Dhanraj Duryodhan

Inspirational

3  

Dhanraj Duryodhan

Inspirational

मानवता हाच खरा धर्म

मानवता हाच खरा धर्म

9 mins
1.4K


इंजिनिअरींग काॅलेजला शिकत असताना पल्लवी एका मुलाच्या प्रेमात पडली. विवेक तिच्या काॅलेजमध्ये शिकतही नव्हता. पण त्या येण्या-जाण्याच्या रस्त्यावर असलेल्या एका हाॅटेलमध्ये नाश्ता करताना तिची एका प्राध्यापकाशी ओळख झाली. हळूहळू भेटणं वाढत गेलं. मोबाईलमुळे सतत एसएमएस पाठविणे, सतत एकमेकांशी गप्पा मारणे, त्यातून संपर्क वाढत गेला. अत्यंत उत्तम दर्जाचं जगणं असलेल्या या मुलीला या घरातून सगळेच प्रेम करत होते. तीन पिढ्यामध्ये झालेली ही एकुलती एक मुलगी तीसुद्धा त्या प्रेमाला पात्र होती. शेवटी विवेक व पल्लवी या दोघांचं लग्न झालं. विवेकचे बाबा आधीच पंचतत्वात विलीन झाले होते. लग्नानंतर सहा महिन्यानी विवेकच्या आईला हृदय विकाराचा पहिला झटका आला व त्यात ती मरण पावली. विवेक व पल्लवी दोघेही सरकारी नोकरीत असल्याने पैशाला काही कमी नव्हते. त्यातच पल्लवीला दिवस गेले. काही दिवसाने पल्लवीचे दिवस भरत आले होते. त्यानंतर ती बाळंतीण झाली. मुलगा झाला. तो दिसायला गोंडस, बोलायला चुणचुणीत होता. त्याचे नाव राजू ठेवण्यात आले.


घरात राजुच्या रुपानं नवचैतन्य नांदत होतं. लहानपणापासूनच पहिला मुलगा म्हणून दोघांनी फार लाड केले. त्याला पाहिजे त्या सुविधा व वस्तू देण्यात आल्या.


आई-वडीलांनी त्याला शाळेत घातले. राजू आता शाळेत जाऊ लागला. राजू स्वभावाने अतिशय चांगला असल्याने त्याचे मित्र खूप झाले. तो चांगल्या गुणांनी पासही होत होता. तो सातवीत गेला होता. आता त्याची सातवीची परीक्षा सुरु होती. याच कालावधीत चीनमधून भारतात कोरोनाचा प्रसार व्हायला सुरुवात झाली. शासनाच्या आदेशाने परीक्षा रद्द करण्यात आल्या. शिक्षकांनी मागच्या परीक्षेच्या आधारे गुण दिले व मुलांना पुढच्या वर्गात बढती देण्यात आली. राजू आता आठवीत गेला होता.


लाॅकडाऊनमुळे दोन महिने उलटले. राजूचे मित्रांसोबत फिरणे, तासनतास गप्पा मारणे, मोबाईलवर नुसते गेम खेळणे सुरु होते. राजू काही हातात पुस्तक घेत नव्हता.


असेच एक दिवस राजू व त्याचे मित्र खेळायला गेले. अचानक जोराचा पाऊस सुरु झाला. मुलांना खूप आनंद झाला. सगळे उड्या मारत भिजू लागले. पावसाचा जोर खूपच वाढला. पावसाच्या पाण्याबरोबर गारांचा माराही सुरु झाला. मुलांना गारांचा मार सहन होईना. विजाही कडाडत होत्या. मग सगळे धावत जवळच्या देवळात शिरले. बघता बघता सगळीकडे गारांचा खच पडू लागला. वाराही चांगलाच वाढला. बऱ्याच वेळानंतर पाऊस एकदाचा थांबला. मुलं भिजून गारठून घरी आली. पावसामुळे खूप पाणी साठलं होतं. बऱ्याच घराचे पत्रे उडून गेले होते, तर काही घरे पडली होती. राजू धावत आपल्या घराकडे पळाला आणि एकदम थबकलाच. त्याचे आई-बाबा घराच्या दारात उभे होते. राजूला बघताच आई-बाबा धावत पुढं आले. त्याला जवळ घेऊन आई रडूच लागली, "अरे राजू किती काळजी वाटत होती आम्हाला तुझी. उद्यापासुन अजिबात मित्रासोबत फिरायला जायचं नाही."


"इकडचे-तिकडचे मित्र एकत्र आल्यास कोरोनाचा संसर्ग घरात घेऊन येशील व त्यामुळे मृत्युही होऊ शकतो," असे बाबा सांगू लागले.  पण राजू काही तरी निमित्त काढून मित्रांसोबत जायचा. मित्रांच्या सहवासात आल्याने राजू घरात कोरोना घेऊन येईल अशी भीती त्याच्या आई-वडीलाना वाटत होती. त्यामुळे घरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या भीतीवर मात करण्याचा उपाय विवेकनी शोधुन काढला.


विवेकच्या मनात आले. राजूचा ऑनलाइन अभ्यास घ्यायचा, तेव्हा विवेक म्हणाला, "जर तू एक महिना कोणत्याही मित्रासोबत फिरायला न जाता घरीच राहून मोबाईल मधील शैक्षणिक ऍप व लिंक बघून अभ्यास केला तर लाॅकडाऊनच्या काळात तुझा वाढदिवस साध्या पद्धतीने करुन तुला पाच हजार रुपये बक्षिस देईन."


राजू विचार करु लागतो की आपल्याला हे जमेल का? पण मित्रांसोबत न फिरता घरी राहून मोबाईलमधील शैक्षणिक ऍप बघून अभ्यास केल्यास वाढदिवसाला पाच हजार रुपये मिळेल. त्या पैशाने मला खूप साऱ्या वस्तू घेता येईल, मजा येईल असे त्याला वाटू लागले व ही अट तो मान्य करतो.


राजू घरातील इतर कामात मदत करु लागला. पाककला, शोभेच्या वस्तू बनवू लागला. आसपासच्या परिसरात वृक्षारोपण करुन वृक्षसंवर्धन करु लागला. संगीतात त्याची रुची निर्माण झाली. फावल्या वेळात चित्रे काढू लागला. शिवणकाम, संगणक शिक्षण, नृत्य इत्यादी अनेक कला अवगत करु लागला. राजू घरबसल्या आपल्या पालकांच्या मदतीने ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून मोबाईलचा उपयोग करून शिक्षण उत्तमरित्या घेत होता. खऱ्या अर्थाने सहशिक्षणाची अनौपचारिक शिक्षणाची संकल्पना राजूमध्ये यशस्वी होताना दिसत होती.


भाषा विषयाशी निगडित कथाकथन, गोष्टी वाचन, लेखन, बौद्धिक खेळ, वाक्प्रचार पालकांच्या मदतीने राजू करून घेत होता. गणिताशी संबंधित संख्याज्ञान व त्यावरील क्रिया, भौमितिक आकृत्या, मापन इत्यादी अनेक घटकांवर आधारित अभ्यासक्रम राजू करत होता. रांगोळी, कातरकाम, चिकटकाम, शिल्पकाम असे अनेक उपक्रम पालकांच्या मदतीने राजू करत होता. म्हणजे खऱ्या अर्थाने राजू शिक्षण ऑनलाइन स्वरूपात घेत होता.


विवेकनी शिक्षकांसोबत भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करुन आपल्या व्हाॅटसऍपवर काही शैक्षणिक ऍप पाठवून मदत करण्यास सांगितले. दररोज विवेक राजूकडून अभ्यास करवून घेत असे. कारण कोरोनाच्या काळात लाॅकडाऊनमुळे विवेक व त्याची पत्नी पल्लवी घरीच होते. राजूची आईसुद्धा विवेकला हवे तिथे मार्गदर्शन करायची.


विवेकने घरी असलेल्या मुलाला अधिकचा वेळ दिल्याने मुलासोबतचे नाते घट्ट झाले. मुलाला आपल्यापेक्षा मोठे करणे ही कला विवेकला अवगत होती. मुले ही मालमत्ता आहे. ती नियतीने आपल्याकडे सुपुर्द केलेली गुणवत्तेची ठेव आहे. या भावनेने तो राजूला पाहत होता. विद्या ही राजूच्या मनात भिनावी असे त्याला वाटे.


असे काही दिवस चालले. पण राजूला मित्रांसोबत फिरावे, गप्पा माराव्या असे वाटू लागले. अशा प्रकारच्या विचाराची आंदोलने आणि लहरी त्याच्या मनात येत होती. माघार घ्यावी असे त्याला वाटू लागले. पण एक महिना घरीच बसून अभ्यास केल्यास वाढदिवशी बाबा आपल्याला पाच हजार रूपये देणार असेही वाटू लागले.


