Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

Kuldipak Pustode

Inspirational

4.0  

Kuldipak Pustode

Inspirational

मला मिऴालेले यश.....!

मला मिऴालेले यश.....!

4 mins
30


आपल्याला वाटतं,

काही खरं नाही,

आपण एकटेच,

संपलं सगऴं! 

प्रत्यक्षात खरंच तसं असतं का...?


मी गोंदिया जिल्ह्यातल्या एका छोट्याशा खेड्यातला. अर्जुनी/मोर तालुक्यातील स्मार्ट सिरेगावबांधचं आमचं कुटुंब. नाव माझं 'कुलदिपक जीवन पुस्तोडे.' माझं शिक्षण सध्या लाखनीतील नामवंत अशा समर्थ महाविद्यालय येथे अकरावी विज्ञान शाखेत सुरू आहे.


स्वप्नं थांबली की, आयुष्य थांबते. विश्वास उडाला की, आशा संपते. काळजी घेणे सोडले की, प्रेम संपते. म्हणून मी एक स्वप्न पाहिले. मी ते करेन यावर विश्वास ठेवला व तशी त्या स्वप्नांची काळजी घेतली. कारण मला माहिती होते, जीवनाचा प्रवास कष्टाचा असला तरी तो तितकाच प्रिय व सुंदर आहे. दिवसांमागून दिवस समोर जात असताना 23 नोव्हेंबर, 2019चा दिवस उजाडला. हा दिवस इतर दिवसांपेक्षा वेगळा होता. तो यासाठी की, विचारांच्या गर्दीत एक विचार डोक्यात आला 'मी पोहायला शिकलो तर....?'


असा भन्नाट विचार मनात आला. विचार येऊन थांबला नाही तर त्या विचारांवर मंथन झाले, अभ्यास झाला व त्यानुसार दुसऱ्याच दिवशी पोहण्यासाठी जायचे हेही निश्चित झाले. पोहायला शिकताना होणार असलेल्या त्रासाची मला जाणीव होतीच पण त्यापेक्षा मी पाहिलेल्या माझ्या ध्येयाच्या आनंदाची तीव्रता जास्त होती.


रविवार, दि. 24-11-2019चा सुवर्ण दिवस, पहाटेची 5 वाजताची वेळ. माझी उत्सुकता वाढत होती. मी कधी कधी मित्रांसोबत पोहण्यासाठी स्वारीला निघतो असेच वाटायला लागले होते. थोड्याच वेऴात सर्व मित्र एकत्र जमले.


मग सुरू झाला आमचा मोटारगाडीने प्रवास. सोबतच कपडे, पोहण्याच्या मदतीसाठी हवा भरलेला गाडीचा ट्यूब आणि बहूरुपी असलेला माझा मोबाईल मी आवर्जून घेतला होता.


काही वेळातच ते दृश्य दिसू लागले. ते खूप सुंदर होते. सुंदर ऊन पडलं होतं. आजुबाजूला डोंगर आणि डोंगरांच्या विऴख्यातून बाहेर पडायचा आमच्या गाडीचा केविलवाणा प्रयत्न. उत्सुकतेचा उंदीर जरा जास्तच मनात उड्या मारत होता.


बघता बघता शिवनीबांधच्या तलावावर पोहोचलो. खुपच मोठे तलाव, अतिशय सुंदर निऴसर पाणी आणि तेवढंच निऴसर आकाश. मध्येच कुठेतरी स्वत:च्या विश्वात रमणारे विविध प्रकारचे जलचर, मासे.


एखादा खेड्यातील मुलगा शहरात आल्यावर जसं आजुबाजूला बघत असतो तसं माझं झालं होतं. तिथं पेट्रोल-डिझेलवर चालणारी वाहनं नाहीत. त्यामुळे कोणालाच काही घाई नव्हती. मला पोहणं येत नसल्यामुळे मी एका निवांत जागी नीऴसर पाणी, डोंगर न्याहाऴत बसलो. 


माझ्या सोबतीच्या मित्रांना उत्तम शैलीने पोहता येत असल्यामुऴे ती सर्व पाण्यामध्ये उतरली. आणि विशेष म्हणजे आमच्या साथीला आमच्या गावचे प्रथम नागरिक, भावी सरपंच, सिरेगावरत्न मा. इंजि. हेमकृष्णजी संग्रामे होते. ते म्हणजे जणू पाण्यातील मासोऴीच. त्यांनी, मला "पाण्यात उडी मार" अशी खूण केली. मी किमान पाच वेऴेस सांगितलं की मला पोहता येत नाही. त्यांनी प्रत्येकवेऴी धीर दिला. एकीकडे मनात तर धाकधुक होतीच. मी खूप त्रास सहन केला तर मला पाण्याखालची रमणीय दुनिया दिसणार आहे, हेही माहिती असल्याने अधिकच मनात उत्सुकता होती.


