Charushila Vaidya

Inspirational

3  

Charushila Vaidya

Inspirational

करोना महामारी काळात होणारे मानसिक खच्चीकरण त्याचबरोबर त्याचे निवारण

करोना महामारी काळात होणारे मानसिक खच्चीकरण त्याचबरोबर त्याचे निवारण

7 mins
211


कॉलेज सुरू असताना मार्चमध्ये बाहेरील देशांबद्दल आणि चाललेल्या महामारी बद्दल चर्चा होत असायची. 7 मार्च 2020 रोजी जागतिक संघटनेने एका पत्राद्वारे जागतिक स्तरावर एकूण एक लाख लोकांना करोना महामारी झाल्याचे जाहीर केले होस्टेलमध्ये राहत असल्यामुळे घरचे फोन हे चालूच असायचे. ही बातमी जेव्हा घरच्यांनी टीव्हीवर वाचली तेव्हा आमच्या सहित घरच्यांचे जमिनीवरील पाय हादरले. म्हणता म्हणता बॉम्बे च्या फ्लाईटने करुणा रुग्ण बाहेर देशातून भारतात यायला लागले आणि करोना संसर्गाचा प्रसार सुरुवात झाली. चीनमध्ये करोना संसर्गाने नोव्हेंबर 2019 पासून धुमाकूळ घालायला सुरुवात केली होती तरीही या देशाने बाहेरील देशांना याबद्दल इतका सुगावा लागू दिला नाही शेवटी महा सत्तेसाठी झालेलं करोना महामारी हे एक षडयंत्र म्हटलं तरी वावगं ठरणार नाही . अचानक पुणे-नगर करुणा ग्रस्त असल्याचे समजतात पुणे विद्यापीठाने 16 -3 -2020 रोजी कॉलेज हॉस्टेल मधील सर्व विद्यार्थ्यांना तातडीने घरी सोडायचे निर्देश आखले. आमची इंटरनल परीक्षा देउन आम्ही घरी निघणार, पण मित्र-मैत्रिणींना थोडं परीक्षेसंदर्भात चर्चा करायला गर्दी केली तर प्रत्येक शिक्षक आम्हाला ओरडायला लागले कधी करू नका तोंडाला मास लावा लवकरात लवकर घरी जा. का म्हणून खूप मोठी चूक झाली असावी माणसाची की भेट पण आम्हाला गळ्यात पडून घेता न यावी आता यांची शिक्षा परमेश्वर सर्वांना देत असावा. घरी जायची ओढ ही पण तितकीच म्हणाला हवी होती असा प्रवास करत असताना पाहिलं ते दृश्य करोना मुळे माणसामाणसांमध्ये झालेली ताटातूट तो तो सिंगल सीट बसायचा. न चुकता कोणी शेजारी बसत नाही तर तोंड बांधून बसायचे, अंतर ठेवून बसायचे. घरी आल्यानंतर मात्र दुसर्‍या दिवसापासूनच सगळं वेगळं आणि बोर वाटायला लागलं. भर लेक्चर साठी रोज पहाटे पाच पासून आवरून बसायचो ,आता उठून आठ वाजता आवरायला लागलो. अशातच मैत्रिणींची सवय लागलेली त्यांच्या आठवणी मात्र ढसाढसा रडू यायचं,अशाच बरोबर सर्व राष्ट्रांनी काळात योग्य सहकार्य करत उपाययोजना करायचा ठरवल.

