लास्ट सिप
लास्ट सिप


पार्टनर.." हे बघ हाच तो बेंच हीच ती जागा हाच तो मी आणि ह्याच त्या बॉटल्स...पण तू.. तू सगळ्या जगाला ज्ञान देणारा इथे नाहीयेस... का नाहीस? तुझी अजून यायची वेळ झाली नाही? आठव ती पैज आपण लावलेली. बघ रे बघ जिंकलोय मी आणि हरला आहेस तू... दुःखाच्या क्षणी दुःख विसरायला लावणारी ही दारू मी घेईन आणि सुखाच्या क्षणी तू दिलेली... मी पैज जिंकलोय कारण... कारण तू दिलेली एकही बॉटल अजून उघडली गेलीच नाही.. वेदनेशिवाय माझ्या आयुष्यात काही लिहिले गेलेच नाही... मला असं वाटतंय हा माझा अंतिम क्षण आहे म्हणजेच आता वेदना नाहीत आता दुःख नाहीत... माझा हात तू दिलेल्या बॉटल कडे जातोय उचलू पाहतोय पण आता मी क्षीण होत चाललोय डोळ्या पुढे अंधार दाटत चाललाय... निष्प्राण झालेला देह बघत मी हवेत विरत चाललोय... गुड बाय पार्टनर