हिंमत करायचं ठरवलं. पाण्यात उतरलो. असं वाटलं की, आपण समुद्राचाच एक भाग आहोत. मी हेलकावे खायला लागलो. घाबरून हात पाण्यावर मारायला लागलो. 'आगे बडो ये रास्ता हमारा इंतजार कर रहा है...' असे विचार मनावर बिनऊन ऊर्जा तयार करत राहिलो. पण संकट हे नेहमी सुंदर रुप घेउनच येत. कधी कधी आपण करत असलेल्या इतक्या कठीण परिश्रमाचे फळ खूप मोठं असेल असे आपल्याला वाटते पण तसं होत नाही, म्हणजे जोरात धाप लागली. नाका-तोंडात पाणी गेलं. एक-दोन वेऴी उलटापालटा झालो. डोऴ्यांना पण कोणतेही स्नोर्कलिंग गॉगल लावलेलं नव्हतं. खाली बघितलं, चक्कर आल्यासारखं झालं. वाटलं सगळं संपलं. लगेच वर बघितलं मी काठाच्या दूर होतो. संकटाचे आभार दोन हातांनी पेलत, जोरजोरात पाय मारत काठाच्या जवळ पोहोचलो आणि काठ पकडला. काठाच्या खालच्या बाजूला अनेक लहान मोठे दगडमाती, शंख, शिंपले चिटकलेले होते. चढण्याच्या प्रयत्नात पाय त्यावर आदऴत होते. परंतु, सोबत हवा भरलेलं ट्यूब होतं. त्याच्या साहाय्याने थोडं वर चढायचा प्रयत्न केला आणि हात निसटला. परत पाण्यात पडलो. सोबती माझ्याकडे बघत होते. म्हणत होते, "घाबरू नकोस, काहीही होत नाही."


खचलो, थकलो, हरलो या सगळ्या भावना जाणवायला सुरुवात झाली. पण तोपर्यंत सगळ्यांशी झुंजत मला पण हळूहळू ती पाण्याखालची दुनिया दिसू लागली. मग वाटलं आपण सेफ होतो, एवढं घाबरायची गरज नव्हती. यशाचा मार्ग जरूर अवघड असेल पण अशक्य मात्र मुळीच नाही.

 

नंतर पोहायचं थांबावं असं वाटत होतं, पण पुन्हा मला सुरेश भटांच्या कवितेची आठवण झाली ती ही की, "रोखावयास वाट माझी वादळे झालीत आतुर, डोळ्यात गेली जरी धुळ, थांबण्यास मी उसंत नाही, येतील वादळे, खेटेल तुफान तरी चालतो वाट माझी, कारण अडथळ्यां भिऊन वळणे पावलास माझ्या पसंत नाही..."


मग आणखी जोमाने तलावाच्या आत पोहायला लागलो. या वाटेवर चालत असताना असंख्य संकटांना तोंड द्यावे लागले. या प्रयत्नात अगणित अनुभव आले. अनेकांकडून कौतुक, अभिनंदन, काहींकडून काळजी वेक्त होत होती. 'भविष्यात स्वप्न वेगळं आहे...'


जगतानाही आपलं असंच होतं. वार्षिक परीक्षेची मार्कशीट पाहून, मेडिकल टेस्टचे रिपोर्ट बघून, घरात भांडण झाल्यानंतर, नापास झाल्यावर, नोकरी अचानक गेल्यावर किंवा लहानमोठ्या संकटात अनेकदा आपल्याला पॅनिक अटॅक होतो. मुऴात असतो आपण सुरक्षित, पण आपण मनातच धोका आहे असं म्हणत घाबरतो आणि अवतीभोवती पाहत नाही.


सगऴं संपलं असा समज आपणच करुन घेतो आपल्यालाच घाबरवतो. थोडंसं शांत राहिलं तर सुंदर जग नक्कीच बघायला मिळेल. पाण्यात उडी मात्र मारलीच पाहीजे...


हृदयाची शक्ती आणि मनाचा संकल्प जेव्हा एखाद्या कामाला लागतात. तेव्हा ते कार्य उत्तम रीतीने संपन्न होते. जीवनात बदल करण्याची क्षमता संकल्प शक्तिमध्ये आहे. आपण आयुष्यामध्ये किती वेगाने धावलो यापेक्षा अधिक महत्वाचे आहे की, आपण किती अडथळे पार केले. दुःख असूनही दाखवायचे नसते. पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत आणखी हसायचे असते...


आपल्यातल्या क्षमता व कौशल्य ओऴखून मार्ग निवडला तर नक्की स्वप्नं साकारता येतात, हे मी माझ्या अनुभवावरुन नक्कीच सांगू शकतो....

'Try ever...wait never.'


Rate this content
Log in

More marathi story from Kuldipak Pustode

Similar marathi story from Inspirational