महाराष्ट्र सहित पूर्ण भारतात 23 मार्च 2020 रोजी पहिला लॉकडाऊन झाला . प्रत्येक गावात शहरात पोलीस टीम सहित बाहेर फिरणार यांना फटकवायचे घराबाहेर दवाखाना आणि गरजेची वस्तू सोडून बाहेर पडण्यावर निर्बंध टाकले गेले. त्यामुळे लोकांना करोणा विषयी भीती आणि काळजी दोन्ही वाढूच लागली. मनाला बोचणारा प्रश्न असा की प्रगतीकडे वाटचाल करणारा विज्ञान अतिसूक्ष्म विषाणूने थांबवला . पृथ्वीवरील प्रत्येक सजीव सृष्टीचा आणि विज्ञानाचा सर्वात मोठा पराभव होता. बघता बघता रुग्ण वाढून त्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढायला लागले . जागतिक पातळी कमीजास्त आकडे पाहून रोगाची लागण शीत प्रदेशात जास्त होत असल्याचे स्पष्ट झाले. कारण चीनच्या वुहान शहरात त्याकाळात 15 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी तापमान होतं त्यामुळे बाकी ठिकाणी या रोगाची लागण आणि हिवाळ्यात झाल्याचे स्पष्ट झालं ,जेव्हा आम्ही मिळून बातम्या पाहू मनात भीतीच सावट उभं राहायच. स्वतः बायोकेमिस्ट्री करत असून मनात भीती बाळगत मी होतीच. पण विचार पडायचा जनसामान्यांच्या मनात याविषयी आणखी किती किती भीती निर्माण झालेली असावी .एखादा रुग्ण निघाला की सरकारी गाडी वाजत यायची अशी जशी गुन्हा करणारा गुन्हेगाराला पकडायला पोलीस येत आहे ,त्याच्या चाचण्या आरोग्य अधिकारी यांचे काम अनोळखी असं काही नव्ह या प्रसारमाध्यमांमुळे जी भीती मनात निर्माण झाली होती .तिची काही त्या च नाही. डॉक्टरांची नावे तसेच नासा आणि युनिसेफ यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांची नावे घेत प्रसारमाध्यमांनी शहानिशा न करता लोकांच्या मनामध्ये गोंधळाची स्थिती निर्माण केली होती .सर्व कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची सवलत जाहीर झाली. तापमान पहिल्यापेक्षा वाढते राहणार समजून विषाणूचा प्रभाव हा नक्कीच कमी होईल असे सरकार डॉक्टर पोलीस आणि जनसामान्यांच्या मनामध्ये आशा निर्माण करत होता . आमच्या परीक्षाही में मध्ये होतील अशा बातम्या पुन्हा एकदा सोशल मीडियावर फिरायला लागल्या. अचानक पुन्हा कोरोना रुग्ण वाढण्याचे दिसल्यास सरकारने परीक्षा आणि शाळा कॉलेज चालू न करण्याचे निर्बंध घातले आणि पुन्हा दुसरा तिसरा असं करत लॉकडाऊन पडायला सुरुवात झाली. टीव्हीवरील जागतिक संघटनेच्या बातमीमध्ये मी असं वाचलं होतं की हा करोना विषाणू साधारणतः अर्धा मिलिमीटर आहे. हे सातत्य किती खरं आहे हे चेक करण्यासाठी मी आपल्या स्टेशनरी मधली मोजमाप पट्टी घेतली, त्या पट्टीवर एक मिलीमीटर मोजमाप असतं त्या एक मिलिमीटर च्या अर्धा म्हणजे अर्धा मिलिमीटर. म्हणजे मला असं वाटलं की हा करुणा विषाणू आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो, आपल्याला माहीतच आहे सजीव सृष्टी ही प्रामुख्याने वनस्पती प्राणी आणि मानव जाती या गटांमध्ये विभागली आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि या करोना विषाणुंचा अभ्यास केला तर हा करोना विषाणू साधारणत: १२० नानोमीटर चा आहे म्हणजेच ०.१२ मायक्रोमिटर आहे.त्यामुळे आतापर्यंत सांगण्यात आलेले विषाणूंचा व्यास आणि करोना विषाणूचा व्यास यांच्यात साधारणपणे जास्त काही फारसा फरक दिसून येत नाही. परंतु हे विषाणू आपण सूक्ष्मदर्शकाचा शिवाय राहू शकत नाही . हे विषाणू सजीव आणि निर्जीव या दोन्ही स्वरूपात असतात असं विज्ञान सांगतो. हा विषाणू भक्ष्याच्या शरीरात प्रवेश करतो तेव्हा तो सजीव स्वरूपात असतो,आणि तो पुनरूत्पादन करण्यास सुरुवात करतो ,पण जेव्हा हा भक्ष्याच्या शरीरातून बाहेर पडतो तेव्हा तो निर्जीव स्वरूपात असतो ,तेव्हा मात्र तो पुनरुत्पादन करत नाही.आपल्या शरीरातील अनेक सूक्ष्म जीवांचा आपल्याला उपयोग देखील आहे आणि तितकेच ते आपल्यासाठी घातक ठरतात. जसं की आपली रोगप्रतिकारक क्षमता कमी झाली तरी साधारण ताप देखील आपल्यासाठी घातक ठरू शकतो . अशातच इम्युन सिस्टीम शिकायला असल्यामुळे एवढे मात्र नक्की लक्षात आलं टायफाईड ,निमोनिया, मलेरिया यांसारख्या विषाणूची बाधा झाल्यास करोना टेस्ट ही पॉझिटिव येते ,कारण हे सर्व विषाणू आणि करोना विषाणू यांची लक्षणे साधारणपणे सारखीच आहे .परंतु यावर येणार औषध हे वेगळा आहे .लोकं साधारण सर्दी ताप खोकला असला तरी डॉक्टरकडे जायला टाळायचे.बघता बघता टायफाईड सारखे निमोनिया सारखे रुग्ण हॉस्पिटलमध्ये नाहीसे झाल्यासारखे झाले होते . खोकला सर्दी असलेले लोक घरीच उपचार घेऊ लागले .परंतु सुशिक्षित असल्यामुळे डॉक्टरांकडून अजून एक माहिती कळाली जुलाब उलट्या हीदेखील करोना विषाणू ची लक्षणे आहेत. तसेच शुगर कर्करोग आणि किडनी संबंधित हृदया संबंधित आजार असलेल्या व्यक्तींना करोना उपचार हे तातडीची आहे. अशा लोकांना व्हेंटिलेटरवर ठेवतात ,या भीतीपोटी घरी सर्व घाबरलेले होते .करोना लस संबंधित चर्चा त्यावेळी सर्व संशोधकांसाठी आणि डॉक्टरांसाठी सर्वात मोठ आव्हान होतं. करोना संसर्ग हा हवेमार्फत जास्त होत असल्याने शासन आणि डॉक्टरांनी जनसामान्यांना बाहेर न पडण्याचे जास्तीत जास्त आवाहन केले .खूपच गरजेचे असताना तोंडावर रुमाल बांधून मगच फिरा असं काही ठिकाणी तर पोलीस अक्षरशः हात जोडून विनंती करू लागले.कारण अशा बऱ्याच डॉक्टर आणि पोलिसांनी आपले जीवन करोना संसर्गाने गमावले होते. जेव्हा करून रुग्ण शिंकतो, खोकतो तेव्हा त्याचे विषाणू तोंडा नाकावाटे आपल्या शरीरावर पडतात, तेच हात जेव्हा आपल्या चेहऱ्यावर आपण फिरवतो, तेव्हा त्या त्या विषाणूंची लागण होऊ शकते . या कारणे कुठलेही उत्सव सणवार आपापल्या घरात बाहेर न पडता लोकांचे गळे भेट न घेता सरकारने करायचे निर्देश आखले. त्यामुळे कुठेतरी या करोना संसर्गाला आळा बसला . अशातच टीव्हीवर वेगवेगळ्या प्रकारे बातम्या पुन्हा धुमाकूळ घालायला लागल्या ,आपण तोंडाला जे काही मास्क वापरतो ते आपल्यासाठी किती सुरक्षित आहे? यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले .डॉक्टर लोक जे मास्क युज करतात ते सोडले तर इतर मास्क हे आपल्याला तितके सुरक्षित करू शकत नाही .अशातच डॉक्टर पोलीस आणि आरोग्य अधिकारी या लोकांनी वापरलेले मास्क हे पुन्हा धुवून बाजारात विक्रीला आल्याचे घोटाळाही समोर आले ,त्यामुळे मास्क खरेदी करू की नको? हादेखील प्रश्नचिन्ह उभा राहिला.

कुठे कुणाच्या कार्यक्रमात जाणं हे देखील तितकंच असुरक्षित वाटायला लागलं, टीव्हीवर होणाऱ्या वारंवार बातम्यांमुळे मनातील भीती ही काही कमी होत नव्हती. अशातच मी माझा वेळ कविता लेख ज्या गोष्टी वाचलेल्या आवडतात त्या लिहून काढायला सुरुवात केली .बघता बघता आज माझी एक वही आणि एक डायरी भरली. पण म्हणतात ना आपण एकच गोष्ट सारखे सारखे नाही करू शकत, म्हणून मी चित्रलेखन करायला शिकले मला इतकं छान वाटलं ज्या मुलीला शाळेत चित्र काढता येत नसायचं तिला शिक्षक हसायचे ती उत्तम चित्र काढायला शिकली होती. त्यातून मी अजून एक उपक्रम राबवला ,माझ्या घराच्या भोवती आवारात मी वांग्याची रोपे लावली कारल्याचा वेल घोसाळ्याचावेल ओव्याचे झाड जास्वंदी गुलाब मोगरा लाजळू मनी प्लांट आळूची पाने तुळशीच्या तीन वेगळ्या प्रजाती लावल्या. बिना खताचे बागेतील फळे आणि भाज्या यांचा आस्वाद आम्ही घेऊ लागलो .रोज लेक्चर झाल्यानंतर त्या झाडांना पाणी घालणं, त्यांच्या सावलीखाली बसून त्यांच्याशी संवाद साधने, मला आवडायला लागलं .मी या करोना काळात माझ्या होणाऱ्या मानसिक संतुलनाचे खच्चीकरण थांबवले. एकंदरीत लक्षात आले आपण घरी बसून आपल्यातील कलागुणांना वाव देऊन आपले मानसिक संतुलन चांगले ठेवू शकतो. चुकीच्या बातम्या ऐकून मनस्वास्थ्य बिघडवन्यापेक्षा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून रोज आपल्या कलागुणांना वाव दिला तर काय वावगं ठरणार नाही. आतादेखील लॉक डाऊन उठवलेला असून देखील करा संसर्ग फारसा टळलेला नाही. कारण आजही तोंडावर मास्क आणि जंतूनाशक हे वारंवार हाताला लावा. बाहेर पडताना स्वतःची सुरक्षा बाळगावी लागते ,गर्दी वाटेतून जाताना मनात भती राहणार च तोपर्यंत करुणा ची लस ही सर्वत्र येत नाही. करुणा नंतर जग हे पहिल्यासारखे केव्हा चालू होईल तेव्हा मात्र चित्र काही वेगळंच असेल, तारखे तोंडावर मास्क लावलेले लोक पाहून मनस्वास्थ्य्यावर विपरीत परिणाम हे होणारच आहे, त्यामुळे सरकारी नियमांचे उल्लंघन न करता आपण सर्वांनी ह्या करुणा विषाणूला स्वतःची काळजी घेत हरवल पाहिजे. या काळात आपले होणाऱ्या मानसिक खच्चीकरण आपण स्वतः च थांबून पॉझिटिव्ह विचार करून जितकं निरोगी राहता येईल तितकं राहता आला पाहिजे. कारण वसंत कानेटकर यांच्या गरुड झेप पुस्तकातली शिवाजी महाराजांविषयी लिहिलेल्या ओळी आज सर्वांना सांगावेसे वाटतात ती म्हणजे सर्वनाश टाळायचा असेल तेव्हा क्षणाला मान ही झुकलीच पाहिजे पण ती कशी याच उत्तम उदाहरण श्रीशिव छत्रपती शिवाजी महाराज...

मुरारबाजी कधीही धारातीर्थी पडतील 

आणि किल्ला जिंकण आता अशक्य झालेल असताना मिर्झाराजे सोबत तह करायला निघालेले राजे पाहुन आऊ जिजाऊ चे अश्रु अनावर होत नव्हते तेव्हा आऊ जिजाऊंची समजुत काढताना राजे म्हणतात...

"गरुड कधी अश्रु ढाळीत नाही,वेदना असह्य झाल्या की तो उंच आकाशी जाउन आसमंत जागा करणारा चित्कार फक्त तो जाणतो"...तसेच करोना विषाणुशी तह जरी करायला आपल्याला लागला असला, तरी घाबरुन बिना माहितीचे मनातील वेदनांचे रुपांतर मानसिक आरोग्य विषयी ताण निर्माण करतय का?याचा विचार करुन सध्या स्थिती मध्ये या विषयी सतर्क आणि जागरुकता बाळगायला हवी. म्हणुन घरी राहा सुरक्षित रहा स्वत:ची आणि सर्वांची काळजी घ्या.

             


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational