माझा शेतकरी बाप
माझा शेतकरी बाप
माझा बाप शेतकरी
उभ्या जगाचा पोशिंदा
त्याच्या भाळी लिहिलेला
रात दिस काम धंदा
सर्जा राजाची जोडी र
आहे माझ्या बापाकड
रोज नांगर चालतो
दम नाही त्याच्याकड
घाम शेतात गाळूनी
हाडे उन्हात वाळीतो
भले भेटो ना चांगल
कांदा भाकर गिळीतो
कधि भाव येई माला
सुख मिळेल जीवाला
माझ्या बापाचा कष्टाचे
फळ कधी मिळेल त्याला
सुख कधी तो पाहिलं
माझा शेतकरी बाप
कधी उशीर होईना
नाही वेळ त्याच्याकड
चार वाजता पहाटे
बाप निघे शेताकड
भीती नाही हो कधीच
वाटे साप इंचवाची
पायी जरी ओ नसेल
जोड कातडी वाणाची
पाई रुतला जरी काटा
वाट कधी ना बदली
बाप आहे जणू माझा
जशी उन्हात सावली
राब राब माझ्यासाठी किती शेतात राबतो
स्वतः राहून उपाशी घास मला भरवतो
कधी नाही दिसू दिला
आसू त्याच्या डोळ्यातला
बापाने हो इतका
माझा लाड पुरविला
स्वतः डोळ्यांनी पाहिला बाप रडताना मी
जेव्हा पडलो एकदा गाय चरताना मी
लागलं मला जरी होतं
इजा बापाला झालती
देव नाही वो पाहिला
आहे म्हणे विठेवर
दिसेल माझ्या बापावानी
जरी असेल कुठे तर
आई घरची रुक्मिणी
बाप विठ्ठल हो माझा
चरणी त्यांच्याच होईल
नथ मस्तक हो माथा
या तेजाच्या शब्दात नाही इतकी ताकत
व्याख्या बापाची वो मांडू फक्त एखाद्या ओवित