शिक्षकांनी पाठविलेल्या व बाबांनी सांगितलेल्या प्रत्येक कृतीमध्ये राजू सहभाग घेऊन (online self test) चाचण्या सोडवू लागला. यात राजूला आनंद वाटू लागला. आता राजूला रोजचा ऑनलाइन अभ्यास करण्याची सवय झाली होती. त्यानंतर शिक्षकानी मोबाईलमध्ये पाठविलेल्या व्हाॅटसऍपच्या माध्यमातून पाढे, गणित, प्रश्नपेढ्या, विज्ञान कोडी, सामान्यज्ञान आणि इंग्रजी संभाषणासाठी असे उपयुक्त ऍप्स बघून राजू ज्ञान मिळवू लागला. त्याचे ज्ञान वाढू लागले. राजूचे बाबा विवेकसुद्धा त्याला प्रोत्साहन देत होता. राजू ऑनलाइन शिक्षण घेत असताना दुरचित्रवाणीवर दिसणाऱ्या कार्टूनचे त्याला आकर्षणही वाटत नव्हते. तो विविध लिंकच्या माध्यमातून मोबाईलचा उपयोग करून शिक्षण उत्तमरित्या घेत होता. ज्ञानप्राप्तीसाठी दशादिशाचा धांडोळा घेतला. त्याच्या बुद्धीला प्रगल्भता प्राप्त झाली होती. यशायोग्य बदलासाठी राजूनी अभ्यासाची मानसिकता निर्माण केली.


आता बाबानी राजूला सांगितलेल्या अटीच्या महिन्याचे दिवस येत होते. राजूचा वाढदिवस जवळ आला होता. राजूचा प्रत्येक वाढदिवस मोठ्या थाटामाटात व्हायचा. भरपूर खेळणी, खाऊ मिळायचे याचा त्याला आनंद वाटायचा. पण या लाॅकडाऊनच्या काळात त्याचे आई-बाबा फक्त केक आणणार होते व त्याला ऑनलाइन अभ्यास घरीच राहून केल्याने बक्षिस म्हणून पाच हजार रुपये मिळणार होते.


एक दिवस तो विचार करु लागला.आपल्या आई-बाबांची परिस्थिती चांगली आहे. म्हणून तर सर्व गोष्टी हव्या तेव्हा मिळतात. परंतु, माझ्या वर्गातील काही गरीब मुलांना कितीही मागून मिळत नाही. अनेकांजवळ वह्या,पेन, पुस्तके, कंपास, शिसपेन्सील, खोडरबर, शार्पनर अशा साध्या गरजेच्या वस्तूही मिळत नव्हत्या. मित्रांकडून रोज घेऊन मुले आपली गरज भागवायची. अशा अडचणी राजूने अगदी जवळून पाहिल्या होत्या. ही गरीब घरची मुले कसे तरी गुजराण करीत असतात. शिवाय माझ्या प्रत्येक वाढदिवसाला किती तरी खर्च होतो. जेवण, डेकोरेशन, केक यासाठी नऊ-दहा हजार रुपये खर्च होतात. मात्र माझ्याच वर्गातील मित्राना शिक्षणासाठी गरजेच्या वस्तूही मिळत नाही. तो आठवीला असल्याने विचार करू लागला. घरीच टि.व्ही.वर त्याने बातमी वाचली. एका दानशूर माणसाने वाढदिवसाचा खर्च टाळून त्या रक्कमेतून अनाथ व गोरगरीब मुलांना मदत केली.तेव्हा राजूने विचार केला की, लाॅकडाऊनमुळे माझे बाबा फक्त घरी केक आणणार आहे. मला पाच हजार रूपये देणार आहे.ती रक्कम माझ्या गरीब मित्र रमेशला द्यायची असै राजूने ठरवले.


