माझी माय मराठी
माझी माय मराठी
माझी माय मराठी
व्यापक अलंकारांनी सजलेली
अ ब क ची भाषा तिची
मराठी माणसाला लाभलेली..
सौंदर्य तिचे अफाट
निर्मळ ही मन
नाही तिला भेदभाव
प्रदेशाची राणी महान..
मातृत्व तिचे निःस्वार्थ
केलीत अभंग गोड
पोवाडे कणखर करून
झाली समाजसुधारकांना जोड..
प्रत्येक ओठी संत ओवी
शान आहे आमची मराठी
झाल्या माना ताठ
सांगता अस्तित्व माझे मराठी..
