मानवी शरीर एक चमत्कार
मानवी शरीर एक चमत्कार
विश्वाच्या गतिमान प्रक्रियेत कुठल्यातरी ताऱ्यापासून अलग झालेल्या पृथ्वीवर जीवसृष्टी धारण करण्यास योग्य असे वातावरण निर्माण झाले. प्राणवायू,कार्बन,पाने,उष्णता आणि इतर न कळलेल्या घटकांच्या संतुलनातून जीवपेशी निर्माण झाली. प्रगत अवस्थेत जाताना साधे पण बहुपेशीय जीव निर्माण झाले. काळाच्या कसोटीला उतरलेले हे जीव गरजेप्रमाणे उत्क्रांत होत गेले. सर्वायव्हल ऑफ फिटेस्ट या तत्वाचे पालन करीत व जरूर तेथे निसर्गाशी जुळवून घेत मानव तयार झाला.
विशेष म्हणजे तो दोन पायावर चालू लागला. मेंदू प्रगत झाला. शक्तीची गरज बुद्धी ने भरून काढली. कल्याशिवाय पाण्याखाली आणि पंखांशिवाय हवेत थांबता येऊ लागले. चाकाच्या शोधामुळे हरणाची गती मिळाली. कॉम्पुटरमुळे कार्यशक्ती आणि अचूकता वाढली.
उत्सुकता आणि कार्यकारणमीमांसा यामुळे विज्ञान प्रगत होत गेले. यातच मानवी शरीराचे पण संशोधन झाले. तरीही मंत्रमुग्ध करणारे अनेक चमत्कार अजून अनुत्तरीतच आहेत. कातडीची जखम भरून निघते पण लिव्हर,मेंदू ला ही फॅसिलिटी नाही. पचन संस्था अन्नाबरोबर विष ही तितक्याच तत्परतेने पचवते.
माणसाच्या पेशींची ठेवणं सारखीच असते.असते तरी प्रत्येक माणसात वेगळेपण असते. जीन्स वेगळ्या असतात. बोटांचे ठसे वेगळे असतात. नाके वेगळी असतात. खरंच किती व्हरायटी असते या छोट्या अवयवात. चाफेकळी म्हणून मिरवायला फारच थोड्यांना मुभा असते.
एकाचे कान कापल्याने त्याला दिसेना! चष्मा कसा घालणार! जोक्स अपार्ट,प्रत्येक अवयवात भरपूर रिझर्व्ह शक्ती असते अणे ते आपली कामे अत्यंत कसोशीने करत असतात.
सर्वात जास्त कसब मेंदूचे असते. शरीररुपी कारखान्याचा तो मॅनेजर असतो. त्याचे कम्युनिकेशन परफेक्ट असते. विविध नर्व्हज आणि रक्तघटक यांच्या इंटरकॉम मधून आदेश दिले जातात, त्यांचे पालन झाले की फीडबॅक ही मिळतो त्याला. मध्य मेंदू आणि छोटा मेंदू यांच्या सहकार्याने हाताखालील सर्व संस्थांकडून योजनाबद्ध कार्य करून घेतो तो.
आपल्या शरीराइतकी लोकशाही कुठेही दिसत नाही. शरीरात अगणित पेशी आहेत. प्रत्येक पेशी ही एक स्वतंत्र जीव आहे. तिला अन्न,पाणी,प्राणवायू,क्षार,उत्सर्जन क्रिया इत्यादी रक्ताभिसरणातून तत्परतेने आणि अचूक पुरवल्या जातात. त्यात भेदभाव नसतो. भ्रष्टाचार साठेबाजीची गरज नसते. सर्वांपेशीसमभाव !
एकाच प्रकारच्या कार्यात गुंतलेल्या पेशींच्या समूहाची संस्था बनते. उदा. पचन संस्था,श्वसनसंस्था.
या संस्था मेंदूच्या अधिकारात राहून इतर संस्थांशी संतुलन राखत आपले कार्य करत राहतात. नॅनोटेकनॉलॉजी वापरली जाते. खोलीभरच्या डायलिसिस मशीन चे काम १० से मी च्या २ किडनीज पाण्याचे उत्सर्जन सांभाळीत आयुष्यभर करत राहतात.
हृदयाची तर किमयाच न्यारी. त्याच्या स्पंदनामुळे जीवन आहे. त्याला मनाचा मुजरा करू या. फुफ्फुसाला एवढा सरफेस एरिया एवढ्या छोट्या जागेत मिळवून देण्याचे कसब कमाल आहे.
उत्त्श्वासाची हवा बोलण्यासाठी वापरली जाते. आहे की नाही कमाल! गिरणीच्या भोंग्याची आठवण होते.
आपल्याला छान दिसावे आणि आपण छान दिसावे म्हणून आपली भॊलीभाली आँखे कमाल करतात.
उदारहस्ते हे आणि बरेच काही मिळाले असले तरी काही गोष्टी निसर्गाने राखून ठेवल्यात. उदा. आई वडील, स्त्री की पुरुष, गतजन्म, मृत्यू वेळ,जीवन प्रवास,मृत्यूनंतर काय वगैरे.
या उत्कृष्ट बायोइंजिअरनिंग टेकनॉलॉजी चे आपण स्वागत करू या आणि सांभाळू या.