राजूचा वाढदिवसाचा दिवस उजाडला. त्या दिवशी विवेकलाही वाटू लागले की, आपल्याला राजूची अट पूर्ण करायची आहे. विवेकही राजूचा अभ्यास बघून खुष होता.राजूचा वाढदिवस घरीच साध्या पद्धतीने केक कापुन केला व राजूच्या हातात पाच हजार रूपयाचा बंडल दिला. तेव्हा राजूने तो पाच हजार रुपयाचा बंडल बाबाच्या हातात परत ठेवत म्हणाला,"मला या महिण्यात जे काही मिळालं त्याची किमंत किंवा मोल पैशाने किंवा वस्तुच्या रुपाने सुद्धा मोजता येणार नाही.लाॅकडाऊनच्या काळात मी घरात राहुन ऑनलाइन शिक्षण पद्धतीने ज्ञान मिळवू शकलो. हा माझा जीवनाचा सर्वात मोठा आनंद आहे.याच पैशातून माझ्या एका गरीब मित्र रमेशला मदत करू.तो गरीब असल्याने मोबाईल घेवू शकत नाही. त्यामुळे तो शिक्षणापासुन वंचित राहिल.


राजू म्हणाला, "शिक्षण हा प्रत्येक मूलाचा जन्मसिद्ध हक्क आहे.शिक्षण नसेल तर त्याचे जीवन व्यर्थ ठरेल. आपण पैशाच्या रुपाने मदत केली .याच पैशातून त्याने मोबाईल घेतला तर त्याचे जीवन लाभदायक व आनंददायक होईल. हा आनंद कोठेही मिळत नाही.तो मनाकडून मनाला मिळालेला प्रसाद असतो.त्याला हे गरजेचे आहे.त्याला हे दिले तर एक समाधान लाभेल.मला आनंद वाटेल.पैशाचा योग्यरीत्या वापर करावा."हे सर्व राजू आईबाबाला सांगत होता.वाढदिवसाच्या दिवशी राजूने आपला मनोदय अशा प्रकारे बोलून दाखवला."अरे, व्वा ! किती छान ! राजू तूला हे कस सुचल?" आई म्हणाली. "मुलगा असावा तर असा "असे बाबा म्हणाले व त्याला कवटाळले.त्यांनी राजूच्या पाठीवरून हात फिरवला ते त्याला म्हणाले,"शाब्बास! राजू ,तुझा निर्णय अगदी योग्य आहे."तेव्हा राजू मनोमन सुखावला.विवेकला राजूचे भावबंध व भावनिक संबंध हेच खरे सामर्थ्य आहे असे त्याला वाटू लागले.त्याला राजूची विद्याकला ,कर्तव्य गूणवत्ता व अंतरीचे दिव्यत्व याचे विराट प्रदर्शन घडले.माणूसकी या नावाचे द्रव्य राजूच्या पिंडात नियतीने भरपूर भरून ठेवले हे विवेकच्या लक्षात आले.त्याच्या डोळ्यात पाणी तरारले.


दुस-या दिवशी राजू व राजूचे बाबा राजूच्या मित्राच्या घरी गेले.त्याचे नाव रमेश होते.तो राजूच्या वर्गात शिकत होता.तो स्वभावाने अंत्यत साधा आणि संमजस होता.आपली आई बाहेर खूप काम करते म्हणून तो घरी सगळ्या कामात मदत करत असे.तो सकाळी उठून घरोघरी दैनिक वृत्तपत्र टाकण्याचे काम करीत होता.पण कोरोनामुळे कुणी वर्तमानपत्र घेईना .तसा रमेश ही अभ्यासात खूप हुशार होता.त्याला चित्रकलेची फार आवड होती.रमेशच्या घरी फक्त आईच होती.आई धुण्याभांड्याची काम करून आपले व मुलाचे तोट भरायची.पण कोरोनामुळे तिचेही काम बंदच होते.तिला कूणीच धूणी व भांडी घासायला ठेवत नव्हते.घरची स्थिती बेताचीच होती.राजू रमेशला शाळेत प्रत्येक कामात सहकार्य करत होता.त्याचा वर्गातील इतर मित्रालाही सहकार्याचा हात पुढे असायचा.लाॅकडाऊनच्या काळात राज्यस्तरीय ऑनलाइन चित्रकला स्पर्धेत रमेशला भाग घ्यायचा होता.परंतू त्याच्याकडे त्यासाठी प्रवेश फी साठी शंभर रुपये नव्हते हे राजूला दुस-या मित्राकडून माहित झाले .प्रवेश फी ऑनलाइन भरण्याचा शेवटचा दिवस होता.या स्पर्धेचे बक्षिस अकरा हजार रूपये होते.राजू रमेशला म्हणाला,"या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत तू भाग घे,त्याची प्रवेश फी माझे बाबा आज गुगल पे किंवा पे फोन द्वारे भरतील व तू छान चित्र काढून आॅनलाइन द्वारे पाठवशील."राजू रमेशच्या हातात पाच हजार रूपये देत मोबाईल घेवून ऑनलाइन अभ्यास करशील असे सांगीतले."या ऑनलाइन अभ्यासाचे महत्व मला कळले आहे,"असे राजू सांगू लागला.राजूचा मित्र खालच्या जातीचा असला तरी बूद्धीने मात्र तल्लख होता.तो वर्गात नेहमी पहिला क्रंमाक मिळवायचा.राजूचा एवढा मोठा त्याग बघून त्याचेही डोळे पाणावले.राजूच्या मित्राने ते पैसे नाकारले पण राजूने त्याला सांगीतले."तू चांगला शिकुन मोठा झाल्यावर पैसे कमवशील तेव्हा पैसे परत करशील." तेव्हा राजूने ते पैसे राजूच्या मित्राने स्विकारले.त्या दोघाच्या पुढे नतमस्तक व्हावे झुकावे असे देवमाणसं रमेशला वाटत होते.लोक देव दगड धोंड्यात,मूर्तीत,मंदिरात,तिर्थक्षेत्री शोधतात परंतू रमेशला देव तेथे राजू व विवेकच्या रुपात दिसत होता.


राजू व विवेकमध्ये असलेला मानवता,माणूसकी हे देखील देवाचचं रुप असल्याचा साक्षात्कार रमेशला झाला.रमेशने राजूचे व त्याच्या बाबाचे मनोमन आभार मानले.रमेशनी राजूची गळाभेट घेऊन मिठी मारुन जुन्या स्नेहबंधाचा जागर केला.तो विवेकच्या पाया पडला.विवेकनी त्याला आशीर्वाद दिले व उज्वल भविष्याच्या शूभेच्छा दिल्या.


राजूच्या बाबानी रमेशची राज्यस्तरीय ऑनलाइन चित्रकला स्पर्धाची प्रवेश फी भरली.रमेशने आपल्या कला कौशल्य व कूशलतेने खूप छान चित्र काढले.ते चित्र राजूच्या मदतीने ऑनलाइनद्वारे पाठविण्यात आले.काही दिवसानी निकाल जाहिर झाला.रमेशच्या चित्राला पहिला क्रंमाक प्राप्त झाला.रमेशला अकरा हजार रुपयाचे पहिले बक्षिस देण्यात आले.रमेशला खूप आनंद झाला.रमेशनी राजूची भेट घेतली.राजूला हे समजल्यावर त्याला आपल्या मित्राचा खूप अभिमान वाटला.राजूच्या आई बाबानी रमेशची पाठ थोपटली.राजू व रमेश एकमेकाला सहाय्य करून ऑनलाइन अभ्यास करू लागले.मिळालेल्या बक्षिसातून रमेशनी राजूला पाच हजार रूपये परत दिले.राजू व रमेश यांची गाढ मैत्री पाहुन सर्वच लोक कौतूक करु लागले. रमेशला हे घवघवीत यश मिळाल्यानै आता अभ्यास करून खूप मोठे अधिकारी बनायचे असे त्यानी ठरवले.


जगण्याची केवळ भराभर साधने जमविण्यात नसून,प्रत्यक्ष साधेपणाने, नात्यागोत्याच्या, स्नेहबंधाने, आपुलकीने, माणुसकीने जीवन जगणे, एकमेकांना समजून घेणे, सहकार्य करणे हे सगळे धडे महिनााभरात आपल्या मुलाने दिल्याचा गर्व विवेकला झाला. जातपात,धर्मश्रेष्ठ,कनिष्ठ अशा अहंभावाचे खोटे मूखवटे कोरोनाने फाडून फेकले. अखिल मानवजातीला गडबडून जागे केले.आपण जे जगतो ते खरे जीवन नव्हे याची जाणीव करून दिली.मानवतावादी समाज निर्माण व्हावा व जीवनाचा आनंद सर्वांना घेता यावा हा धडा आपल्या मुलामूळे विवेकला शिकायला मिळाला.


तात्पर्य : लाॅकडाऊनच्या काळात चालू असलेली ऑनलाइन शिक्षणपद्धती आवश्यक आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे सहज मानवणारी शिक्षणव्यवस्था निर्माण करता येते. त्यामुळे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाणार नाही.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational