.
नैराश्याच्या विळख्यात जाण्यापेक्षा....त्यातून म्हणजेच अपयश का आल याच्या चुका शोधून त्या दुरुस्त कराव्या. आणि अपयश आल्यावर जे आपल्याला बोलतात त्यांचे म्हणजेच बोलणाऱ्यांचे तोंड देखील बंद करावे.
यासाठी आत्मविश्वास हा सगळ्यात महत्वाचा आहे..नेहमी आत्मविश्वासू असलं पाहीजे. त्या आत्मविश्वासाच्या जोरावर आपण हरलेली लढाई देखील जिंकू शकतो.
आलेल्या अपयशा बद्दल, आपल्या नैराश्याबद्दल आपल मन कुणाजवळ तरी मोकळ करावं. मन माेकऴ केल की मन हलक हाेत. आणि निराशेच मळभ हळू हळू दूर सारल्या जात.
नैराश्यामुळे बरेच व्यक्ती व्यसनाच्या आहारी जातात.. आणि आयुष्य उध्वस्त करून ठेवतात. अशा वेळी हिमतीने या सर्वांवर उपाय शोधावा आणि मार्ग काढावा. पण व्यसनाच्या जाऊ नये.आणि आत्महत्या तर मुळीच करू नये.. कारण आयुष्य अनमोल आहे आणि ते एकदाच मिळत.
तेव्हा
" बदलूदे दे संदर्भ जगण्याचे,
मावळत्या दिनकराबरोबर..
मनाला येऊ दे उभारी,
पहाटेच्या रविकिरणांबरोबर.. " असंच म्हणेल मी...