महालक्ष्मीचे वाण
महालक्ष्मीचे वाण
महालक्ष्मी प्रत्येकाच्या घरी आनंदाची उधाण. लेकींच माहेरपण जपणारा उत्सव. आज सप्तमी पैपाऊणचाराचा दिवस त्यांचा....
सगळा गोतावळा जमलेला.त्यात घरी अनघा लहानपणापासून येणारी शेजारच्या काकूंची मुलगी यावेळीही आलेली.लग्नानंतर चार पाच वर्षातच एक मुल पदरात देऊन देवाने तिला कशी एकटं पाडलेली.तिला बघितल की मनात चर्रर्र व्हायचं. तरूण लावण्यवती,देखणी, सात्विक, सोज्वळ अनघा जणू महालक्ष्मीच्या रूपात दरवर्षी यायची अडीच दिवसाच्या माहेराला .
यंदा महालक्ष्मीच्या साड्यां नेसवायला स्वप्नालीताईंनी आधीच सांगितलेल.तश्या त्या स्वयपाक करायलाही आल्या होत्या यंदा.आमच्या घरी तस स्वयपाक फक्त घरच्याच बायांनी करावा अशी अट माझ लग्न झाल्यापासून तरी मी बघितली नव्हती. सासूबाई गावातल्या वातावरणात राहिलेल्या असूनही याबाबत फार सुशिक्षित आहेत अस वाटायचं नेहमीच.स्वप्नाली ताईंनी येऊन लगेच सगळ्यांसोबत फळ करायला घेतली.बाजूला अनघा बसलेली.
अनघा दिसताच त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले.लगेच झटक्यात त्या उठल्या आणि मला म्हणाल्या ताई जरा इकडे येता का? मागच्या अंगणात त्यांनी मला नेलं आणि त्या म्हंटल्या ,ताई हे बर नाही दिसत हो... मी म्हटलं काय ते ?...तस त्या म्हंटल्या,,, अनघा.....मी मी म्हणते समजत नाही काहो तिला...... महालक्ष्म्यांना चालत का तिच्या ह
ातचं... नाही समजत पोरींना .पण आईनं नाही का सांगावं समजाऊन ...
आता मात्र मला खूप वाईट वाटलं. वाटलं पीएच.डी.केलेली ही बाई किती खुज्या मनाची .....काय कामाच हिच शिक्षण....अरेरेsss मनातल्या मनात मी पुटपुटले.
अनघाच्या ते लक्षात आल तशी ती उठली व बाजूला जाऊन बसली....मी सासूबाईंना सांगितलं...त्या म्हणाल्या थांब मी बघते...
त्यांनी लगेच सगळ्यांसमोर बोलवल व मला मोठ्या आवाजात सांगितल यंदा सवाष्णीच्या पानासाठी म्हणून अनघाला बसायचं गं. तिच लग्न जुळलंय बघ......मागल्या वर्षी मी महालक्ष्म्यांना सांगितलं होतं माझ्या ह्या लेकीची मनापासून तुझ्यावर श्रद्धा आहे. पुढल्या वर्षी तिला उजळू दे... आणि.... बघ माझ ऐकल गं त्यांनी.....
सासूबाईंच हे बोलणं ऐकून स्वप्नालीताई बघतच राहिल्या आश्चर्याने माझ्याकडे.....मीही म्हटलं आमच्या घरची लेक अनघा. तिचा माहेराचा हक्क कशी देईल मी कुणाला? आता मात्र स्वप्नालीताईचा चेहरा कोरामोरा झालेला. त्या बाहेर आल्या आणि म्हणाल्या.....ताई तुमच्या सासूबाई खरंच की हो सुशिक्षित....
मी लगेच म्हंटल मग.....समाजशास्त्रात पीएच.डी केलयं ना त्यांनी कधीचच त्यांच्या गावातल्या शाळेत.....