!! लग्नाची पूनर्गाठ !!भाग - २
!! लग्नाची पूनर्गाठ !!भाग - २
भाग - २
मागच्या भागात आपण वैदेहीचं दुःख अनुभवलं होतं....आता तिच्या आयुष्यात सुखाची चाहूल लागली होती...तिच्याच ओळखीत असलेला एक देशसेवा करणारा फौजी तिच्या आयुष्यात आला...तो मुलगा संस्कारी होता ...काय माहिती कदाचित देवालाच वैदेहीची दया आली असेल आणि त्यांना पाठवलं....वैदेहिच्या पदरात दोन मुलं असून देखील त्यांनी वैदेहीला लग्नासाठी मागणी घातली....वैदेहीची दोन्ही मुलं आता मोठी झाली होती मुलगी १० वी ला तर मुलगा ८वी ला होता....तिचं आता लग्न करणं हे काही आपल्या समाजाला मान्य नव्हतं ...तिच्या जवळच्या काही लोकांनी तिला या लग्नासाठी नकार दिला तर काहींनी तिला सहकार्य केलं...
वैदेही आता मोठ्या संकटात सापडली होती एकीकडे हे वनवासात असलेलं जीवन ,मुलांची जबाबदारी ,त्यांच्या पुढच्या शिक्षणाची जबाबदारी आणि दुसरीकडे या सर्व जबाबदाऱ्या घेणाऱ्या पुरुषाचा साथ ..कारण नवरा नसताना एखाद्या स्त्रीला काय काय सहन करावं लागतं हे सगळ्यांनाच चांगलं माहीत आहे....वैदेही या सगळ्या अग्नीपरिक्षेतून गेली होती...आणि परत मानसिक त्रास होतो तो वेगळाच ...
वैदेही कडे मात्र आता दोन मार्ग होते एक तिच्या मुलांच्या सुंदर भविष्याकडे जाणारा आणि एक परत त्याच नरकयातना भोगलेल्या भूतकाळातील काळोखात जाणारा....तिला या निर्णयासाठी सुध्धा जवळचे कोणीच मदत करायला तयार नव्हतं..ज्या परिस्थितीत आहे तशीच संपूर्ण जीवन व्यतीत कर...तेव्हढच काय तर ती दुसरं लग्न करणार म्हणून सासर आणि माहेर दोन्हीकडून तिच्याशी संबंध तोडून टाकण्यात आले...त्यांच्यामते विधवा स्त्री ने कधीच पुनर्विवाहाचा विचार करू नये... सगळे तिच्याबद्दल उलट सुलट बोलू लागले...तिची समाजात बदनामी करू लागले...तिच्या पडत्या काळात ज्यांनी तिला साधी ओळख सुद्धा दाखवली नव्हती त्यांना सुद्धा आज तिला नाव ठेवायला तोंड फुटलं होतं...
पण त्या फौजिंनी तिला एकच सांगितलं मी तुला आणि तुझ्यापेक्षा जास्त आपल्या मुलांचा सांभाळ करील..मुलांना जर आपलं नातं मान्य असेल तरच आपण लग्न करू.. नाहीतर मी आयुष्यभर तुझ्यावर असाच प्रेम करत राहील...तू नाही मिळाली तरी ..म्हणतात न फौजिंच मन असतच तसं मोठं...तेव्हाच ते जीवाची बाजी लाऊन सीमेवर आपल्यासाठी लढत असतात ना...त्यांनी तिचा सगळा वनवास माहीतच होता....म्हणून त्यांना तिची एकप्रकारची कीव आली असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही...आणि परत देव तिच्या पाठीशी होताच....
तिच्या मुलांनी पण अगदी लहानपणापासून तिच्या वेदना अनुभवल्या होत्या म्हणून मुलांनी पण लगेच लग्नाला होकार दिला....आणि मुलांना आईवडील मानणारी वैदेही पुन्हा लग्नाच्या बंधनात अडकली....इकडे तिची खूप बदनामी सुरू केली तिला धमक्या देण्यात आल्या पण तिच्या फौजी नवऱ्याने तिच्यावर बोट उचलनाऱ्यांचे तोंड पूर्णपाने बंद करून दिले...
आपल्या समाजात चांगलं करणाऱ्या लोकांना नावं ठेवण्याची एक वेगळीच रीत आहे...
त्या फौजींनी जर म्हटलं असतं तर त्यांना एक लग्नाची चांगली मुलगी सुद्धा भेटू शकली असती....ते स्वतःच नवीन आयुष्य सुरू करू शकले असते पण...वैदेहीचं आयुष्य मात्र त्याच चिखलात गटांगळ्या खात राहिलं असतं...आणि तिच्यासोबत तिच्या मुलांचं पण....
त्या फौजी व्यक्तीने तिच्यासाठी स्वतःच मन इतकं मोठं केलं ..खरच यावरून हेच सिद्ध होते की खऱ्या अर्थाने त्यांनी आज आपली देशसेवेची प्रतिज्ञा पूर्ण केली..
आता वैदेही आणि तिची दोन मुलं इतकी सुखात आहे ...इतक्या वर्षापासून वडिलांच्या प्रेमाला मुकलेल्या मुलांना आज वडिलांचं प्रेम मिळत आहे...वैदेहीला नवऱ्याचा मानसिक आधार , त्याची हिम्मत , जगण्यासाठी बळ मिळत आहे....काय वाईट केलं हो वैदेही नी...."लग्नाची पूनर्गाठ" बांधून...
