STORYMIRROR

Harsha Lohe

Tragedy

3  

Harsha Lohe

Tragedy

!! लग्नाची पूनर्गाठ !!

!! लग्नाची पूनर्गाठ !!

3 mins
385

भाग - १


ही कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे . तसं मी आजपर्यंत कथा कधीच लिहिलेली नाही , पण आज पहिल्यांदा प्रयत्न करते..ही कथा आहे महाराष्ट्रातीलच एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या वैदेही ची.....

       वैदेही अगदी मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आली होती...तालुक्याच्या ठिकाणी त्यांचं घर होत..दोन भाऊ आणि ही एकुलती एक बहिण..एकुलती एक म्हटलं की लगेच आपल्या नजरेसमोर येतात तिचे झालेले म्हणा किंवा होणारे लाड...आणि होतही तसच ती सगळ्यांची खूप लाडकी होती....

       तालुक्याच्याच ठिकाणी तीच शिक्षण पूर्ण झालं...आणि घरात लग्नाची चाहूल लागली..वैदेही खूप गुणी आणि हुशार मुलगी होती...आणि मनानेही तितकीच सोज्वळ समजदार होती..आणि सौंदर्यात पण ती काही मागे नव्हती...

       लग्नासाठी स्थळ येऊ लागली आणि एक स्थळ घरच्यांनी तिच्यासाठी निश्चीत केलं... जसं सगळ्याच आईवडिलांना वाटतं आपली मुलगी आनंदात राहावी तसच तिच्याही आईवडिलांना वाटत होतं...म्हणून त्यांनी स्वतःची थोडीफार शेती विकून हुंडा देऊन वैदेहीच लग्न अगदी थाटामाटात लाऊन दिले...

       कोणतीही मुलगी लग्न झालं की मनात आपल्या संसाराबद्दल ,आपल्या जोडीदारासोबत नकळत नवीन स्वप्न उराशी बाळगून त्या नवीन घरात प्रवेश करत असते...वैदेहीचही अगदी तसच काहीसं झालं...पण या नवीन घरात हिच्या नशिबी काही वेगळच लिहिलं होतं...वैदेही जशी घरात आली ,लग्नाचे सगळे सोपस्कार पार पडले आणि पंधराच दिवसात तिच्या हातात नवऱ्याच्या आजारपणाची फाईल देण्यात आली...आजपासून त्याची औषधांची जबाबदारी तुझी म्हणून सासू सासरे मोकळे झाली...वैदेहीला काहीच कळत नव्हतं नेमकं झालं काय ???आणि कोणाला विचारू तरी काय ??? जशी तिने ती फाईल उघडून बघितली तशीच तिच्या पायाखालची जमीनच सरकली..आणि सगळे स्वप्न अगदी त्याच दिवशी तिने त्याच फाईल मध्ये बंद करून ठेवले.....ती त्या रात्री खूप रडली खूप खचली जिथे नवीन सुरुवातीचं अगदी छोटं स्वप्न उराशी बाळगून आलेली वैदेही पार कोमेजून पडली....

          आईवडील आधीच कर्जाच्या विळख्यात होते..आपली शुद्ध फसवणूक करण्यात आली असही वैदेही त्यांना नाही सांगू शकली. त्यांना सांगून परत दुःखी करणही तिला चांगलं नाही वाटलं...सासरच्यांना जाब विचारला तर त्यांनी सांगितलं की लग्न झाल्यावर बरा होईल म्हणून आम्ही लग्न करून दिलं... अरे दुसऱ्यांची मुलगी म्हणजे काय तुमच्या विकृत , व्यसनी मुलगा सुधरवण्याची मशीन वाटते का??? का असा खेळ करायचा तिच्या आयुष्याचा ??? आहे का आपल्या दुबळ्या समाजाजवळ या मानसिकतेचं उत्तर..????

          शेवटी तिने स्वतःच हिम्मत बांधली आणि आयुष्याचा गाडा पुढे न्यायचा ठरवलं...त्यामधे तिला कोणाचाच आधार नव्हता..दिवसेंदिवस नवऱ्याचा आजार वाढतच होता. ती स्वतःचे दागिने विकून नवऱ्याला दवाखान्यात न्यायची इकडे घरात खाण्याची सोय नाही....रात्र रात्रभर बिचारी वैदेही नवऱ्याजवळ बसून राहायची .. तशातच तिला दिवस गेले आणि तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला....

         इकडे माहेरी आईची प्रकृती बिघडली आणि काही दिवसातच वैदेहीची आई हे जग सोडून गेली...आधीच दुःखी असलेली वैदेही आईचं दुःखही मनातच पचऊन गेली...फक्त तिच्या बाबांसाठी...पण नियती तेव्हढ्यावरच थांबली नाही , तर आईच्या पाठोपाठ बाबांच्याही प्रेमाला पोरकं केलं नियतीने तिला...

         इकडे तिचा आयुष्यभरासाठी निवडलेला जोडीदार पूर्णपणे तिच्यावर अवलंबून होता..आता तर भाऊ पण दु:खातच सांगेल तरी कोणाला???तिचा संसारगाडा तसाच ती चालवत होती....मुलगी हळू हळू थोडी मोठी होऊ लागली...आणि तिला दुसरा मुलगा झाला कारण आपल्या समाजात मुलगा जन्माला आला तरच त्या स्त्रीला महत्व दिलं जातं....मुलगा झाला आणि वैदेहीला थोडी हिंमत आली ,आता ती आपल्या लेकारांसाठी अजून जोमाने जगू लागली आणि नवऱ्यालाही जगऊ लागली....पण परत नियती तिच्यासाठी आ वासून तयारच होती...आणि एक दिवस दोन चिमुकले कोमेजलेल्या वैदेहीच्या पदरात टाकून तिचा जोडीदार कायमचा तिला सोडून देवाघरी गेला....

     मग खरा सुरू झाला वैदेहीचा वनवास सासरच्यांचा आधार नाही ,माहेरी आई वडील नाही ,दुःख व्यक्त करायला बहीण नाही बिचारी जाईल तर जाईल कुठे ????? इतकं दुःख देवानी एखाद्याच नशिबी द्यावं का???

      परत वैदेही आपल्या दोन चिमुकल्या पिल्लांकडे पाहून हिंमतीने जगू लागली जशी झांशी ची राणी बाळ घेऊन लढली तशी वैदेही बिचारी काहीतरी छोट मोठं काम करून जगू लागली..ती पिल्ले जणू तिची ताकद बनले होते...घराचं भाडं देणं , घरात सगळं पूर्ण करणं..सगळी जबाबदारी वैदेहीवर आली..त्यासाठी तिने आपल्या शिक्षणाच्या बळावर एक छोटीशी नोकरी मिळवली...मुलं हळू हळू मोठी होत होती त्यांचं शिक्षण आणि हीची नोकरी यामधे तिचा वेळ कसा जात होता कळलं पण नाही...

       पण म्हणतात ना भगवान के घर "देर है अंधेर नही" तसच काहीसं वैदेहीच्या बाबतीत झालं...ते तुम्हाला मी दुसऱ्या भागात सांगते..

     


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy