swapna borse

Inspirational

3  

swapna borse

Inspirational

मी शेतकरी बोलतोय

मी शेतकरी बोलतोय

2 mins
149


आज अचानक बोलता बोलता कवीवर्य विठ्ठल भिकाजी वाघ यांची कविता डोळ्यांसमोर आली.

    काया मातीत मातीत तिफन चालते.....

     थोड्या शेताच्या कामातून वेळ मिळाला म्हणून आज लिहावसं वाटलं आज मनोगत व्यक्त करताना खूप आनंदही होतो आहे.

    कुणी मला बळीराजा म्हणतं तर कुणी जगाचा पोशिंदा तर कुणी मला अन्नदाता ,परंतू एकीकडे पावसाचा लहरीपणा म्हणा किंवा सर्वच डिजिटल झाल्यामुळे म्हणा लोकांनी वारसेप्रमाणे चालत आलेल्या परांपरागत शेतजमिनी विकायला सुरुवात केली अन् हळूहळू गावांची चित्र कायापालट होवू लागली गावांचे रुप आता पहिल्यासारखे राहिले ‌नाही लोकं ही शहरीवस्त्याकडे पळायला लागली.

    वैशाखाचा वणवा कधी संपेन असे होवून जाते त्याग कडाक्याच्या उन्हात माझ्या सर्ज्या राजाला बसत असलेल्या चटक्यांची वेदनेची ठेच माझ्या काळजाला भिडते,मी अनवाणी पायानी वाट तुडवत असतो आकाशाकडे मात्र आशेने डोळे टिपत बसतो .

    मध्येच कुठेतरी अचानक नभ ढोल वाजवू लागतात सौदामिनी कडाकडायला लागते असे दृश्य दिसताच माझा आनंद काही मावत नाही,पावसाच्या पहिल्या सरीतच आमच्या कामांची लगभग सुरु होते मग त्यात एका वेळच्या न्यारीची आठवण ही राहत नाही, म्हणुन मला म्हणावसं वाटतं......

    " *काही जरी झालं तरी शेतकरी ही आमची जात आहे*"

   शेतात सकाळी सकाळी बघावं पिकांनी जणू हिरवी शालचं पाघंरली असते ज्यावेळेला वाऱ्याच्या मंदझुळकीने शिवारतलं पिक ही डोलायला लागतात तेव्हा आम्हां बाधवांचा आनंद गगनाला भिडतो परंतू असे कायमस्वरुपी असेच वातावरण राहत नाही ,कधी अवकाळी पाऊस.....अतिवृष्टी, तर कधी ओला सुका दुष्काळ...... नि कधी सोसाट्याचा वारा वादळ असतो मग शांत मनाला अशांत करणारे प्रश्न पडतात ,*निसर्गराजा* जणू काही रुसला नसेल ना ? अडाणी अशिक्षित असल्यामुळे मी पिकवलेला माल ‌लांब घेवून जात नाही त्यामुळे याचाच फायदा आडतदार आणि व्यापारी लोक उचलतात लूट भावात माल घेवून जातात आणि तिकडे दुप्पट पैसे कमवतात त्यांची बायका पोर्न खूप खुश असतात ,पण *माझी मुलं दारात उभी राहूनी संध्याकाळ पर्यंत वाट बघत असतात,परंतू बापाची थैली ही रिकामीचं सदा त्या केविलवाण्या चेहऱ्याकडे बघवत नाही*

  " कधी वाटलं असेल ना साहेब

   वावरात येवून बघा आमच्या

   घामापेक्षा डोळ्यात अश्रुच जास्त"

   असह्य आणि कर्जबारी झालेला शेतकरी आत्महत्येस बळी पडतो ,पण ते पाप आमच्याच डोक्यावर येतं ,संपूर्ण कुटुंब हबंरडा जेव्हा फोडतो त्यावेळेला वेदनेचा पूर वाहतो....

     आम्हा शेतकऱ्यांकडून २० रुपयांची भाजी ५ रुपायला मागतात तेव्हा तुम्हांला लाज वाटत नाही ,मग एखाद्या ५ स्टार हाॅटेलमध्ये जावून पिज्जा खावून झाल्या२० रुपयांचं जेव्हा बिल ‌निघतं त्यावेळा भाव ठरवतात का? पण दारूच्या बाटलीसाठी तुम्हि रांगेत उभे राहुन कोर्या करकरीत नोटा बाहेर काढतात .मृहणे मटण आणि माझ्यासाठी तुमचा जीव झुरतो आणि शेतकरी राजाने पिकलेला भाजीपाल्याला खालीवर पाहता .जेव्हा फाईव्ह स्टार हाटेलमध्ये पिज्जा बरगर आर्डर करतात तेव्हा खावून झाल्यावर १००रुपयाचं बिल जेव्हा निघतं त्यावेळेला तुम्ही भाव ठरवता का?

मग अख्या जगाचा पोशिंदा तुम्ही म्हणातात, आणि त्यानेच उपासमारीनेचं मरावं का? म्हणून च माझे बांधव दिल्लीच्या भर रस्त्यावर जावून आंदोलन करतात....

    ज्या देशाच्या रक्षणासाठी आम्हां शेतकऱ्यांचा मुलगा सिमेवर आहे मग आम्हां मायबापांना आमचे हक्क नकोत का.... निधड्या छातीवर अजुनही त्याचचं पोरगं गोळ्या झेलतोय अशा शुरवीर मायबापांच्या सहाशी मुलांना सलाम....

    जय जवान जय किसान 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational